Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मेटेंचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती यासाठी केलेले कार्य मोठे; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे

शिवसंग्राम संघटनेची (Shiv Sangram Sanghatna)  स्थापना करून मेटे यांनी शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारकासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

  • By Vivek Bhor
Updated On: Aug 17, 2022 | 08:39 PM
मेटेंचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती यासाठी केलेले कार्य मोठे; विधानपरिषद उपसभापती नीलम गोऱ्हे
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई : महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी (Maharashtra Assembly Session Day 1) विधानपरिषदेत माजी राज्यपाल के. शंकरनारायणन, माजी वि.प.स. हरिभाऊ नाईक व माजी आमदार विनायक मेटे (Vinayak Mete) यांच्या निधनाबद्दल शोकप्रस्ताव मांडण्यात आला. मेटेंचे शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती यासाठी केलेले कार्य मोठे असल्याचे उपसाभापती निलम गोऱ्हे (Deputy Speaker Neelam Gorhe) यांनी सांगितले.

शिवसंग्राम संघटनेची (Shiv Sangram Sanghatna)  स्थापना करून मेटे यांनी शेतकरी, शेतमजुरांचे प्रश्न, शेतकऱ्यांची कर्जमुक्ती यासाठी कार्य केले. छत्रपती शिवाजी महाराजांचे अरबी समुद्रात भव्य स्मारकासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले होते.

मराठा समाजाच्या आरक्षणाचे (Maratha Reservation) नेतृत्व करणाऱ्या (Leadership) उमद्या नेत्याचे काही दिवसांपूर्वीच दुःखद निधन झाले, अशा शब्दात डॉ.गोऱ्हे यांनी त्यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला. के. शंकरनारायणन यांनी महाराष्ट्रासह गोवा, राजस्थान,अरुणाचल प्रदेश, नागालँड व झारखंड राज्याचे राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. संसदीय कामकाजाचा प्रदीर्घ अनुभव त्यांना होता. महाराष्ट्रातील अनेक प्रश्न सोडवण्यास ते आग्रही होते. त्यांनी आपल्या सौजन्यशील स्वभावाने राज्यातील जनतेचे प्रेम संपादन केले होते. के.शंकरनारायणन यांच्या शोकप्रस्तावावर बोलताना डॉ.गोऱ्हे म्हणाल्या . तसेच माजी वि.प.स.हरिभाऊ जागोबाजी नाईक यांनी इंडियन नॅशनल टेक्सटाइल वर्कर्स फेडरेशन,राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे अध्यक्ष म्हणून उत्तम कार्य केल्याचे त्यांनी सांगितले.

[read_also content=”उद्या इस्कॉन साजरी करणार जन्माष्टमी; १८ आणि १९ ऑगस्ट असा दोन दिवस साजरा होणार श्रीकृष्ण जन्मोत्सव https://www.navarashtra.com/lifestyle/iskcon-will-celebrate-janmashtami-tomorrow-shri-krishna-birth-anniversary-will-be-celebrated-for-two-days-on-august-18-and-19-nrvb-317148.html”]

शिंदेच्या लॅपटॉपवर विधानसभेचे भाषण आणि गोंधळ

उपसभापती नीलम गोर्‍हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि उपराष्ट्रपती धनखड यांचा जीवनपट मांडत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांच्या लॅपटॉपवर विधानसभेचे भाषण सुरू झाले. अचानक आवाज वाढल्याने शिंदेंची तारांबळ उडाली. विरोधी पक्षातील सदस्य एकनाथ खडसे, भाई जगताप, अमोल मिटकरी आदी आमदार शिंदे यांना साहाय्य करण्यासाठी धावले. मात्र, प्रयत्न करूनही ‘व्हिडिओ’ बंद होत नव्हता. त्यामुळे संपूर्ण सभागृहात कुजबूज वाढली. हा गोंधळ पाहून उपसभापती नीलम गोर्‍हे यांनी ‘सभागृहातील सदस्यांना बारीक आवाजाकडे लक्ष न देता मोठ्या आवाजाने बोलत आहे, ते ऐका’, अशी टिपण्णी केली. तोपर्यंत ‘व्हिडिओ’ही बंद झाला आणि शिंदेंनी सुटकेचा निःश्‍वास सोडला.

Web Title: Vinayak metes work for farmers debt relief is great legislative council deputy speaker neelam gorhe nrvb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2022 | 08:39 PM

Topics:  

  • Maharashtra Assembly Session
  • Maratha Reservation
  • vinayak mete

संबंधित बातम्या

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप
1

देवेंद्र फडणवीसांनी ओबीसी आरक्षण नाकारलं; राष्ट्रवादीचे ओबीसी नेते राज राजापूरकर यांचा आरोप

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार
2

सरकारचं टेन्शन वाढणार! हातकणंगलेतून 25 हजार मराठा बांधव मुंबईला जाणार

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा
3

‘कोणीही आडवा आला, माझा जीव गेला तरी…’; मनोज जरांगे पाटलांचा राज्य सरकारला इशारा

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा
4

Maratha andolan riots : मराठा आरक्षणाचा वाद पेटणार! मुंबईतील आंदोलनात दंगली पेटवण्याचा डाव, जरांगे पाटलांचा गंभीर दावा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.