(फोटो- ट्विटर)
आज करवीरनगरीमध्ये वारणा उद्योग समूहाच्या आयोजित कार्यक्रमासाठी देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उपस्थित राहिल्या होत्या. यावेळी त्यांनी वारणा समूहाचे कौतुक केले. आज आपल्या देशात अनेक सहकारी संस्था आहेत. यामध्ये युवा पिढीने मोठ्या संख्येने सहभागी होयला हवे. सहकारी संस्था बळकट करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या आहेत. या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील संबोधन केले. यावेळी त्यांनी जनसुराज्य पक्षाचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांच्याबद्दल भाष्य केले आहे.
कोल्हापूरमध्ये वारणा उद्योग समूहाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ”सर्वप्रथम मी महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे कोल्हापूरनगरीत स्वागत करतो. मुंबईत मला अरबी समुद्र पाहायला मिळाला तर आज वारणानगरीत मला महिलांचा महासागर बघायला मिळाला. ” देवेंद्र फडणवीसांनी वारणा उद्योह समूहाबद्दल बोलताना आमदार विनय कोरे यांच्याबद्दल कौतुकास्पद शब्द वापरले आहेत. त्यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत.
🕟 4.22pm | 2-9-2024📍Warananagar, Kolhapur.
LIVE | The Golden Jubilee Celebration of Shree Warana Women Co-Operative Group@rashtrapatibhvn @maha_governor @Drvinaykore#Maharashtra #Kolhapur #WomenEmpowement https://t.co/nzh39GxGo8
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) September 2, 2024
पुढे बोलताना फडणवीस म्हणाले, ”तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण मिळायला हवा होता. राज्य सरकार सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे यांना पद्मभूषण मिळण्यासाठी शिफारस करण्यात येणार आहे. आज भारताच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या वारणेच्या भूमीत कार्यक्रमासाठी आल्या आहेत ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. आमचे मित्र विनय कोरे हे देखील राजकारणात असून कायम समाजकारणाचा विचार करणारे आहेत. ते माझे अतिशय चांगले मित्र आहेत. विनय कोरे हे अतिशय शांतीत क्रांती करणारे व्यक्तिमत्व आहे.”
सहकारी संस्थानों ने गरीबी दूर करने, खाद्य सुरक्षा और प्राकृतिक संसाधनों के प्रबंधन में अहम योगदान दिया है। लेकिन इस तेजी से बदलते हुए समय में सहकारी संस्थाओं को भी अपने-आप को बदलने की आवश्यकता है। उन्हें अधिक से अधिक technology का उपयोग करना चाहिए, साथ ही management को…
— President of India (@rashtrapatibhvn) September 2, 2024
दरम्यान आजच्या कार्यक्रमाला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. या कार्यक्रमात बोलताना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू म्हणाल्या, ”वारणा समूहाच्या सोहळ्याला यायला मिळणे ही आनंदाची बाब आहे. दुग्ध उत्पादनांमध्ये वारणा समूह अग्रेसर आहे. या ठिकाणी आज महिलांचा सोहळा पार पडत आहे. महिलांना सक्षम करण्यासाठी, त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. देशाच्या विकासात महिलांची प्रगती ही अत्यंत महत्त्वाची आहे.” या कार्यक्रमाला हजेरी लावण्याआधी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी करवीरनिवासिनी श्री अंबाबाईचे दर्शन घेतले. राष्ट्रपती दौपदी मुर्मू यांनी श्री महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीला कुंकुमार्चन अभिषेक केला. तसेच देवीची विधिवत पूजा केली. आरतीचा लाभ घेतला. यावेळेस सर्व महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.