Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयात जंगी उद्घाटन झाले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 14, 2025 | 12:20 PM
मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

मुळा मुठेच्या किनारी ज्ञानयज्ञ, पुण्यात ग्रंथांची पेठ उभी; पुणे पुस्तक महोत्सवात विश्वास पाटील यांचे विचार

Follow Us
Close
Follow Us:
  • पुस्तक महोत्सवाचे शनिवारी शानदार उद्घाटन
  • विश्वास पाटील यांनी मांडले विचार
  • अनेक राजकीय नेत्यांची उपस्थिती
पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचे शनिवारी फर्ग्युसन महाविद्यालयात जंगी उद्घाटन झाले. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, केंद्रीय नागरी वाहतूक आणि सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी, पुस्तक महोत्सवाचे आयोजक राजेश पांडे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

यावेळी भाषणात विश्वास पाटील यांनी पुण्यातील वाचन संस्कृती तसेच मोबाईलचा सध्या होणारा अतिवापर आणि खास कोल्हापुरी फटकेबाजी करत अनेक मुद्दे मांडले. भाषणावेळी विश्वास पाटील म्हणाले, “आधुनिक काळात गावाची ओळख त्या गावात काय घडतं, यावर अवलंबून असते. मुळा मुठेच्या किनारी हा ज्ञानयज्ञ थाटलेला आहे. अशा पद्धतीचा पुस्तक महोत्सव केवळ दिल्ली आणि कलकत्ता येथेच होतो. अवघ्या दोन वर्षात पुणे पुस्तक महोत्सवाने या दोन्ही महोत्सवाची बरोबरी केली आहे. ५० वर्षाने पुणे पुस्तक महोत्सव कुणी सुरू केला, असा प्रश्न आल्यास. नागरिक राजेश पांडे आणि मिलिंद मराठे यांची नावे घेतील.” “एक दोन ठिकाणी मी गंमतीने म्हणालेलो आहे की, पुण्यात जे काम 500 “देशपांड्यांना” जमणार नाही ते एकटे राजेश पांडे करत असतो. सळसळ लागते एवढे सगळे करायला,” असे ही ते म्हणाले.

राजकीय मुद्दे मांडत असताना विश्वास पाटील म्हणाले, “राजकारण डावपेच करण्या अगोदर कुस्ती डावपेच शिकतात, अगोदर ते शिकावे लागते यात मोहोळ, लांडगे हे आधी दोघे शिकले आणि नंतर राजकारणात आले. चंद्रकांत पाटील कोल्हापूर तालमीत शिकले आणि पुण्यात का आणले कारण पुण्याच्या वैभवात भर घालण्यासाठी आणलेले असावे, पंचवटीच्या नदीत वाढलेले रोपटं मुळा-मुठेमध्ये वाढलं तर त्याचा वटवृक्ष होतो.”

वाचन संस्कृती बद्दल मत मांडताना ते म्हणाले, “आजच्या काळात प्रत्येक भारतीय सरासरी सहा तास मोबाईलवर घालवत असल्याने एक गंभीर धोका निर्माण झाला आहे. ज्या वेळी लोक मोबाईलच्या स्क्रीनचे गुलाम होत चालले आहेत, त्यावेळी असे पुस्तक महोत्सव लोकांना केवळ पुस्तके खरेदी करण्याचीच नव्हे, तर विचारांची देवाणघेवाण करण्याचीही आशा आणि व्यासपीठ देतात.”

ज्ञान प्रणाली ग्रंथ दिंडीचे पुण्यात आयोजन

पुणे पुस्तक महोत्सवाला सुरुवात झाली. शनिवारचे औचित्य साधत मोठया संख्येने पुणेकरांनी पहिल्याच दिवशी या महोत्सवाला भेट दिली. तत्पूर्वी मॉडर्न महाविद्यालय शिवाजीनगर येथून ज्ञानप्रणाली ग्रंथदिंडी काढण्यात आली. या दिंडीमध्ये पुण्यातील दीडशे महाविद्यालयातील विद्यार्थी सहभागी झाले होते. या ग्रंथदिंडीला मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वज दाखवून सुरुवात करण्यात आली. या दिंडी मध्ये पारंपारिक खेळासह विज्ञानावर आधारित देखावे पाहायला मिळाले. शहरातील जंगली महाराज रोड ते फर्ग्युसन महाविद्यालयापर्यत ही ज्ञान प्रणाली ग्रंथ दिंडी काढण्यात आली.

पुणे पुस्तक महोत्सवात पहिला विश्वविक्रम

पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्घाटनापूर्वीच “लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स” हा विश्वविक्रम गिनिज वर्ल्ड रेकॉर्डसमध्ये प्रस्थापित करण्यात आला. राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या (एनबीटी) वतीने आयोजित होणाऱ्या पुणे पुस्तक महोत्सवाची सुरुवात शनिवारपासून झाली. या पार्श्वभूमीवर आदिवासी समाजासाठी थोर काम केलेल्या भगवान बिरसा मुंडा यांचे विशेष दालन उभारण्यात आले आहे. भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याला अभिवादन करण्यासाठी लाखो आदिवासी शब्दांच्या साहाय्याने पोस्टर प्रदर्शित करून, विश्वविक्रम जाहीर करण्यात आला आहे.

लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम यापूर्वी अमेरिकेच्या नावावर होता. अमेरिकेने फेब्रुवारी २०२५ मध्ये १३६५ पोस्टर्सच्या सहाय्याने हा विक्रम केला होता आता हाच विषय उपक्रम पुणे पुस्तक महोत्सवात मोडीत निघाला. १६७८ पोस्टर्स च्या सहाय्याने नवा लार्जेस्ट डिस्प्ले ऑफ पोस्टर्स हा विश्वविक्रम प्रस्थापित करण्यात आला.

Web Title: Vishwas patil president of marathi sahitya sammelan presented his views at the pune book festival

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 14, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • chandrakant patil
  • murlidhar mohol
  • pune news

संबंधित बातम्या

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली
1

काँग्रेसकडून उमेदवारीसाठी इच्छुकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; अर्ज स्वीकारण्याची मुदत वाढवली

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती
2

Pune Election : उमेदवारी देण्यासाठी भाजपच्या नेत्यांची होणार दमछाक; 165 जागांसाठी 2500 जणांच्या मुलाखती

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…
3

Maharashtra Politics: भाजपच्या ‘फास्ट ट्रॅक’ मुलाखतींमुळे इच्छुकांमध्ये धाकधूक; ४१ प्रभाग अन् २५००…

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल
4

Pune News: शहराच्या जीवनवाहिनीला ‘ब्रेकडाऊन’ चा आजार; दररोज ६१ बसेस…; प्रवाशांचे हाल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.