Vadgaon Maval Nagar Panchayat announces release of reservation pune local elections 2025
Local Elections 2025 : वडगाव मावळ : सतीश गाडे : महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका होणार आहेत. यासाठी जोरदार तयारी सुरु आहे. प्रशासनाकडून देखील तयारी अंतिम टप्प्यामध्ये आली आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानुसार, जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सर्व प्रक्रिया पूर्ण करायच्या आहेत. त्यामुळे आरक्षण जाहीर केले जात आहेत. दरम्यान, पुणे जिल्ह्यातील वडगाव मावळ नगरपंचायतीची प्रभागनिहाय आरक्षण सोडत आज (दि.08) जाहीर करण्यात आली असून, यावेळी महिलांचे वर्चस्व स्पष्टपणे दिसून आले आहे. एकूण १७ प्रभागांपैकी तब्बल ८ प्रभाग महिलांसाठी राखीव झाले आहेत.
लहान मुलांच्या हस्ते चिठ्ठ्या टाकून पारदर्शक पद्धतीने ही सोडत काढण्यात आली. हा कार्यक्रम नगरपंचायत कार्यालयात आज सकाळी ११ वाजता संपन्न झाला. उपविभागीय अधिकारी महेश हरिश्चंद्रे यांच्या मार्गदर्शनाखाली, नगरपंचायतीचे मुख्याधिकारी व प्रशासक डॉ. प्रविण निकम यांच्या उपस्थितीत आरक्षण जाहीर करण्यात आले. या वेळी सर्व पक्षांचे पदाधिकारी, नागरिक आणि नगरपंचायतीचे अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
जाहीर झालेली आरक्षण यादी पुढीलप्रमाणे —
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
महिला आरक्षणामुळे काही प्रभागांतील इच्छुक पुरुष उमेदवारांमध्ये निराशा दिसून आली, तर काही प्रभागांमध्ये नव्या चेहऱ्यांनी उत्साहाने तयारी सुरू केली आहे. सोडत जाहीर होताच सोशल मीडियावर “भावी नगरसेवक” या नावाने पोस्टांचा पाऊस पडू लागला असून, स्थानिक राजकारणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. निवडणूक कार्यक्रमानुसार उद्या (९ ऑक्टोबर) प्रारूप आरक्षण रचना प्रसिद्ध होणार आहे. ९ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत नागरिकांना हरकती आणि सूचना सादर करण्याची संधी दिली जाणार आहे.