Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Nashik News : निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्‌याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रविवारी (दि.११) येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते.

  • By श्वेता झगडे
Updated On: Jan 13, 2026 | 06:37 PM
निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

निळवंडीत आढळले चार बछडे; दिंडोरी तालुक्यातील शेतकरी, ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण

Follow Us
Close
Follow Us:

वणी : दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात बिबट्याचा नियमित वावर असल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रविवारी सकाळी ऊसतोडणी सुरू असताना चक्क बिबट्याचे चार बछडे आढळून आल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे शेतकरी व ऊसतोड मजुरांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे.

मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे

निळवंडी येथे अनेक दिवसांपासून बिबट्‌याचा धुमाकूळ सुरु आहे. सध्या या भागात ऊसतोडणी सुरु असल्याने बिबट्याचे वारंवार दर्शन होत आहे. रविवारी (दि.११) येथील शेतकरी अंबादास दगू पाटील यांच्या शेतात ऊसतोडणीचे काम सुरू होते. सकाळी आठच्या सुमारास मजूर ऊसतोडणी कामात व्यस्त असतांना ऊसाच्या दाट पाचटात बिबट्याचे दोन लहान बछडे दिसून आले.

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत

अचानक बछडे समोर आल्याने ऊसतोड मजूरांची मोठी धावपळ उडाली. त्यांनी तातडीने ही माहिती शेतमालक अंबादास पाटील यांना दिली. त्यानंतर शेजारीच असलेल्या चंदू भास्कर पाटील यांच्याही शेतात ऊसतोडणीचे काम सुरू असतांना दुपारी दोनच्या दरम्यान दोन बछडे आढळले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेत संबंधित शेतकऱ्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिली. माहिती मिळताच वन विभागाचे वनपाल भटू बागूल यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक गोरख गांगोडे, बनमजूर शिरसाठ, गांगोडे यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. संबंधित ठिकाणी ऊसतोडणी थांबवण्याचे आदेश देण्यात आले असून, मादी बिबट्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी परिसरात ट्रॅप कॅमेरे बसवण्यात आले आहेत. हे बछडे साधारणतः पंधरा ते वीस दिवसांचे असल्याचे वनरक्षक गोरख गांगोडे यांनी सांगितले.

शेतमजुरांचा कामावर येण्यास नकार

सध्या रब्बी हंगामामुळे शेतशिवारात हिरवळ असून, बिबट्याला लपण्यासाठी सुरक्षित ठिकाणे मिळत असल्याने तो कधी आणि कुठून हल्ला करेल याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे. बिबट्याच्या भीतीने अनेक शेतकरी रात्री पिकांना पाणी देण्यास धजावत नाहीत. बछडे आढळल्याने शेतमजुरांनी शेतात येण्यास नकार दिला असून, मादी बिबट्या परिसरातच असल्याची शक्यता अधिक बळावली आहे.

येथे बिबट्यांना लपवण्यासाठी जागा असल्याने शेतकऱ्यांनी सावधगिरीने शेतात काम करावे, पशुधन बंदिस्त गोठचात बांधावे, जनावरे गोठ्यात बांधावी, बाहेर लाईट लावावी, लहान बालके व वयोवृद्धांना एकटे घराबाहेर पडू देवू नये, रात्री बाहेर पड़तांना बॅटरीचा वापर करावा. विबटट्वाची हालचाल आढळल्यास वन विभागाशी संपर्क करावा, वनरक्षक दिंडोरी गोरख गांगोडे यांनी प्रतिक्रिया दिली.

मागील काळात निळवंडीत विबटवाने दोन शाळकरी मुलांचा जीव घेतला आहे.चार बछडे सापडल्याने शेतकरी व ऊसतोड कामगारांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. वन विभागाने या परिसरात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी पिंजरा लावावा, अशी प्रतिक्रिया शेतकरी निळवंडी अंबादास पाटील यांनी दिली.

Nashik News : नायलॉन मांजाविरोधात सिन्नरला कडक मोहीम, पोलिसांची दोन विशेष पथके तैनात; विक्रेते, वापरकर्त्यांवरही थेट कारवाई

Web Title: Four calves found in nilvandi atmosphere of fear among farmers and sugarcane workers in dindori taluka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 13, 2026 | 06:37 PM

Topics:  

  • Leopard
  • maharashtra
  • Nashik

संबंधित बातम्या

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले
1

जोगेश्वरी-विक्रोळी लिंक रोडवर मोठी वाहतूक कोंडी, ६० फूट खोल दरीवर बांधलेल्या पुलाचे रेलिंग तुटले

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन
2

Amravati News : व्यसनाच्या गर्तेतून बाहेर पडले ३३२२ तरुण, अमरावती विभागातील व्यसनमुक्ती केंद्रातर्फे यशस्वी पुनर्वसन

बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध! महाराष्ट्र शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
3

बारावीचे हॉल तिकीट उपलब्ध! महाराष्ट्र शिक्षण मंडळाने विद्यार्थ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत
4

Nashik Crime : सराईत चेनस्नॅचरच्या मुसक्या आवळल्या, २४ गुन्हे उघडकीस; १३ तोळे सोने हस्तगत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.