Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले…

एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 06:11 PM
धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले...

धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याबाबत भाजपच्या नेत्याचं मोठं विधान, म्हणाले...

Follow Us
Close
Follow Us:

पंढरपूर : एसआयटी अहवाल आल्यानंतर धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल निर्णय होईल, असे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी शुक्रवारी पंढरपुरात आले होते. यावेळी मंदिर समितीच्या वतीने मंदिर समितीचे सदस्य ज्ञानेश्वर महाराज जळगावकर, व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी भाजपाचे प्रणव परिचारक, माऊली हळणवर, सुभाष मस्के, तमीम सय्यद, अक्षय वाडेकर, उपविभागीय अधिकारी सचिन इथापे, जलसंपदा विभागाचे अधिक्षक अभियंता खांडेकर, प्रभारी तहसीलदार
सचिन मुळीक, कार्यकारी अभियंता सोमशेखर हरसुरे, नायब तहसीलदार बालाजी पुदलवाड उपस्थित होते.

मंत्री विखे-पाटील म्हणाले, दोन पवार एकत्र यावे अथवा न यावे हा त्यांचा कौटुंबिक विषय आहे. कोणी यासाठी काय साकडे घालावे त्यांची इच्छा आहे. याबाबत व्यक्तीशा टिपणी करणे उचित राहणार नाही.

खाते वाटपावरून कोणतीही नाराजी नाही

मंत्री मंडळात खाते वाटप झाल्यावरून कोणतीही नाराजी नाही. जलसंपदा खाते विभागून दिल्याने नाराजी नाही. या खात्यात खूप काम करण्यासारखे आहे. नदी जोड प्रकल्प, तुटीचे गोदावरी खोरे यात काम करण्यास वाव आहे. महापालिका जिल्हा परिषद निवडणूक महायुती एकत्रपणे लढणार असून आधी दिलेले १० टक्के आरक्षण कायम आहे. मनोज जरांगे यांनी सरकारला वेळ दिला पाहिजे. लगेच उपोषणाला बसू नये, असे मत विखे-पाटील यांनी व्यक्त केले.

हे सुद्धा वाचा : पुण्यात ठाकरे गटात वाद; माजी नगरसेवकांनी विद्यमान पदाधिकाऱ्यांवर फाेडले खापर

बीड प्रकरणावर धनंजय मुंडे काय म्हणाले?

राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना वाल्मिक कराड प्रकरण आणि बीड पोलीस स्टेशनबाहेरील पाच खाटांवरुन सुरू असलेल्या वादातून त्यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर प्रत्युत्तर दिलं. या प्रकरणात दबाव येऊ नये म्हणून विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान माध्यमांशी बोलताना मुंडेंनी आपली भूमिका मांडली. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडी व्यवस्थितपणे तपास करीत आहे. त्यांची हत्या करणाऱ्यांची केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावी आणि दोषीला फासावर लटकवणं माझ्यासाठी आवश्यक असल्याचं मुंडे म्हणाले. या प्रकरणात फास्ट ट्रॅकमध्ये जायला हवं याची मागणी सर्वात आधी मी नागपूरच्या अधिवेशनात केली होती, असंही ते म्हणाले.

मी राजीनामा का द्यावा, कारण काय? मी कोणत्याही प्रकरणात आरोपी नाही. कोणत्याही घटनेशी माझा अर्थाअर्थी संबंध नाही. हा तपास सीआयडीकडे दिला आहे. न्यायालयातही तपास होणार आहे. त्यामुळे मी मंत्री म्हणून या प्रकरणावर कुठलाही दबाव होऊ शकत नाही, असंही धनंजय मुंडे यांनी सांगत या राजीनामा देणार नसल्याचं स्पष्ट केलं.

Web Title: Vikhe patil has given a response regarding the resignation of dhananjay munde nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 06:11 PM

Topics:  

  • ajit pawar
  • Ajit Pawar NCP
  • dhananjay munde
  • Radhakrishna Vikhe Patil

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद
2

Sugarcane Bill : प्रतिटनामागे 15 रुपयांची कपात; सरकारच्या निर्णयावरुन शेतकऱ्यांत संतप्त पडसाद

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी
3

Prakash Ambedkar : पावसानं अतोनात नुकसान! शेतकऱ्यांसाठी प्रकाश आंबेडकरांची मोठी मागणी

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात
4

पूरग्रस्तांसाठी सरकारची शेतकऱ्यांकडूनच वसुली! प्रति टन उसामागे होणार ‘इतक्या’ रुपयांची कपात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.