विजय वडेट्टीवार यांची सरकारवर टीका (फोटो- सोशल मिडिया)
नागपूर: राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पाऊस कोसळत आहे. अवकाळी पावसाने राज्यात अनेक ठिकाणी मोठे नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. फळबागा, अनेक पिके मोडून पडली आहेत. दरम्यान आता राज्यातील या स्थितीवरुन कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केले आहे.
कॉँग्रेस नेते विजय वडेट्टीवार अवकाळी पावसावर बोलताना म्हणाले, “अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान आहे. पान नुकसणीचे पंचनामे करून अहवाल देण्याचे निर्देश अजून सरकारने दिलेले नाहीत. इतकं नुकसान होउनही शेतकऱ्यांच्या व्यथा सरकार का? समजून घेत नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देऊन रब्बी पिकांच्या नुकसणीसाठी शेतकऱ्यांना हेक्टरी पंचवीस हजार रुपये मदत देण्याची मागणी आम्ही करणार आहे.”
अजित पवारांवर काय म्हणाले?
एसटी आणि एससी विभागाचे अनुदान वगळून लाडक्या बहीणींना पैसे देण्याचे काम सुरू आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने तर हे लॉलीपॉप जनतेला दिला जात नाहीये ना? वेळ आल्यावर आम्ही त्यावर बोलू.
“भाजपची नीती वापरा आणि फेका अशी आहे. एका पक्षाचा वापर झाला असेल त्यामुळे दुसरा पक्ष सोबत घ्यायचा, याच्यामध्ये राजनीती स्पष्ट आहे. शरद पवारांची भूमिका काय आहे यावर आताच भाष्य करणे योग्य होणार नाही. एकूणच राष्ट्रवादीची भूमिका भाजपच्या डावपेचाचा भाग आहे.राष्ट्रीय पक्ष कमकुवत झाला की प्रादेशिक पक्ष संपवण्याचे काम करतात. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत राहुल गांधी यांच्या उपस्थितीत दिल्लीत बैठक होणार आहे. त्यात महाराष्ट्रातील प्रमुख नेते जाणार आहेत. त्या बैठकीत निवडणूक कशी लढायची यावर चर्चा होईल,असे विजय वडेट्टीवार म्हणाले.
विजय वडेट्टीवार पुढे बोलताना म्हणाले, “अमेरिकेसमोर भारताला क्षमण्याची गरज काय? अमेरिकेला एवढा महत्व देण्याची गरज काय आहे. भारतीय लष्कर आणि भारतासमोर पाकिस्तानची युद्ध करण्याची लायकी नाहीये.”
शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?
राज्याच्या राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवासांपासून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि ज्येष्ठ नेते शरद पवार पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांना उधाण आले आहे. या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शिंदे गटाचे नेते आणि राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी प्रतिक्रीया दिली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमधील फूट ही कौंटुबिक फूट आहे. त्यामुळे ते एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं आहे. पण त्यांच्या या विधानामुळे मात्र राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत.
Sharad Pawar-Ajit Pawar News: शरद पवार अजित पवार एकत्र येणार…?शिंदे गटाच्या नेत्याचे सूचक विधान
संजय शिरसाट म्हणाले की, “उद्धव ठाकरेंनी दोन्ही काँग्रेससोबत युती करणं हेच चुकीचंच होतं. हे आम्ही त्यांना आधीपासूनच सांगत होते. पण आता त्यांना त्याचा प्रत्यय येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसवाले तुमच्यासोबत जास्त दिवस राहणार नाहीत. हेच आम्ही त्यांना अनेकदा सांगत होतो. पण आता जसजसे त्यांचे भविष्य अंधारमय होत आहे. तसतसे ते टीका करत आहेत. राष्ट्रवादीतील ही फूट कौटुंबिक मानली जात असली तरी ते पुन्हा एकत्र येण्याची शक्यता नाकारता येणार नाही.”