उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील धरणग्रस्त शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतला आहे.
उजनी धरणाच्या निर्मितीसाठी आपली शेती, घरकुल आणि उपजीविकेचे साधन जनहितासाठी अर्पण करणाऱ्या धरणग्रस्त शेतकऱ्यांवर आता अतिक्रमण हटाव नोटीसा पाठविल्याने संतापाची लाट उसळली आहे.
वैध मासेमारीला पाठबळ देणाऱ्यावर गुन्हा दाखल कारण्याची मागणी एकमुखाने करण्यात आली. अवैद्य मासेमारीला विरोध करणाऱ्या मच्छिमारांना मासळी बाजारात येऊ न देण्याचा धमक्या देण्यात येत असल्याचा तक्रारी करण्यात आल्या.
गेल्या महिन्याभरात मासळीची आवक मोठ्या प्रमाणात घटल्याने इंदापूरच्या मत्स्य बाजारात शुकशुकाट झाला होता. मात्र गेल्या दहा दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. परिणामी मत्स्य बाजारात…
पुणे जिल्ह्यात पावसाने मागील आठवड्यापासून विश्रांती घेतल्याने दौंड येथील उजनीच्या जलसाठ्यात येणाऱ्या विसर्गात मोठी घट झाली असून, संथगतीने उजनी पाणी साठ्यात वाढ होत आहे.
नदीला मिळणार्या लहान मोठ्या ओढ्यातूनही पाणी मिसळत आहे. त्यामुळे भीमा नदी पात्राच्या पाणी पातळीत वाढ होत असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.