Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 25 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • Raksha Bandhan |
  • amravati |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा

जावळी तालुक्यातील वडाचे म्हसवे येथील आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा उत्सव भक्तिमय वातावरणात साजरा झाला. तर कोयना विभागातील फुरुस गावातही महिलांनी पारंपरिक पद्धतीने वटवृक्षाची पूजा करून पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना केली.

  • By विवेक
Updated On: Jun 29, 2026 | 09:03 PM
आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा

आशियातील सर्वात मोठ्या वटवृक्षाखाली वटपौर्णिमेचा भक्तिमय सोहळा, कोयना विभागातील ग्रामीण भागात महिलांनी जपली परंपरा

Follow Us
Follow Us:

पाचगणी : भारतीय संस्कृतीत वटपौर्णिमेला विशेष धार्मिक, सांस्कृतिक आणि कौटुंबिक महत्त्व आहे. पतीच्या दीर्घायुष्यासाठी, अखंड सौभाग्यासाठी तसेच जन्मोजन्मी हाच पती लाभावा या श्रद्धेतून विवाहित महिला वटवृक्षाची पूजा करतात. हीच परंपरा आणि श्रद्धेची अनोखी अनुभूती रविवारी सातारा जिल्ह्यातील जावळी तालुक्यात पाहायला मिळाली. आशिया खंडातील सर्वात मोठा मानला जाणारा वडाचे म्हसवे येथील भव्य वटवृक्ष तसेच कोयना विभागातील दुर्गम डोंगराळ परिसरातील फुरुस गाव येथे वटपौर्णिमा मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली.

वडाचे म्हसवे येथील ऐतिहासिक वटवृक्ष परिसर पहाटेपासूनच भाविकांनी गजबजून गेला होता. परिसरातील तसेच विविध भागांतून आलेल्या महिलांनी पारंपरिक वेशभूषेत पूजा साहित्य, नैवेद्य आणि श्रद्धेचा दोरा घेऊन वटवृक्ष परिसरात हजेरी लावली. वटवृक्षाला भारतीय संस्कृतीत दीर्घायुष्य, स्थैर्य आणि अखंड सौभाग्याचे प्रतीक मानले जाते. त्यामुळे महिलांनी वडाच्या झाडाची विधिवत पूजा करत पारंपरिक पद्धतीने सात फेरे मारले.

पंढरपूरचा कायापालट होणार! विठ्ठल मंदिर परिसरासाठी तब्बल ३,९९३ कोटींचा मेगा प्लॅन; फडणवीसांची मोठी घोषणा

पूजा करताना महिलांनी आपल्या पतीच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी आणि कुटुंबाच्या सुख-समृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना केली. अनेक महिलांनी ‘हेच कुटुंब पुन्हा पुन्हा लाभावे’ तसेच संसारातील आनंद आणि एकोप्याचे नाते कायम राहावे, अशी भावना व्यक्त केली. वडाच्या झाडाला नैवेद्य अर्पण करून श्रद्धेचा धागा बांधत महिलांनी आपल्या संस्कृतीशी असलेले नाते अधिक दृढ केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

दुसरीकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कोयना विभागातील ग्रामीण, दुर्गम आणि डोंगराळ भागातही वटपौर्णिमेचा उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. जावळी तालुक्यातील फुरुस गावात महिलांनी मोठ्या संख्येने एकत्र येत वटवृक्षाची पूजा केली. ग्रामीण भागात आजही जुन्या परंपरा आणि संस्कार जपले जात असल्याचे या उत्सवातून स्पष्ट झाले.

Wai News: मेणवलीतील नेहर ओढ्यावरील पुलाचे निकृष्ट बांधकाम उघडे; पहिल्याच पावसात रस्त्यावरून पाणी, अपघातांचा धोका वाढला!

फुरुस गावातील महिलांनीही वटवृक्षाभोवती सात प्रदक्षिणा घालत आपल्या पतीच्या दीर्घायुष्याची आणि अखंड सौभाग्याची प्रार्थना केली. गावातील वातावरण भक्तिमय झाले होते. महिलांच्या सहभागामुळे सामाजिक एकोप्याचे आणि सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडले.

निसर्ग, श्रद्धा आणि परंपरा यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळालेल्या या वटपौर्णिमा उत्सवाने ग्रामीण भागातील सांस्कृतिक जीवनाची समृद्ध परंपरा पुन्हा अधोरेखित केली. आधुनिकतेच्या काळातही भारतीय संस्कृतीतील धार्मिक परंपरा आणि कौटुंबिक मूल्ये टिकून असल्याचे चित्र या उत्सवातून स्पष्ट झाले.

Web Title: Vat pournima celebration at asias largest banyan tree vadache mhasve satara

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2026 | 09:03 PM

Topics:  

  • Pachgani
  • Satara
  • Vatpurnima

संबंधित बातम्या

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण
1

Advocates Protection Act: वकिलांवर हल्ले सुरूच; संरक्षण कायदा कधी? निकम बंधूंचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती
2

सुप्रिया सुळे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी! कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाच्या कुलाधिकारीपदी नियुक्ती

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी
3

अतिक्रमण हटवलं, पण वाहतुकीचा प्रश्न कायम! साताऱ्यात रिक्षा थांब्यांच्या पुनर्नियोजनाची मागणी

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार
4

Satara News: जलसंवर्धनासाठी हजारो नागरिकांची पावले एकवटली; वॉकेथॉनमधून पाणी वाचवण्याचा निर्धार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.