
KDMC Election: केडीएमसी निवडणूक रणधुमाळी! २० उमेदवार बिनविरोध तर उद्या उर्वरित जागांचा निकाल
KDMC Election: कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या निवडणूकीसाठी १५ जानेवारीला मतदान झाले. निवडणूकीच्या पहिल्या टप्प्यात १२२ पैकी २० उमेदवार हे बिनविरोध निवडून आले आहे. १०२ जागांकरीता मतदान पार पडल्यावर १६ जानेवारी आठ मतमोजणी केंद्र असणार आहेत. या मतमोजणी केंद्रातील मतमोजणी साठी १३० टेबल असणार असून १५९ फेऱ्या होणार आहेत. मतमोजणीला सकाळी १० वाजल्या पासून सुरु होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी ९ असले तरी निवडणूक निर्णय अधिकारी २ व निर्णय अधिकारी ४ ची मतमोजणी एकाच ठिकाणी होणार आहे. दुपारी २ वाजेपर्यंत बहुतांश जागांचे चित्र स्पष्ट होऊन निकाल जाहिर होतील असा अंदाज मतमोजणी यंत्रणेकडून व्यक्त करण्यात आला आहे.
हेही वाचा: BMC Election 2026 : नेलपेंट रिमूव्हरने पुसली जातीये मतदानाची शाई; रोहित पवारांनी थेट शेअर केला VIDEO
निवडणूक मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक २ मध्ये ७ मतमोजणी १७ टेबल्सवर संपन्न होणार असून, पॅनल क्रमांक ३ मध्ये ७ फेऱ्या व पॅनल क्रमांक ४ मध्ये ५ फेऱ्या होणार आहेत. निर्णय अधिकारी २ यांचे पॅनल क्रमांक १,५,६,१० व निवडणूक निर्णय अधिकारी – ४ यांचे कडील पॅनल क्रमांक ११,१२ व १८ ची मतमोजणी मुंबई विद्यापीठ याचे उपकेंद्र, वसंतव्हॅली, खडकपाडा कल्याण (पश्चिम), येथे होणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी २ यांचे मतमोजणी १४ टेबल्सवर वर संपन्न होणार आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी यांचेकडील मतमोजणी प्रभाग क्षेत्र कार्यालय, तळ मजल्यावरील वाहन पार्किंग क्षेत्र, आधारवाडी, कल्याण (पश्चिम), येथे होणार आहे. मतमोजणी १४ टेबल्सवर होणार असून, मतमोजणी प्रभागनिहाय पॅनल क्रमांक ७ मध्ये ४ फेऱ्या, पॅनल क्रमांक ८ मध्ये ५ फेऱ्या व पॅनल क्रमांक ९ मध्ये ४ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी- ५ यांचेकडील मतमोजणी साकेत कॉलेज, १०० फुटी रस्ता, राम म्हात्रे चौक, येथे होणार आहे. मतमोजणी १६ टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी प्रभाग निहाय पॅनल क्रमांक १३ मध्ये ३ फेऱ्या, पॅनल क्रमांक १४ मध्ये ३ फेऱ्या आहेत.
मतमोजणी टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी पॅनल क्रमांक २९ मध्ये ९ फेऱ्या व पॅनल क्रमांक ३० मध्ये ९ फेऱ्या होणार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी -९ यांचेकडील मतमोजणी सावित्रीबाई फुले कलामंदिर, घरडा सर्कल, डोंबिवली (पूर्व) येथे होणार आहे.
मतमोजणी १६ टेबल्सवर संपन्न होणार असून, मतमोजणी एकाचवेळी चैनल क्रमांक १७ मध्ये १३ फेऱ्या , पॅनल क्रमांक १९ मध्ये १२ फेऱ्या व पॅनल क्रमांक ३१ मध्ये १३ फेऱ्या होणार आहेत.