Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळून ३ विद्यार्थी जखमी! शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांची भेट; दोषी ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याचे आदेश.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 11, 2026 | 06:41 PM
Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले (Photo Credit- X)

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:
  • उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले
  • ३ विद्यार्थी जखमी
  • शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!
उंब्रज: चार वर्षांच्या प्रशासक राजवटीत अधिकारी आणि ठेकेदारांच्या कार्यपद्धतीवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत असताना, आता लोकनियुक्त जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांनी कारभाराची सूत्रे हाती घेताच त्याचा प्रत्यय उंब्रज येथे आला. उंब्रज जिल्हा परिषद शाळेतील निकृष्ट बांधकामामुळे ग्रॅनाईटचा तुकडा कोसळून तीन विद्यार्थी जखमी झाल्याच्या घटनेनंतर जिल्हा परिषदेच्या शिक्षण सभापती सौ. तेजस्विनी कदम यांनी मंगळवारी (दि. ११) पहिल्याच शाळा भेटीत कणखर भूमिका घेत ठेकेदाराची चांगलीच खरडपट्टी काढली.

शाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा देत त्यांनी संबंधित बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी केली. निकृष्ट कामाचा पंचनामा करून संबंधितांकडून खुलासा मागविण्याचे निर्देश देतानाच जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये सुरू असलेल्या बांधकामांचीही तपासणी करून दोषी आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, अशी तंबी त्यांनी दिली.

सोमवारी (दि. १०) सकाळी शाळेत प्रार्थना सुरू असताना खिडकीला बसविण्यात आलेले ग्रॅनाईट अचानक निसटून खाली कोसळले. यामध्ये यश अजय चव्हाण याच्या पायाला गंभीर दुखापत होऊन त्याला दोन टाके घालावे लागले. प्रथमेश विनोद जाधव याच्या डोक्याला ग्रॅनाईटचा तुकडा लागल्याने त्याला दुखापत झाली असून, अधिक तपासणीसाठी पालकांनी त्याला कराड येथे सिटी स्कॅनसाठी नेले. आणखी एका विद्यार्थ्याच्या पायाला किरकोळ दुखापत झाली.

या घटनेने शाळेच्या बांधकामाच्या गुणवत्तेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. नवीन इमारतीचे बांधकाम गेल्या काही महिन्यांपासून सुरू असून काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याचा आरोप पालकांनी केला आहे. “ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ झाला आहे. संपूर्ण कामाची सखोल चौकशी करून दोषी ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे,” अशी मागणी जखमी विद्यार्थी प्रथमेशचे वडील विनोद जाधव यांनी केली.

Wai News: वाई शहरात पोलिसांचा धाक उरलाय की नाही? बेकायदेशीर गुटखा विक्री, ट्रिपल सीट अन् बुलेटच्या फटाक्यांनी वाईकर हैराण

वर्क ऑर्डरची स्थलप्रतही नाही!

शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांच्या पाहणीदरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली. शाळेतील सुरू असलेल्या बांधकामाची साधी वर्क ऑर्डरची स्थलप्रतदेखील शाळेत उपलब्ध नसल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागाकडून सुरू असलेल्या कामावर प्रत्यक्ष देखरेख कितपत केली जाते, असा सवाल उपस्थित झाला आहे.

शाळेच्या बांधकामाची पाहणी करताना कदम यांनी संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि उपस्थित पदाधिकाऱ्यांकडून कामाची माहिती घेतली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असलेले बांधकाम तातडीने दुरुस्त करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य रणजित जाधव, मुख्याध्यापक, संबंधित ठेकेदार, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, पालक आणि ग्रामस्थांनीही घटनास्थळी पाहणी केली. दोषींवर कडक कारवाई करण्याचा इशारा पालकांनी दिला आहे.

“विद्यार्थी ही आपली जबाबदारी आहे. त्यांच्या जीविताशी संबंधित कामात हलगर्जीपणा अजिबात खपवून घेतला जाणार नाही,” या भूमिकेतून शिक्षण सभापती तेजस्विनी कदम यांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे जिल्हा परिषद बांधकाम विभागातील अधिकारी आणि ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.

उंब्रजच्या घटनेने केवळ एका शाळेतील निकृष्ट बांधकामाचा मुद्दा समोर आणला नसून, जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषद शाळांच्या बांधकामांच्या गुणवत्तेचे स्वतंत्र ऑडिट करण्याची गरज अधोरेखित केली आहे. आता शिक्षण सभापतींच्या आदेशानंतर संबंधित यंत्रणा प्रत्यक्षात किती कठोर कारवाई करते, याकडे पालक आणि ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.

Mhaswad Dam Destruction Dispute: माणगंगा नदीपात्रातील बंधारा तोडल्याचे प्रकरण तापले; ४ महिन्यांनंतरही पोलीस कारवाई शून्य

Web Title: Umbraj zp school granite collapse incident tejaswini kadam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 11, 2026 | 06:41 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Umbraj

संबंधित बातम्या

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी
1

निसरेफाटा-गिरेवाडी मार्गावर अपघातांचे सत्र सुरुच; अवघ्या आठवडाभरात तिघांचा बळी

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी
2

Karad News : कराड तालुक्यात दुष्काळाची झळ; संपूर्ण तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करण्याची पृथ्वीराज चव्हाणांची मागणी

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल
3

Satara Kas Pathar: कास पठारावर वनविभागाच्या नियोजनाचा फज्जा; वाहतूक कोंडीमुळे पर्यटकांचे हाल

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त
4

Satara News: तीन महिन्यांपासून पावसाची ओढ; जावळीत भातशेतीसह खरीप पिके करपली, शेतकरी संतप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.