Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ल्याकडे पुरेसा पैसा होता, मात्र…’; सीबीआयचा पुरवणी आरोपपत्रात दावा

कर्जबुडव्या उद्योगपती आणि फरारी आरोपी विजय मल्याकडे (Vijay Mallya) कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता. मात्र, कर्ज फेडण्याऐवजी देशातून पलायन करण्यापूर्वी त्याने परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबीआयने (CBI) मल्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 23, 2023 | 09:41 PM
‘कर्ज फेडण्यासाठी विजय मल्ल्याकडे पुरेसा पैसा होता, मात्र…’; सीबीआयचा पुरवणी आरोपपत्रात दावा
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : कर्जबुडव्या उद्योगपती आणि फरारी आरोपी विजय मल्याकडे (Vijay Mallya) कर्ज फेडण्यासाठी पुरेसा पैसा होता. मात्र, कर्ज फेडण्याऐवजी देशातून पलायन करण्यापूर्वी त्याने परदेशात मालमत्ता खरेदी केल्याचा दावा सीबीआयने (CBI) मल्याविरोधात विशेष न्यायालयात दाखल केलेल्या पुरवणी आरोपपत्रात केला आहे.

किंगफिशर एअरलाइन्ससाठी घेतलेले कर्ज फेडण्यासाठी मल्याकडे २००८ ते २०१७ या कालावधीत बँकांची परतफेड करण्याकरिता पुरेसा पैसा होता. मल्याने संपूर्ण युरोपमध्ये वैयक्तिक मालमत्ता खरेदी केली असून स्वित्झर्लंडमधील त्याच्या मुलांच्या ट्रस्टमध्ये पैसेही हस्तांतरित केल्याचा दावा सीबीआयने केला आहे.

मल्यावर १७ बँकांचे ९०० कोटी रुपयांचे कर्ज आहे. परंतु त्याच्या मालकीची किंगफिशर एअरलाइन्स आर्थिक अडचणीत सापडली होती आणि बँकांना त्याच्याकडून पैसे वसूल करता येत नव्हते. मात्र त्याचवेळी मल्याने २०१५-१६ मध्ये इंग्लंड आणि फ्रान्समध्ये ३३० कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केल्याचे सीबीआयने म्हटले आहे.

न्यायालयाच्या परवानगीनंतर सीबीआयने विविध देशांना पत्र पाठवून मल्याच्या परदेशीतील व्यवहारांची आणि मालमत्तेची तपशीलवार माहिती मागवली. त्यात मल्याने फ्रान्समध्ये ३५ दशलक्ष युरोमध्ये स्थावर मालमत्ता खरेदी केल्याचे आणि गिझमो होल्डिंग्स या मालकीच्या एका कंपनीच्या खात्यातून आठ दशलक्ष युरो भरण्याची मागणी केल्याची माहिती मिळाल्याचा दावाही सीबीआयने केला.

मल्याने २०१६ मध्ये देशातून पलायन केले आता तो ब्रिटनमध्ये वास्तव्यास असून त्याच्यावर खटला चालवता यावा यासाठी त्याला भारतात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. सीबीआयने यापूर्वीच्या आरोपपत्रात मल्यासह ११ जणांना आरोपी दाखवले होते. पुरवणी आरोपपत्रात आयडीबीआय बँकेचे माजी महाव्यवस्थापक बुद्धदेव दासगुप्ता यांनाही आरोपी केले असून कथितपणे आपल्या अधिकृत पदाचा गैरवापर केल्याचा आणि आयडीबीआय बँक अधिकारी आणि मल्यासह कट रचून ऑक्टोबर २००९ मध्ये १५० कोटी रुपयांचे अल्प-मुदतीचे कर्ज मंजूर करून ते वितरीत केले, असा आरोप सीबीआयने दासगुप्ता यांच्यावर केला आहे.

Web Title: Vijay mallya had enough money to repay the loan cbi in charge sheet nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 23, 2023 | 09:41 PM

Topics:  

  • CBI
  • maharashtra
  • Mumbai
  • Mumbai News
  • Vijay Mallya

संबंधित बातम्या

Mithi River Project: अदानी समुहाला आणखी एक कंत्राट; ‘मिठी’ प्रकल्पासाठी १७०० कोटी, निविदा प्रक्रियाही पूर्ण
1

Mithi River Project: अदानी समुहाला आणखी एक कंत्राट; ‘मिठी’ प्रकल्पासाठी १७०० कोटी, निविदा प्रक्रियाही पूर्ण

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती
2

कामधेनू लिमिटेडची मोठी घोषणा! महाराष्ट्रात ‘कलर मॅक्स शीट’ उत्पादन क्षमतेत २५% वाढ; मजबूत बाजारपेठेसाठी नवी रणनीती

Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ
3

Mumbai Crime : मुंबईत पाच वर्षांत २ हजार कोटींची सायबर फसवणूक, ओटीपी शेअरिंगद्वारे फसवणूक गुन्ह्यांत वाढ

Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय
4

Maharashtra Government Holiday : २ डिसेंबरला सार्वजनिक सुट्टी जाहीर, नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीसाठी निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.