
भीमा नदीवरील उजनी धरण १९८० साली पूर्ण झाले असून, तब्बल १२१ टीएमसी पाणीसाठा क्षमता असलेले हे धरण राज्यातील जलसंपत्तीचा मोठा आधार मानले जाते. सोलापूर, पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यांतील लाखो हेक्टर शेती, तसेच अनेक शहरांच्या पिण्याच्या पाण्याची तहान उजनीमुळे भागते. त्यामुळेच उजनीला राज्याच्या ‘जलजीवनरेषे’चे स्थान प्राप्त झाले आहे.
धरणाला आता ४५ वर्षे पूर्ण होत असल्याने त्याच्या संरचनेची आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तपासणी केली जाणार आहे. मातीचा बांध, सांडवा, आपत्कालीन दरवाजे, विद्युत यंत्रणा आणि धरणाची भूकंप प्रतिरोधक क्षमता यांचे बारकाईने परीक्षण होणार आहे.या पाहणीत केंद्रीय जल आयोग (CWC), आयआयटी मुंबईचे तज्ज्ञ आणि राज्य धरण सुरक्षा संघटना सहभागी होणार आहेत. विशेष म्हणजे ड्रोन सर्व्हे, सिस्मिक तपासणी आणि डिजिटल मोजमाप तंत्रज्ञानाचा वापर करून धरणाची ‘हेल्थ चेकअप’ पद्धतीने तपासणी केली जाणार आहे.
धरणग्रस्तांना मोठा दिलासा; उजनी पाणलोट क्षेत्रातील अतिक्रमण हटाव नोटिसांना तात्काळ स्थगिती
हे मूल्यांकन नियमित प्रक्रियेचा भाग आहे.सध्या उजनी धरणाला कोणताही धोका नाही. ही तपासणी नियमित सुरक्षा प्रक्रियेचा भाग असून, आवश्यक ठिकाणी किरकोळ दुरुस्ती तातडीने केली जाणार आहेत.एस. खांडेकर, कार्यकारी अभियंता
उजनी धरणामध्ये अवैध मासेमारी फोफावली; स्थानिक मच्छीमार आक्रमक, कारवाईची मागणी