काँग्रेसचे आमदार आणि नेते विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषद घेत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. उद्धव ठाकरेंची मुलाखत, उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंची युती, विधानभवनात झालेला राडा यावर भाष्य केले आहे. विजय वडेट्टीवार नेमके काय म्हणाले आहेत, ते पाहुयात.
काँग्रेस नेते आणि आमदार विजय वडेट्टीवार म्हणाले, “उद्धव ठाकरे म्हणत आहेत ते बरोबर आहे. आम्ही कोणाकडे बोट दाखवणार नाही. प्रत्येकाला अधिक जागा आपल्या पदरात पाडून घ्यायच्या होत्या. यामध्येच प्रचंड नुकसान झाले हे खरे आहे. लोकसभेत इंडिया आघाडीचे काम चांगले झाले. मात्र विधानसभेच्या वेळेस चर्चा आणि प्लॅनिंगमध्ये आमचा वेळ वाया गेला. लोकसभेनंतर आपणच मुख्यमंत्री होणार असे अनेकांना वाटल होत.”
“लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीत सहा महिन्यात एवढा फरक पडू शकतो का? प्रत्येक राज्यात पाहिले तर विरोधकांना पूर्णपणे नामशेष करणे ही भाजपची रणनीती आहे. विधानसभेच्या वेळेस जागावाटपाचा घोळ झाला. मतदार यादीत देखील घोळ होता, त्यात आम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळाला नाही. ”
पुढे बोलताना वडेट्टीवार म्हणाले, ” राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हा सख्खे नाही चुलत भाऊ आहेतं आम्ही दूरचे भाऊ आहोत. आम्ही विचाराच्या नात्याने मानलेले भाऊ आहोत. त्यामुळे त्यांच्या घरातील गोष्टी ते आम्हाला विचारून करणार नाहीत. एकत्र येणार की नाही हे तेच सांगू शकतात.”
विधानसभेच्या परिसरात झालेल्या राड्यावर बोलताना वडेट्टीवार म्हणाले, “विधानभवनात जे घडले त्यामुळे महाराष्ट्राची लाज गेली. भाजप आमदाराच्या इशाऱ्यावर हल्ला झाला. ही अब्रू मिळवण्यासाठी पुन्हा प्रयत्न करावे लागतील.”
Vijay Wadettiwar: विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका; म्हणाले, “राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या…”
विजय वडेट्टीवारांची भाजपवर सडकून टीका
राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फळबागा, अनेक पिके मोडून पडली आहेत. दरम्यान आता राज्यातील या स्थितीवरुन कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अवकाळी पावसावर बोलताना म्हणाले, “अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान आहे. पान नुकसणीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश अजून सरकारने दिलेले नाहीत. इतकं नुकसान होउनही शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार का? समजून घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन रब्बी पिकांच्या नुकसणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही करणार आहे.”