मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख (Shivsena Party Chief) उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देत वर्षा हे शासकीय निवासस्थान सोडले (resigned from the post of chief minister and left the varsha banglo official residence).
महाविकास आघाडी सरकार (MVA) कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री (Eknath Shinde, Chief Minister) झाले. मात्र, शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी रहायला जाणार की नाही अशी चर्चा रंगली होती. मात्र, एक महिन्याच्या कालावधीनंतर अखेर वर्षा बंगल्यावर एकनाथ शिंदे यांच्या नावाची पाटी (Name Plate) लागली आहे.
[read_also content=”कायदेतज्ज्ञ उज्वल निकम मुख्यमंत्र्यांच्या भेटीला https://www.navarashtra.com/maharashtra/government-advocate-and-expert-ujjwal-nikam-meet-to-cm-eknath-shinde-312122.html”]
एकनाथ शिंदे २०१४ पासून मलबार हिल (Malabar Hill) येथील नंदनवन (Nandanvan Banglow) या शासकीय निवासस्थानातून (Government Residence) त्यांच्या मंत्रिपदाचा कारभार चालवत आले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदे हे वर्षा या शासकीय निवासस्थानी राहायला जाणार का? असा सवाल उपस्थित केला जात होता.
[read_also content=”सहा एअरबॅग मानक म्हणून देणारी किआ सेल्टोस तिच्या विभागात ठरली नं १ https://www.navarashtra.com/automobile/with-six-airbags-as-standard-the-kia-seltos-is-no-one-in-its-segment-nrvb-312083.html”]
परंतु, ठाकरे यांनी वर्षा बंगला सोडल्यानंतर त्याची नव्याने रंगरंगोटी करण्यात आली आहे. तर, जवळपास एक महिन्याच्या कालावधीनंतर वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ संभाजी शिंदे अशा नावाची पाटी लावली गेलीय. त्यामुळे शिंदे आता वर्षा बंगल्यावर कधी राहायला जातात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.