Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मतदान भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाचे आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मोदी राणे हे कोकणच्या विकासाचे खरे कॉम्बिनेशन असल्याचे स्पष्ट करत मोदीना मतदान करण्यासाठी कमळासमोरील बटण दाबण्याचे आवाहान

  • By शुभांगी मेरे
Updated On: Apr 27, 2024 | 11:18 AM
मतदान भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाचे आहे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
Follow Us
Close
Follow Us:

राजापूर : रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार केंद्रिय मंत्री नारायण राणे यांच्या प्रचारार्थ उपमुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे राजापूरात आले होते. राजापूर शहरातील राजीव गांधी मैदानावर पार पडलेल्या या प्रचार सभेसाठी राज्याचे उद्योगमंत्री आणि रत्नागिरीचे पालक मंत्री उदय सामंत, शिक्षणमंत्री दिपक केसरकर, बांधकाम मंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री रविंद्र चव्हाण, केंद्रिय मंत्री नारायण राणे, आमदार नितेश राणे आणि महायुतीतील सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

यावेळी सभेमध्ये बोलताना राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळचे मतदान हे भाजपासाठी नाही तर भारतासाठी महत्वाचे आहे असे सांगितले. यावेळी तुमच्यासमोर दोनच पर्याय आहेत एक नरेंद्र मोदी तर दुसरा राहुल गांधी. राहुल गांधींच्या इंजिनमध्ये फक्त सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनाच जागा आहे तर मोदींचे इंजिन सर्वसामान्य जनतेचे आहे. त्यामुळे कोकणाच्या भविष्यासाठी राणे मोदी हे कॉंबिनेशन खुप महत्वाचे आहे. राणे जगात कुठेही असले तरी त्यांच्या डोळ्यासमोर फक्त आणि कोकण असतो असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजापूर येथील सभे दरम्यान केले.

पुढे देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ही निवडणुक देशासाठी अत्यंत महत्वाची आहे. लोकसभेची ही निवडणुक कोणत्याही ग्रामपंचायत, नगरपालिका, जिल्हा परिषद याची निवडणुक नाही तर देशाला कोण पुढील पाच वर्ष सुरक्षित ठेवु शकतो हे ठरवण्याची आहे. त्यामुळे जान है तो जहा है यासाठी मतदान करणे गरजेचे असल्याचे मत फडणवीस यानी मांडले. गेल्या दहा वर्षाच्या काळात मोदी पंतप्रधान असताना त्यानी केलेल्या सर्व विकासात्मक कामांचा आढावा त्यानी यावेळी घेतला. अर्थव्यवस्था मोठी झाली तर संधी तयार होतात आणि संधी तयार झाल्या कि आपोआप उद्योग येतात असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

गेल्या दहा वर्षात मोदींनी देश बदलला आहे. समाजातल्या प्रत्येक घटकाला सोबत घेऊन मोदी पुढे चालत आहेत. बारा बलुतेदारांसाठी योजना आणली व त्यांचा विकास बळकट केला. कोविडनंतर पुढची फक्टरी ऑफ वर्ल्ड फक्त भारत असल्याचे सगळे जग मानते आहे. आज जगाच्या आशा भारताकडे आहेत. त्यामुळे पुन्हा मोदी पंतप्रधान बनने हे देशहिताचे आहे. मोदीना मत देण्यासाठी केंद्रिय मंत्री नारायण राणेना मत द्या. राणे मोदींसोबत असतील तर कोकणच्या विकासासाठी निधी आणतील आणि कोकणचा विकास दुप्पट वेगाने होईल. राणे मोदी हेच कोकणच्या विकासाचे कॉम्बिनेशन आहे असेही यावेळी फडणवीस म्हणाले.

२०१९ नंतर पाकिस्तानची भारताकडे डोळेवर करुन पहायची एकदाही हिम्मत झाली नाही. आता देशात एकही बॉम्बस्फोट होत नाही. मोदीनी देशाच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य दिले आहे. आज आपल्या देशाकडे सात किलोमीटरवर लपलेल्या शत्रूचे तळ उध्दवस्त करण्याचे सामर्थ्य असणारे क्षेपणास्त्र आहे. अशी क्षमता फक्त अमेरिका व चायनाकडेच होती. मात्र आता मोदींनी देशाला पुढे नेले असल्याचेही त्यानी यावेळी सांगितले.

महाराष्ट्र आज देशात औदयोगिक राज्य म्हणुन ओळखले जात असुन गेल्या दोन वर्षात पुन्हा महाराष्ट्र देशात औद्योगिक क्षेत्रात एक नंबरवर आहे. हे केवळ महाराष्ट्र मोदींबरोबर असल्यामुळे शक्य आहे. आता राज्यात वसुली सरकार नाही तर विकासाचे सरकार आहे. मागचे अडिच वर्षाचे सरकार वसुली सरकार होते अशी टिका त्यानी यावेळी आपल्या भाषणात केली.

Web Title: Voting is important not for bjp but for india deputy chief minister devendra fadnavis loksabha elections maharashtra politics maharashtra political party

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 27, 2024 | 11:18 AM

Topics:  

  • Deputy Chief Minister Devendra Fadnavis
  • india
  • Loksabha Elections
  • loksabha elections 2024

संबंधित बातम्या

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड
1

Intelligence Alert : नेपाळ-बांगलादेशनंतर आता भारतातही घडवून आणणार गृहयुद्ध? ISIच्या हेरगिरी नेटवर्कबद्दल थरारक खुलासा उघड

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय
2

Delhi Riots Case : “उमर खालिद आणि शरजील इमाम तुरुंगातच राहणार…”, दिल्ली दंगल कटप्रकरणी सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Nigeria Drug Seized: नायजेरियात भारतीय खलाशांना बेड्या! जहाजात सापडलं 31.5 किलो कोकेन; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश
3

Nigeria Drug Seized: नायजेरियात भारतीय खलाशांना बेड्या! जहाजात सापडलं 31.5 किलो कोकेन; आंतरराष्ट्रीय ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!
4

India-Venezuela Crisis: अमेरिकेची मादुरोवर अ‍ॅक्शन, ट्रम्प यांचा तेलावर ताबा; पण ‘या’ एका निर्णयामुळे भारताची लागली लॉटरी!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.