Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता

पश्चिम विदर्भातील 'आत्महत्याग्रस्त' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमधील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 25, 2026 | 10:13 AM
Maharashtra River Interlinking: विदर्भाची तहान भागणार! राज्य सरकारची वैनगंगा- नळगंगा नदीजोड’ला मान्यता
Follow Us
Close
Follow Us:
  • ८० हजार कोटींच्या नदीजोड प्रकल्पाला ग्रीन सिग्नल
  • वैनगंगा-नळगंगा प्रकल्प ठरणार विदर्भाची ‘जीवनवाहिनी
  • सिंचन क्षेत्रात क्रांती! ४ लाख हेक्टरहून अधिक जमीन ओलिताखाली येणार
Nagpur-Vidarbha Latest Update: राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विदर्भाला सर्वांत मोठी भेट दिली आहे. विदर्भाचे रुपडे पालटणाऱ्या वैनगंगा-नळगंगा नदीजोड या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला राज्य सरकारने मंजूरी दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रकल्पाला मान्यता दिल्याच्या ऐतिहासिक निर्णयाची घोषणा जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.

Vidarbha News: केंद्र सरकारची ‘मोठी भेट’! गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाच्या दुहेरीकरणाला मंजुरी

या प्रकल्पामुळे विदर्भातील पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. प्रकल्पाचा नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम व भंडारा जिल्ह्यांना फायदा होण्याची अपेक्षा आहे. या माध्यमातून भंडारा जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीचे पाणी बुलढाणा जिल्ह्यातील पूर्णा-नळगंगा नदीत आणले जाणार आहे. यासाठी विदर्भातील ८ जिल्ह्यांतून ३८८.२८ कि.मी. लांबीचा कालवा तयार करण्यात येणार आहे. प्रकल्पात एकूण २०.४९ कि. मी.च्या १३ बोगद्यांचा समावेश आहे. विदर्भातील ८ जिल्ह्यांतील ३८ तालुक्यातून कालवा जाणार आहे. नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ, अकोला, बुलढाणा, वाशिम व भंडारा जिल्ह्यांना या प्रकल्पाचा थेट फायदा होईल.

निधी कमी पडणार नसल्याचीही ग्वाही

वैनगंगा, नळगंगा प्रकल्प यापूर्वी केवळ प्रक्रियेत होता, मात्र, मुख्यमंत्र्यानी ती तातडीने सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत. माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रयत्नामुळे निधींची कमतरता भासणार नसल्याचेही महाजन यांनी नमूद केले. आतापर्यंत प्रकल्पाची व्याप्ती मयादित होती. परंतु ती वाढवून प्रकल्प पूर्णत्वास नेण्यात येणार आहे. कामाची सुरुवात झाल्याची माहितीही महाजन यांनी दिली.

Uttarpradesh Crime: प्रियकराने दिला लग्नाला नकार; प्रेयसीने उचलले टोकचे पाऊल

९५ हजार कोटींचा महत्तवाकांक्षी प्रकल्प

प्रकल्पासाठी एकूण ९५ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून त्यापैकी ६० टक्के निधी केंद्र सरकारकडून दिला जाणार आहे, तर उर्वरित ४० टक्के निधी राज्य सरकार उचलेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

प्रकल्पाचे महत्त्व आणि फायदे

अतिरिक्त पाण्याचे नियोजन: वैनगंगा नदीतील पावसाळ्यातील अतिरिक्त पाणी (जे दरवर्षी वाया जाते) ४२६ किमी लांबीच्या कालव्याद्वारे पश्चिम विदर्भातील नळगंगा प्रकल्पापर्यंत नेले जाईल.

पिण्याचे पाणी आणि उद्योग: या प्रकल्पामुळे केवळ शेतीलाच नाही, तर अनेक शहरे आणि एमआयडीसी (MIDC) क्षेत्रांना पिण्याच्या आणि औद्योगिक पाण्याचा पुरवठा होईल.

दुष्काळावर मात: पश्चिम विदर्भातील ‘आत्महत्याग्रस्त’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्ह्यांमधील सिंचनाचा अनुशेष भरून काढण्यासाठी हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे.

भूजल पातळीत वाढ: कालव्याच्या मार्गावरील शेकडो तलाव आणि बंधारे भरल्यामुळे भूजल पातळीत लक्षणीय वाढ होईल.

 

Web Title: Vidarbhas thirst will be quenched state government approves wainganga nalganga river link

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2026 | 10:13 AM

Topics:  

  • irrigation projects
  • Vidarbha

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.