
Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथून दसरा मेळाव्यात शिवसैनिकांना संबोधित करत आहेत. राज्याच्या कान्याकोपऱ्यातून शिवसैनिक विचारांचे सोने लुटण्यासाटःई शिवतीर्थावर जमले आहेत. ठाकरे गटाकडून यंदाचा दसरा मेळावा संविधानाच्या संरक्षणासाठी असल्याचं सांगण्यात आलं आहे. (Shivsena Uddhav Thackeray Dasara Melava 2026 Live)
उद्धव ठाकरेंनीही यावेळी जमलेल्या सर्व शिवसैनिक माता भगिनींना अभिवादन केले. ते यावेळी म्हणाले,” आजच दृश्य पाहात बसावं असं आहे. मला आधीचे दिवस आठवले. सगळीकडे भगवा माहोल. हाच भगवा आपल्याला लाल किल्यावर फडकवायचा आहे. हीच आपली ओळख आहे. हाच पवित्र भगवा शिवाजी महाराजांनी घेतला होता. कितीही दरोडेखोर येउदेत, पण आपला भगवा ते चोरू शकत नाहीत.”
आजचा मेळावा विशेष आहे. शिवसेनाप्रमुखांचा जन्मशताब्दी वर्ष आहे. शिवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याचे हे हीरक महोत्सवी वर्ष आहे. शिवसेनाप्रमुखांविषयी खूप जणांनी बोललं आहे पण आज मला त्यांची काही वाक्य आठवतात. “मेलेली मन कधीच क्रांती करू शकत नाहीत, जिवंत माणसासारखे वागा. मुडद्यासारखे कदापि वागू नका. क्रांती हि मर्दांची असते तर शांती हि मुडद्यांची असते. आपण मर्द आहोत पण मला हेच सांगायचंय कि खुराडातल्या कोंबड्यासारखं जगू नका. 100 दिवस शेळी होऊन जगण्यापेक्षा एकाच दिवस वाघ बनून जगा.”
“हा दुष्काळ मोठा असणार आहे. आपल्याकडे दुष्काळात तेरावा महिना अशी म्हण आहे. तसंच हे सरकार आहे. डबल इंजिनचं सरकार नुसतं घोषणा करतंय. गेल्यावर्षी अतिवृष्टीत सगळं वाहवून गेलं होत. तेव्हा मुख्यमंत्र्यांनी इतिहासातील सर्वात मोठं 31 हजार कोटींचं पॅकेज जाहीर केलं होत. ज्यांची जमीन खरडून गेलीये त्यांना साडेतीन लाख रुपये हेक्टरी जाहीर केले. ते किती जणांना मिळाले? पीकविमा किती जणांना मिळाला? आतासुद्धा जी 5 हजाराची मदत केली ते उपकार नाहीत? विम्यासाठी जे निकष लावले होते ते निकषच काढून टाकले जेणेकरून नुकसानभरपाई देण्याची गरजच पडणार नाही. कर्जमाफी जाहीर झाली पण कुणाला मिळाले काहीच माहित नाही? केंद्रीय पथक येऊन गेलं काय केलं कुणालाच माहीत नाही…”