Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 18 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

कोल्हापुरात महापौरनंतर आता उपमहापौर पदासाठी होणार निवडणूक; महाविकास आघाडीकडून ‘या’ नावांना पसंती

येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड होत आहे. या पार्श्वभूमिवर अजिंक्यतारा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक पार पडली.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 03, 2026 | 11:09 AM
कोल्हापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी होणार निवडणूक; महाविकास आघाडीकडून 'या' दोन नावांना पसंती

कोल्हापुरात महापौर, उपमहापौर पदासाठी होणार निवडणूक; महाविकास आघाडीकडून 'या' दोन नावांना पसंती

Follow Us
Follow Us:

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकाकी झुंज देत महाविकास आघाडीच्या ८१ पैकी ३५ जागा निवडून आणल्या होत्या. आघाडीने महापौर आणि उपमहापौर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. महापौरसाठी सचिन शेंडे, तर उपमहापौरसाठी दुर्वास कदम यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला. असे असताना भाजपच्या वतीने रूपाराणी निकम यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे.

येत्या सहा फेब्रुवारी रोजी महापौर, उपमहापौर निवड होत आहे. या पार्श्वभूमिवर अजिंक्यतारा कार्यालय येथे महाविकास आघाडीच्या सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांची बैठक पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार ऋतुराज पाटील होते. यावेळी महाविकास आघाडी पूर्ण ताकदीने महापौर, उपमहापौर लढण्याचा निर्णय घेण्यात आला. नगरसेवक राजेश लाटकर यांनी सध्या महाविकास आघाडीकडे ३५ तर महायुतीकडे ४६ असे संख्याबळ आहे. मात्र, त्यांच्यामध्ये नेतेमंडळी आणि नागरसेवकात ताळमेळ दिसत नाही. याचा फायदा आपल्याला होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांनी, महापौर पदासाठी ओबीसी प्रवर्गातील एकूण आठ नावे वाचून दाखवली. यामध्ये विशाल चव्हाण, विनायक कारंडे, सचिन शेंडे, उमेश पोवार, जयश्री चव्हाण, दिलशाद मुल्ला, प्रतिज्ञा उत्तुरे, पुष्पा नरूटे आदींचा सहभाग होता. या सर्वांना त्यांचे मत विचारण्यात आले. यावेळी सर्वांनी एकमताने निवड समिती जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सांगितले. तर उपमहापौर निवडीसाठी सुद्धा निवड समिती निर्णय जो निर्णय घेईल तो मान्य असल्याचे सर्व नगरसेवक आणि नगरसेविका यांनी सांगितले.

आमदार सतेज पाटील यांच्यासोबत माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी फोनद्वारे चर्चा करून निर्णय घेण्यात आला. यानंतर महापौर पदासाठी सचिन मारुती शेंडे, तर उपमहापौर पदासाठी जेष्ठ नगरसेवक दुर्वास कदम यांचे नाव जाहीर करण्यात आले.

विजय आपलाच; ऋतुराज पाटलांचा दावा

माजी ऋतुराज पाटील यांनी, कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत आपण इतिहास घडवला आहे. सर्वात मोठा पक्ष आपण ठरलो आहोत. या निवडणुकीत आमदार सतेज पाटील यांनी एकट्याने वादळात दिवा लावण्याचे काम केले आहे. फक्त कोल्हापूर नाही तर संपूर्ण राज्याने हा इतिहास पाहिला आहे. सध्या महायुतीच्या नेते मंडळीत आणि नगरसेवक यांच्यामध्ये ताळमेळ नाही, आपण घट्ट राहिलो तर विजय आपलाच आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

…त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार

शिक्षक आमदार जयंत आसगावकर यांनी, चांगला कारभार करण्यासाठी विरोधी पक्ष सक्षम असावा लागतो. यात कमी पडायचं नाही म्हणून आपण लढण्याचा निर्णय घेतला असल्याचे सांगितले. आमदार सतेज पाटील यांचा आदर्श समोर ठेवून ही निवडणूक आपण लढवायची आहे. महायुतीच्या नेतेमंडळी महापौर, उपमहापौर उमेदवारांची भांडणे सोडवण्यात व्यस्त आहेत. त्यांच्यात ताळमेळ नाही हे स्पष्ट दिसत आहे. त्याचा फायदा आपल्याला नक्की होणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

हेदेखील वाचा : Kolhapur Mayoral Election: कोल्हापूर महापौर पदावर इच्छुकांची संख्या वाढली; नाराजी दूर करण्यासाठी करावी लागणार कसरत

Web Title: Elections will be held for the posts of mayor and deputy mayor in kolhapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • Kolhapur Municipal Corporation Elections 2026
  • Maharashtra Politics
  • political news

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?
1

Maharashtra Politics: केंद्रात दोन मंत्रिपदे, शरद पवारांना भाजपची ऑफर, भाजप-राष्ट्रवादीचा मास्टरप्लॅन तयार?

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’
2

‘मतपेढी सुधारण्यासाठी प्रभू श्रीरामाचा आधार’; चंद्रशेखर बावनकुळेंनी उद्धव ठाकरेंच्या ‘रामरक्षा’ पठणाला म्हटले ‘ढोंगीपणा’

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच
3

Maharashtra Politics: जयंत पाटलांना अर्थखाते मिळणार? राष्ट्रवादीच्या सत्ताधाऱ्यांसोबत गुप्त बैठकांचे सत्र सुरूच

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन
4

Maharashtra Breaking News Updates Today: ना कोणताही आवाज, ना धूर; देशात पहिल्यांदाच धावणार हायड्रोजन ट्रेन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.