Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

वसंत मोरे हाती बांधणार शिवबंधन; उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर पक्षप्रवेशाची ठरली तारीख 

पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यानंतर मोरे हे पक्षप्रवेश करणार असून त्यांच्या पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jul 04, 2024 | 02:48 PM
वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश

वसंत मोरे यांचा शिवसेना ठाकरे गटामध्ये प्रवेश

Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : पुण्याचे नेते वसंत मोरे हे सध्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेत आले आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये दारुण पराभव झाल्यानंतर मोरेंनी त्यांची राजकीय खेळी खेळली. आज वसंत मोरे व शिवसेना ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. मातोश्रीवर झालेल्या या भेटीनंतर वसंत मोरे हे ठाकरे गटामध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित झाले आहे. वसंत मोरे यांची पक्षप्रवेशाची तारीख देखील ठरली आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसंत मोरे यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेतली. यानंतर लवकरच वसंत मोरे शिवबंधन बांधणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मीडियारिपोर्टनुसार, वसंत मोरे हे लवकरच आगामी निवडणूक मशाल चिन्हावर लढवणार आहेत. महाविकास आघाडीकडून त्यांना खडकवासला किंवा हडपसर या विधानसभेच्या जागेवर संधी दिली जाऊ शकते. मशाल चिन्हावर वसंत मोरे हे विधानसभा निवडणूक लढवणार आहेत. पुढील आठवड्यामध्ये 9 जुलै रोजी ठाकरेंच्या शिवसेना पक्षात वसंत मोरेंचा प्रवेश होणार असल्याची माहिती समोर येत आहे.

लोकसभेत डिपॉजिट झाले होते जप्त

पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसे पक्ष व नेते राज ठाकरे यांची साथ सोडली. यावेळी देखील त्यांनी महाविकास आघाडीसोबत बोलणी केली होती. मात्र ही बोलणी काही यशस्वी होऊ शकली नाही. आधी अपक्ष आणि नंतर वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून वसंत मोरे यांनी लोकसभा निवडणूक लढली. मात्र यामध्ये त्यांचा मोठा पराभव झाला. अगदी त्यांचं डिपॉझिट देखील जप्त झालं होते. आता वसंत मोरे यांनी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे.

Web Title: Vasant more meeting with uddhav thackeray in matoshree entry date fixed pune political nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 04, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • Uddhav Thackeray
  • Vasant more

संबंधित बातम्या

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा
1

शिवसेना आणि मनसेच्या युतीचा सोहळा; मात्र भाजपचाही मुंबई पालिकेवर खास डोळा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.