फोटो सौजन्य -iStock
राज्यात सर्वत्र मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे नाले तुडूंब भरून वाहत आहेत आणि रस्त्यांमधील खड्ड्यांवर देखील पाणी साचलं आहे. नंदुरबारमध्ये नाल्याच्या पाण्यात पडून एका 6 महिन्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तहसील कार्यालयाजवळ ही घटना घडली आहे. मुसळधार पावसात पत्नी आणि आपल्या 6 महिन्यांच्या मुलाला घरी घेऊन जात असताना ही दुर्देवी घटना घडली आहे.
नंदुरबार जिल्ह्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. मुसळधार पावसामुळे शहादा तहसील कार्यालयाजवळ असेलेल्या नाला तुडूंब भरून वाहत होता. या पावसातून गावातील रहिवासी मनोज भिल आपल्या पत्नी आणि ६ महिन्यांंच्या मुलाला घेऊन बाईकवरून जात होते. त्यांची बाईक गावातील शहादा तहसील कार्यालयाजवळ आली असता, त्यांचे गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि त्यांची पत्नी बाईकवरून खाली पडली. त्यानंतर पत्नीच्या हातात असलेले 6 महिन्याचे बाळ नाल्यातील पाण्यात वाहून गेले. या दोघांनी बाळाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला. माज्ञ, त्याचा काहीच फायदा झाला नाही. यानंतर दुसऱ्या दिवशी नाल्यालगत असलेल्या एका काटेरी झुडपात बालकात मृत्यूदेह आढळला.
हेदेखील वाचा – कल्याण रिंग रोडची उभारणी प्रगतीपथावर! प्रकल्पातील चार टप्प्यांचे काम पूर्ण
या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांनी घटनास्थळी गर्दी केली होती. या घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. मुसळधार पावसामुळे लोकांचा मृत्यू झाल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. अशीच एक घटना आता नंदुरबारमध्ये देखील घडली आहे.
राज्यात मुसळधार पावसाची शक्यता
हवामान खात्याने पुढील १२ तासांसाठी हाय अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे राज्यात पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात पुढील चार दिवसांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. हवामान विभागातर्फे १७ जुलै ते १९ जुलै या कालावधीत राज्यभर मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईला पावासाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या २४ तासांत मुंबईत हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात पहाटेपासूनच मुसळधार पावसाने हजेरी लावली होती.
हेदेखील वाचा – ऑनलाईन स्कॅमचा धोका टाळण्यासाठी Apple कडून युजर्ससाठी काही टीप्स जारी
हवामान विभागाने रायगड जिल्ह्यात पावासाचा रेड अलर्ट दिला आहे. ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, परभणी, वर्धा, अमरावती आणि सातारा या जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट वर्तवण्यात आला आहे. विदर्भात देखील आज पावसाचा जोर वाढण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. पुढील चार ते पाच दिवस कोकणातील काही भागात अतिवृष्टीचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. त्यामुळे नागरिकांनी सतर्क राहावे आणि काम असेल तरच घराबाहेर पडावं असे आवाहन हवामान विभागातर्फे करण्यात आलं आहे. केरळ, गोवा, कर्नाटक आणि गुजरातमध्ये देखील पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे.