
Rohit Pawar
सोलापूर : राज्याच्या राजकारणात सध्या बऱ्याच कारणांनी वातावरण गरम झाल्याचे दिसत आहे. आधी SIR विरोधी आंदोलने, पुण्यातील MPSC विद्यार्थ्यांचे आंदोलन यांसारख्या प्रश्नांमुळे राजकीय वातावरण चिघळले असतानाच विधान परिषदेच्या शिक्षक व पदवीधरच्या निवडणुकीवरूनही जोरदार धुमश्चक्री पाहायला मिळत होती. अश्यातच आता पुन्हा एका नव्या वादाला तोंड फुटले असून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्याविरुद्ध भाजप कर्म झाली आहे.
उजनी जलाशयात उभारण्यात येणाऱ्या AI डेटा सेंटरवरून सोलापूर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या प्रकल्पाला विरोध करण्यासाठी आमदार रोहित पवार मैदानात उतरले असताना दुसरीकडे भाजपने मात्र प्रकल्पाच्या समर्थनार्थ आंदोलन सुरू केलं आहे. या आंदोलनातून भाजप आमदार देवेंद्र कोठे यांनी रोहित पवारांवर जोरदार शब्दांत टीका केली. ‘रोहित पवार म्हणजे लबाड लांडगा असून ते शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग घेत आहेत,’ असा घणाघात त्यांनी केला.
उजनी जलाशयातील प्रस्तावित AI डेटा सेंटरवरून सोलापुरात दोन गट पडल्याचं चित्र आहे. एका बाजूला या प्रकल्पाला विरोध होत असताना भाजपने विकासाच्या मुद्द्यावरून समर्थनाची भूमिका घेतली आहे. आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि आमदार देवेंद्र कोठे यांनी या आंदोलनाची धुरा सांभाळली. यावेळी रोहित पवार यांच्या विरोधातही जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
आंदोलनादरम्यान देवेंद्र कोठे यांनी रोहित पवारांवर वैयक्तिक पातळीवर टीका केली. रोहित पवार हे शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करत नसून स्वतःच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी आंदोलन करत असल्याचा आरोप त्यांनी केला.
‘रोहित पवार म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला कलंक आहे. लबाड लांडग्यासारखं ढोंग करून शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग घेत आहेत,’ अशा शब्दांत कोठेंनी निशाणा साधला.
पुढे बोलताना कोठे यांनी रोहित पवारांना सोलापूरच्या विकासाच्या मुद्द्यावरूनही सुनावलं. ‘बेगाने शादी में अब्दुल्ला दिवाना’ अशी म्हण वापरत त्यांनी रोहित पवार हे बाहेरच्या जिल्ह्यातील असल्याचं सांगितलं. सोलापूरच्या विकास प्रकल्पांमध्ये हस्तक्षेप करू नका, असंही ते म्हणाले.
AI डेटा सेंटरच्या समर्थनार्थ भूमिका मांडताना कोठे यांनी या प्रकल्पामुळे ४० ते ४२ हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळण्याचा दावा केला. तसेच प्रकल्पातील सोलर पॅनलचा वाटा केवळ ९ टक्के असल्याने मासेमारीचं नुकसान होणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, उजनी जलाशयातील या प्रकल्पावरून शेतकरी, स्थानिक नागरिक आणि राजकीय नेत्यांमध्ये मतमतांतरे वाढताना दिसत आहेत. भाजपचा विकासाचा दावा आणि रोहित पवारांचा विरोध यामुळे आगामी काळात हा मुद्दा आणखी तापण्याची शक्यता आहे.
Ans: उजनी जलाशयात प्रस्तावित AI डेटा सेंटरच्या उभारणीवरून हा वाद सुरू आहे. प्रकल्पाच्या परिणामांबाबत विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत, तर भाजपने विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून त्याचे समर्थन केले आहे.
Ans: देवेंद्र कोठे यांनी रोहित पवारांना 'लबाड लांडगा' म्हणत ते शेतकऱ्यांच्या हिताचं सोंग घेत असल्याची टीका केली.
Ans: भाजप आमदार देवेंद्र कोठे यांच्या दाव्यानुसार, या प्रकल्पामुळे 40 ते 42 हजार लोकांना प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार मिळू शकतो.