Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांना सुरुवात, 40 लाख नागरिकांच्या तपासण्यांचे ध्येय

उपमुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहे.  या सामाजिक आरोग्य शिबिरांचे  प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन झाले आहे. राज्यात 25 हजार आरोग्य शिबिरे आयोजित केली जाणार असून. या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय आहे. जाणून घ्या या शिबिरांबाबत

  • By नारायण परब
Updated On: Sep 02, 2024 | 08:45 PM
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर मोफत सामुदायिक आरोग्य शिबिरांना सुरुवात, 40 लाख नागरिकांच्या तपासण्यांचे ध्येय
Follow Us
Close
Follow Us:

राज्यातील सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागासलेल्या भागांत वैद्यकीय सेवेपासून वंचित असलेल्या भागातील लोकांपर्यत आरोग्य सेवा पोहचविण्याकरीता उपमुख्यमंत्री, श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर लोकसहभागातून सामुदायिक आरोग्य शिबिरे राबविण्यात येणार आहे.  या  सामाजिक आरोग्य शिबिरांचे  दि.01 सप्टेंबर, 2024 रोजी प्रायोगीक तत्वावर घाटकोपर येथून उद्घाटन झाले आहे. जळगाव, चंद्रपूर जिल्हा व राज्याच्या इतर भागातही शिबिराचे आज आयोजन करण्यात आले होते. या शिबिरांना नागरिकांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.

40 लाख नागरिकांच्या तपासण्या

दि.01 सप्टेंबर, 2024 ते 31 ऑक्टोबर, 2024 या कालावधीमध्ये ही मोफत आरोग्य शिबिरे राज्यभर आयोजित केली जाणार आहेत. तब्बल 25 हजार आरोग्य शिबिरे या कालावधीत आयोजित केली जातील. या माध्यमातून सुमारे 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय आहे. या सामाजिक आरोग्य शिबिरामध्ये विविध धर्मादाय संस्था (NGOs), मेडीकल असोसिएशन, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ व त्यांच्याशी संल्लग्नीत खाजगी वैद्यकीय महाविद्यालये व विद्यार्थी, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजने अंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, लोकप्रतीनिधी यांचा सहभाग असणार आहे. सामुदायिक आरोग्य शिबिरे प्रामुख्याने दलित वस्त्या, भटक्या जमातीच्या वस्त्या, आदिवासी पाडे, झोपडपट्ट्या या भागांत राबविण्यात येणार असून सर्व सुविधा मोफत मिळणार आहेत. रामेश्वर नाईक हे या शिबिर आयोजन कार्यक्रमाचे मुख्य समन्वयक आहेत.

हे देखील वाचा- वारणानगरीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून विनय कोरेंचे तोंडभरून कौतुक; म्हणाले…

शिबिरामध्ये खालील बाबींचा समावेश आहे.

  • नागरीकांचे स्क्रिनींग करणे.
  • रक्त तपासण्या करणे. (59 प्रकारच्या रक्त चाचण्या करण्यात येणार आहेत.)
  • ई.सी.जी तपासण्या करणे.
  • आयुष्मान भारत योजना कार्डचे वाटप करणे
  • आवश्यक औषधांचे वाटप करणे
  • रोगाचे निदान झाल्यास रुग्णावर शासनाच्या आरोग्य विषयक योजनाच्या माध्यमातून उपचाराकरीता समन्वय साधणे.
  • शासनाच्या आरोग्य विषयक विविध योजनांची माहिती देणे.उपरोक्त तपासण्यांमध्ये रोगाचे निदान झाल्यास आवश्यकतेनूसार शस्त्रक्रीया किंवा पुढील उपचार शासनाच्या विविध आरोग्य विषयक योजनां जसे धर्मादाय रुग्ण योजना, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना, यांच्या माध्यामातून मोफत उपचार करण्याबाबत समन्वय साधन्यात येणार आहे. तसेच वरील सर्व तपासण्या विनामूल्य असणार आहेत.

हे देखील वाचा- “तुम्ही मुख्यमंत्री असताना लोकांनीच तुम्हाला गेट आऊट…”, नारायण राणेंचा उद्धव ठाकरेंना टोला

शिबिरांचे स्वरुप :

  • शिबिराचा कालावधी :- दि.01 सप्टेंबर, 2024 ते दि.31 ऑक्टोबर, 2024.
  • सकाळी 8.30 ते दुपारी 12.30 या वेळेत शिबिराचे आयोजन होणार आहे.
  • एका सामुदायिक आरोग्य शिबीरात संख्या 100 ते 250 नागरिकांची तपासणी करण्यात येणार आहे.
  • सुमारे 25000 हजार शिबिरे व 40 लक्ष नागरीकांच्या तपासण्या करण्याचे ध्येय.
  • निदान झालेल्या रुग्णांवर आवश्यकतेनुसार धर्मादाय रुग्णालये, शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, विविध शासकीय योजना  यांच्या माध्यमातून मोफत उपचार करण्यात येणार आहे.
  • शिबिराच्या स्थान दलित वस्ती, आदिवासी पाडे, भटक्या जमातीच्या वस्त्या यांच्या जवळील शाळा, समाजमंदिर, मंदिरे अशा सार्वजनिक ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहेत.
  • शिबिराच्या आयोजनाची माहिती एक – दोन दिवस आगोदर आशा समाजसेविका, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, स्वयंसेवक यांच्या मार्फत त्या भागातील लोकांपर्यंत पोहचविण्यात येणार आहे.
  • समाजातील विविध घटकांसाठी कार्यरत असलेल्या शासनाच्या आरोग्य विषयक योजनांची माहिती देणे.
  • शिबिरामध्ये सुमारे 1500 रुग्णालयांचा समावेश असणार यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालये, महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत नोंदणीकृत रुग्णालये, धर्मादाय रुग्णालये यांचा समावेश आहे.
  • तसेच विविध NGOs, समाजकार्य महाविद्यालयातील विद्यार्थी, आशा समाजसेविका यांचा देखील समावेश असणार आहे.

Web Title: Under the concept of deputy chief minister devendra fadnavis free community health camps will be launched across the state aiming to screen 40 lakh citizens

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 02, 2024 | 07:50 PM

Topics:  

  • devendra fadnavis
  • maharashtra

संबंधित बातम्या

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले
1

मरकटवाडी, पाचघर सह दोन गावांचा संपर्क तुटला; गारनदीच्या पुलावर पाणी तुंबले

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत
2

मोखाड्यात चिकनगुनिया सदृश्य रुग्णसंख्येत वाढ; नागरिक चिंतेत

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन
3

महाराष्ट्र $1.5 ट्रिलियन इकोनॉमीकडे कशी झेप घेणार? @ MH 1st Conclave 2025 मध्ये होणार विविध मुद्द्यांवर विचारमंथन

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी
4

NANDED : शेतकऱ्यांना हेक्टरी 1 लाखांची सरसकट मदत जाहीर करा – महाविकास आघाडीची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.