Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 21 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! संपू्र्ण परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

आषाढी एकादशीच्या निमित्ताने मंदिर परिसरात विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट्स, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Jul 20, 2026 | 03:30 PM
तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! मंदिर परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

तेजोत्सवात न्हाले विठ्ठल मंदिर! मंदिर परिसर झाला प्रकाशमय; पंढरीचे आध्यात्मिक वैभव खुलले

Follow Us
Follow Us:

आषाढी यात्रेनिमित्त श्रीक्षेत्र पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर दिव्य प्रकाशाने उजळून निघाले असून, आकर्षक विद्युत रोषणाईमुळे पंढरीचे आध्यात्मिक आणि ऐतिहासिक वैभव अधिक खुलून आले आहे. मंदिराचा गाभारा, कळस, श्री संत तुकाराम भवन, श्री विठ्ठल-रुक्मिणी भक्तनिवास तसेच श्री संत ज्ञानेश्वर दर्शन मंडप विविधरंगी प्रकाशाने न्हाऊन निघाल्याने लाखो वारकरी आणि भाविक या प्रकाशमय सोहळ्याने भारावून जात आहेत. आषाढी यात्रेसाठी राज्यासह देशभरातून आलेले भाविक दिवसभर विठुरायाच्या दर्शनाचा लाभ घेत आहेत, तर रात्रीच्या वेळी मंदिरावरील आकर्षक रोषणाई पाहण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत. सूर्यास्तानंतर संपूर्ण मंदिर परिसर रंगीबेरंगी प्रकाशझोतांनी उजळून निघतो. या मनमोहक दृश्यामुळे पंढरीच्या भक्तिमय वातावरणात आणखी भर पडली आहे.(फोटो सौजन्य – सोशल मीडिया)

‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत

संवर्धनानंतर मंदिराचे सौंदर्य अधिक खुललेश्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या जतन व संवर्धनाची कामे सध्या अंतिम टप्प्यात आहेत. या कामांमुळे मंदिराचे प्राचीन स्थापत्य सौंदर्य पुन्हा उजळून आले आहे. त्यावर करण्यात आलेल्या आधुनिक विद्युत रोषणाईमुळे मंदिराच्या ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वैभवाला नवा साज चढला आहे.

लाईट आर्टिकल्सचा मोठ्या प्रमाणात वापर

मंदिर परिसरातील विद्युत रोषणाईसाठी अत्याधुनिक एलईडी माळा, रोप लाईट्स, आकर्षक लटकन, सजावटीची तोरणे, व्हाईट व वॉर्म फोकस लाईट्स तसेच विविध डेकोरेटिव्ह लाईट आर्टिकल्सचा वापर करण्यात आला आहे. भाविकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संपूर्ण विद्युत व्यवस्था आधुनिक सुरक्षा मानकांनुसार उभारण्यात आली आहे. श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने ही आकर्षक विद्युत रोषणाई साकारण्यात आली आहे. नियोजनापासून प्रत्यक्ष अंमलबजावणीपर्यंतची जबाबदारी मंदिर समितीचे विद्युत विभाग प्रमुख राजेश तेलतुंबडे यांनी यशस्वीपणे पार पाडल्याने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

विठ्ठल मूर्ती लेपनाचा मार्ग मोकळा; न्यायालयाने स्थगितीची मागणी फेटाळली. 23-24 जूनला लेपन प्रक्रिया निश्चित

रोषणाईचे आकर्षण:

श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराचा कळस, गाभारा प्रकाशमय
श्री संत तुकाराम भवन, भक्तनिवास व दर्शन मंडपाला आकर्षक सजावट
अत्याधुनिक एलईडी दिव्या, रात्रीच्या वेळी रोषणाई पाहण्यासाठी भाविकांची गर्दी

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Vitthal temple glows during tejotsav as pandharpur shines in divine splendour

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2026 | 03:30 PM

Topics:  

  • aashadhi ekadashi
  • Ashadhi Wari 2026
  • pandharpur

संबंधित बातम्या

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना
1

‘सन मराठी’चा अनोखा पुढाकार, ‘इच्छा कलश’मधून विठुरायाच्या चरणी पोहोचणार भक्तांच्या मनोकामना

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा
2

Marathi Serial: ‘सावळ्याची जणू सावली’ टीम पंढरपुरात; ‘स्वर पंढरी’च्या माध्यमातून साजरा केला यशाचा खास सोहळा

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
3

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी
4

आषाढी एकादशीला विठ्ठल रुक्मिणीच्या प्रसादासाठी झटपट बनवा साजुक तुपातला शिरा, नोट करून घ्या रेसिपी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.