Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 22 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mahabaleshwar News : महाबळेश्वर पालिका सर्वसाधारण सभेत ‘व्हीडीके’चा स्वच्छतेचा ठेका रद्द!

महाबळेश्वर पालिकेने घनकचरा व्यवस्थापनाचा ११ कोटी २५ लाख रुपयांचा स्वच्छता ठेका अखेर रद्द करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला. मे व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा. लि. कंपनीला तीन वर्षांसाठी दिलेला हा ठेका अकार्यक्षमतेच्या कारणावरून रद्द करण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jul 28, 2026 | 09:44 PM
Mahabaleshwar News : महाबळेश्वर पालिका सर्वसाधारण सभेत ‘व्हीडीके’चा स्वच्छतेचा ठेका रद्द!
Follow Us
Follow Us:

महाबळेश्वर : महाबळेश्वर पालिकेच्या वतीने दिड वर्षांपूर्वी घनकचरा व्यवस्थापनांतर्गत मे व्ही डी के फॅसिलिटी सर्व्हिसेस प्रा लि या कंपनीला तीन वर्षांच्या कराराने ११ कोटी २५ लाख १७ हजार ७७५ या रक्कमेचा दिलेला स्वच्छतेचा ठेका अखेर रद्द करण्याचा निर्णय सोमवारी पार पडलेल्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला स्वच्छता सभापती ऍड संजय जंगम यांनी ठेकेदाराच्या अ-कार्यक्षमतेमुळे शहराच्या स्वच्छतेचे धिंडवडे उडाल्याचे सांगितले याबाबतची घोषणा केल्यानंतर विरोधी गटाने या निर्णयाचे स्वागत केले.

Disaster News : फळणे वस्ती लगत तापोळा रस्ता खचला १०५ हून अधिक गावांचा संपर्क तुटला

पालिकेच्या सभागृहात नगराध्यक्ष सुनील शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली पालिकेत सत्ताधारी व विरोधी पक्षनेते कुमार शिंदे यांच्यामध्ये विविध विषयांवर सखोल चर्चे अंती मंजुरी देण्यात आली पाणीपुरवठा योजनेबाबतचा निर्णय तसेच नुकतीच मजीप्रा कडून पालिकेस करण्यात येणाऱ्या पाणीपुरवठ्यामध्ये दरवाढ करण्याच्या निर्णयामुळे पालिकेवर प्रतिमहिना लाखो रुपयांचा बोजा वाढणार असल्यामुळे दरवाढ करण्याबाबतचा निर्णय विशेष सभेचे आयोजन करून घेतला जाणार आहे सोमवारी दुपारी एक वाजता सुरु झालेली सभा रात्री आठ वाजता संपली.

यावेळी उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी मुख्याधिकारी योगेश पाटील पालिकेचे मुख्य लिपिक बबन जाधव सभा अधीक्षक अमित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते पालिकेची सर्वसाधारण सभा ही वादळी ठरते या सभेत देखील विविध विषयांवर घमासान पाहावयास मिळाले. या सभेपुढे पालिका शाळा,महाविद्यालयातले शिक्षक,प्राध्यापक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना कार्योत्तर मुदत वाढ,मुख्याध्यापक प्राचार्य नेमणुकीस मंजुरी पालिका कर्मचारी गणवेश ओळख पत्र देणे कारवी अळी येथे भूमिगत ड्रेनेज लाईन,शवसकीय जमिनीवरील २०११ पर्यंतची निवासी अतिक्रमणे नियमित करण्याबाबत निर्णय पालिका हद्दीतील भूमिगत विद्युत वाहिनी टाकण्यासह जिल्हा वार्षिक योजनेतून नवीन कामांचे परिपूर्ण प्रस्ताव सादर करण्याबाबतचा काही विषय ठवण्यात आले या सर्व विषयांना मंजुरी देण्यात आली.

Maharashtra Rain Alert: महाराष्ट्राच्या दिशेने येतंय वादळी संकट; कोकण, मुंबई अन्…; अलर्टने चिंता वाढली

दरम्यान महाराष्ट्र जीवन प्राधिकरण कडून पालिकेस ठोक स्वरूपात केला जाणाऱ्या पाणीपुरवठा दरामध्ये प्राधिकरणाकडून वाढ करण्याचा निर्णय घेतल्यामुळे प्रतिमहिना पालिकेस तीन ते साडेतीन लाख रुपयांचा बोजा वाढणार आहे हा बोजा १३ ते १४ लेखांवरून १६ ते १७ लाखांवर जाणार असल्यामुळे पालिकेकडून नागरिकांना केल्या जाणाऱ्या पाणीपुरवठ्याच्या दरामध्ये देखील दर वाढ करण्याचा विषय सभेच्या पटलावर आला तसेच प्राधिकरणाची थकबाकीसह तब्बल सतरा कोटीहून अधिक देणी पालिका देणे असल्यामुळे प्राधिकरण पाणीपुरवठा वरचेवर बंद करून वेठीस धरत असल्याचा मुद्दा चर्चत आला पाणीपुरवठा सभापती तथा उपनगराध्यक्ष नासिर मुलाणी यांनी या विषयावर एकत्रित येत ठोस निर्णय घेण्याची गरज असलयाचे मत व्यक्त केले यावर नगरसेवक संतोष शिंदे यांनी राज्याचे पाणीपुरवठा मंत्री ना गुलाबराव पाटील याना भेटून या विषयावर मार्ग काढण्याबाबत सकारात्मक असल्याचे सांगितले अखेर सर्वानुमते पाणीपुरवठा योजनेसह दराबाबतचा विषयासाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी दिली.

खोल समुद्रात आता नेटवर्कची चिंता नाही! ‘मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजने’तून मच्छिमारांना मिळाला सॅटेलाइट फोन’

महाबळेश्वरचे छ संभाजी महाराज वाहनतळ (रे गार्डन) वाहनतळ ठेका तत्वावर चालविण्यात देण्याचा निर्णय घेतांना ठेकेदारास स्वच्छता,सीसीटीव्ही यंत्रणा,बॅरेजेन्ट्स २४ तास सुरक्षारक्षक असे नियमांच्या अधीन करून ठेका १ कोटी ११ लाख रुपयांना देण्यावर सर्वानुमते एकमत झाले.

Web Title: Vdks sanitation contract cancelled at the mahabaleshwar municipal council general body meeting

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 09:43 PM

Topics:  

  • Mahabaleshwar

संबंधित बातम्या

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम!  पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…
1

Big Breaking: अचानक आलेल्या डुलकीने केला गेम! पोलादपूर महाबळेश्वर मार्गावर विचित्र अपघात, 2 जखमी तर…

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष
2

Mahabaleshwar Crime news: रिसॉर्ट चोरी प्रकरणी मुख्य आरोपीला कारावास, ५ जण निर्दोष

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.