Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मान्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच अवकाळीने साताऱ्यात केले मोठे नुकसान; जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने दिल्या सूचना

धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या-त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्याचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 23, 2025 | 09:15 AM
मान्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच अवकाळीने केले कोट्यवधींचे नुकसान

मान्सूनपूर्व आराखड्यापूर्वीच अवकाळीने केले कोट्यवधींचे नुकसान

Follow Us
Close
Follow Us:

सातारा : साताऱ्याचे जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला मान्सूनपूर्व आराखडे सादर करण्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र, त्यापूर्वीच अवकाळीने सातारा जिल्ह्याला असा तडाखा दिला की, आराखडे सादर करायला वेळच मिळाला नाही. त्यापूर्वीच सातारा शहरासह जिल्ह्यामध्ये मोठे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

सातारा जिल्ह्यामध्ये यंदा गेल्या पाच वर्षात प्रथमच मान्सूनपूर्व अवकाळी सातारा जिल्ह्याला जोरदार तडाखा दिला. पुढील ७२ तास हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्टचा इशारा दिला आहे. पुणे-बेंगलोर महामार्गावर जोरदार पावसामुळे महामार्गावर पाणी येऊन वाहतूक ठप्प होणे किंवा वाहने पाण्यात बुडून इंजिनचे नुकसान होणे, असे अनेक प्रकार घडले आहेत. जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी मान्सूनपूर्व आढावा बैठकीमध्ये सातारा जिल्ह्यातील राज्य व जिल्हा महामार्गालगतच्या मोऱ्या रस्त्यांची बांधकामे तसेच दरड प्रवण आणि पूरप्रवण क्षेत्रांच्या संदर्भामध्ये आपत्ती व्यवस्थापनाला सूचना दिल्या.

धोकादायक होर्डिंग फ्लेक्स तातडीने उतरवणे, धोकादायक इमारतींना नोटिसा बजावणे, त्या-त्या कार्यक्षेत्रात तहसीलदारांनी तत्काळ पंचनामे करून संबंधितांना त्याचा इशारा इत्यादी कामे निर्देशित केली होती. मात्र, प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वीच अवकाळीचा तडाखा बसून जिल्ह्यामध्ये साधारण ५ कोटीचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे.

ओढ्याचा गळा आवळल्याने पाणी घरात

गोडोली कामाठीपुरा व रामराव पवार नगर येथे रुंदावलेल्या पात्रातून ओढ्यातील पाणी लोकांच्या घरामध्ये शिरण्याचे प्रकार घडले. साईबाबा मंदिर परिसरामध्ये बेकरी तत्सम घरांमध्ये पाणी शिरल्यामध्ये लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. गोडोली येथील शिवनेरी कॉलनीमध्ये सुद्धा पाणी घरात घुसून संसार उपयोगी साहित्याचे नुकसान झाल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.

आपत्ती व्यवस्थापनाकडून माती काढण्याचे काम

याबाबतच्या लेखी तक्रारी सातारा पालिकेकडे दाखल झाले आहे. पालिकेचा आपत्ती व्यवस्थापन विभाग सध्या रस्त्यावरील माती काढण्यात गुंतला आहे. सातारा शहरातील मुख्य सात ओढे आणि अन्य पाण्याचे प्रवाह त्यांची स्वच्छता हाती घेण्यात आली आहे. सध्या तरी ओढ्यांनी रस्त्यावर नवीन टाकलेली वाळू व माती हटवण्याचे काम सुरू आहे.

Web Title: Unseasonal rains caused major damage even before the pre monsoon plan

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2025 | 09:15 AM

Topics:  

  • Rain Update
  • Satara News
  • Unseasonal Rain
  • Weather Update

संबंधित बातम्या

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन
1

Palghar : पालघरमध्ये ठेकेदारांचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आक्रमक आंदोलन

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला
2

कोयना धरणातून नयनरम्य पाण्याचा विसर्ग; साताऱ्यात पावसाचा जोर वाढला

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा
3

Thane Rain News : पालिकेचा निष्काळजीपणा नागरिकांना भोवला ; “नालेसफाई झाली नाही तर… “ठाकरे गटाचा पालिकेला इशारा

Mumbai Rain Update :  ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन
4

Mumbai Rain Update : ठाणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे प्रशासनाचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.