
दृष्टिहीन गोविंदांच्या जिद्दीला सलाम! दहीहंडी पथकांना लाखोंचे प्रोत्साहन; हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतीने शिबिराचे आयोजन
दहीहंडी उत्सवाची चाहूल लागताच मुंबईसह उपनगरांमध्ये गोविंदा पथकांच्या सरावाला वेग आला आहे. भांडुप पश्चिम येथील भांडुप व्हिलेज रोड येथे हिंदू प्राण प्रतिष्ठानच्या वतिने या गोविंदा सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या सराव शिबिराला ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून विविध गोविंदा पथकांचा उत्साह वाढविला. यावेळी त्यांनी गोविंदा पथकांना प्रोत्साहन देण्यासाठी लाखो रुपयांची आर्थिक मदत देत त्यांच्या मेहनतीला व जिद्दीला पाठबळ दिले. या सराव शिबीराला विशेष अतिथी म्हणून नगरसेविका राजोल संजय पाटील यांचीही उपस्थिती होती.(फोटो सौजन्य – AI)
राज्यातील तब्बल 2.07 कोटी मतदारांची नावे यादीतून वगळली; तुमचंही नाव नसेल तर ‘हे’ नक्की करा…
तसेच महिला दहिहंडी पथकानेही या सराव शिबीरात सहभाग घेतल्याने ते देखील आकर्षनाचे केंद्रबिंदु ठरले, महिला दहिहंडी पथकाचे मनोबल वाढावे म्हणुन त्यांनाही प्रोत्साहन म्हणून रोख रक्कम देण्यात आली. दहीहंडी उत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या विविध गोविंदा पथकांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या सरावाला आणि उपक्रमांना आर्थिक पाठबळ मिळावे, या उद्देशाने खासदार संजय दिना पाटील यांच्या माध्यमातून विविध पथकांना प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली. यामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बाप्पा मोरया गोविंदा पथकाला १ लाख ११ हजार रुपये, यशवंत चांदजी महिला गोविंदा पथकाला ५१ हजार रुपये, प्रभात मित्र मंडळाला २५ हजार रुपये तर विक्रोळी येथील जय हनुमान बाळ गोपाळ मित्र मंडळ, संजीवनी क्रीडा मंडळ, साई कृपा गोविंदा पथक तसेच भारत माता महिला मंडळाला प्रत्येकी ११ हजार रुपये प्रोत्साहनपर रक्कम देण्यात आली.
या सराव शिबिराचे विशेष आकर्षण ठरले ते म्हणजे वसई येथील कला संजीवनी गोविंदा पथकातील दृष्टिहीन गोविंदांचा सहभाग. दृष्टी नसतानाही आत्मविश्वास, जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर या गोविंदांनी दहीहंडी फोडून उपस्थितांची मने जिंकली, त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीचे खासदारांनी विशेष कौतुक केले. त्यांनी या पथकाला १ लाख ११ हजार रुपयांची प्रोत्साहनपर रक्कम देऊन त्यांच्या जिद्दीला सलाम केला. दृष्टी नसतानाही दहीहंडीच्या सरावात सहभागी होऊन आपल्या कलेचे आणि क्षमतेचे दर्शन घडविणाऱ्या या गोविंदांचे कौतुक करताना त्यांचे मनोबल वाढविले. त्यांच्या उपस्थितीमुळे गोविंदा पथकातील तरुणांमध्येही मोठा उत्साह निर्माण झाला. खासदारांनी स्वतः सराव शिबिराला उपस्थित राहून गोविंदांशी संवाद साधला व त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले.
विशेषतः कला संजीवनी गोविंदा पथक, वसई या दृष्टिहीन गोविंदांच्या पथकाला देण्यात आलेली १ लाख ११ हजार रुपयांची मदत उपस्थितांसाठी कौतुकाचा विषय ठरला. दृष्टी नसतानाही केवळ जिद्द, मेहनत आणि आत्मविश्वासाच्या बळावर हे गोविंदा दहीहंडीच्या सरावात सहभागी होत असल्याने त्यांच्या प्रयत्नांना खासदार संजय दिना पाटील यांनी दिलेले हे आर्थिक प्रोत्साहन त्यांच्या मनोबलासाठी महत्त्वाचे ठरले. दहीहंडी हा केवळ उत्सव नसून त्यामध्ये शिस्त, संघभावना, धाडस, परिश्रम आणि एकजुटीचा संदेश दडलेला आहे. गोविंदा पथकातील तरुण अनेक दिवस आधीपासून सराव करून दहीहंडी उत्सवासाठी सज्ज होत असतात, त्यांच्या या मेहनतीला लोकप्रतिनिधी म्हणून प्रोत्साहन मिळावे, यासाठी सराव शिबिराला प्रत्यक्ष उपस्थित राहण्यास प्राधान्य दिले.