Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • TCS Nashik Case |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नगराध्यक्षांसह उमेदवारांचे भवितव्य मशीनमध्ये बंद; EVM मध्ये तांत्रिक बिघाडानंतरही सोलापूरमध्ये मतदान जोरदार

जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १० नगरपरिषदेसाठी मंगळवार, रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रकियेस प्रारंभ झाला. मोठ्या उत्साहामध्ये मतदारांनी हक्का बजावला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 02, 2025 | 06:00 PM
Voting process for 10 municipal councils completed in Solapur local body elections

Voting process for 10 municipal councils completed in Solapur local body elections

Follow Us
Close
Follow Us:

Maharashtra Local Body Elections : सोलापूर : आज सकाळपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी जोरदार मतदान होत आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये मोठ्या उत्साहात मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सोलापूरमध्ये पोलिसांच्या चोख बंदोबस्तात निवडणूक मतदान प्रक्रिया पार पाडण्यात आली. नगराध्यक्षांसह नगरसेवकांचे भवितव्य ईव्हीएममध्ये सायंकाळी बंद करण्यात आले. सांगोला येथील विद्यामंदिर प्रशाला,जिल्हा परिषद शाळा धनगर गल्ली, जिल्हा परिषद शाळा,भोपळे रोड येथील मतदान केंद्रातील ईव्हीएम मशीनमधील बटण दाबण्यात अडचण आल्याने ईव्हीएम मशीन या केंद्रातील बदलण्यात आले आहेत. अशी माहिती सांगोला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक निर्णय अधिकारी सैफन नदाफ यांनी पत्राद्वारे निवडणूक आयोगाला कळविले आहे.

जिल्ह्यातील ९ तालुक्यातील १० नगरपरिषदेसाठी मंगळवार, रोजी सकाळी ७:३० वाजल्यापासून मतदान प्रकियेस प्रारंभ झाला. जिल्ह्यात एकूण ४९९ मतदान केंद्र असून, १३२२ बॅलेट युनिट व ६११ कंट्रोल युनिटच्या माध्यमातून मतदान घेण्यात आले . मतदान प्रकिया शांततेत व व्यवस्थितपणे पार पाडण्यासाठी बूथ व केंद्रनिहाय तीन पोलीस तैनात करण्यात आले होते. एक हजार पोलिसांचा फौजफाटा आहे. २७०० हुन अधिक प्रशिक्षणार्थी कर्मचारी निवडणूक प्रकियेत सहभाग घेतला आहेत. दि. २१ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी प्रकिया ज्या-त्या ठिकाणी असणाऱ्या शासकीय गोडावून येथे पार पडणार आहे. मतदान केंद्र आणि मतमोजणी परिसरात पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला.

लोकशाहीची ऐशी की तैशी? एकनाथ शिंदेंच्या बॅगांवरुन खासदार संजय राऊतांची टीका

मोहोळ येथील नेताजी प्रशालेत ईव्हीएम मशीनमध्ये तांत्रीक बिघाड झाल्याची तक्रार माजी आमदार रमेश कदम यांनी केली .
मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अर्धा तास मतदान प्रक्रिया बंद पडली. दरम्यान मोहोळ शहरातील आठवडी बाजार मतदान केंद्रावरील मशीन बंद पडल्यावरुन माजी आमदार रमेश कदम यांनी भाजपवर आरोप केला आहे. मतदान केंद्रावरील वोटिंगमशीन वर केवळ भाजप चिन्हाचे बटन दाबले जात असल्याचा रमेश कदमांनी आरोप केला आहे. तर विरोधकांना पराभव दिसत असल्याने त्यांच्या पायाखालीची वाळू सरकली, असे प्रत्युत्तर भाजप उमेदवार सुशील क्षीरसागर यांनी प्रतिउत्तर दिले आहे. प्रभाग क्रमांक २ मधील १ नंबर बुथवरील मशीन १ तास बंद आहे. भाजप उमेदवार शितल क्षीरसागर आणि माजी आमदार रमेश कदम मतदान केंद्रावर दाखल होऊन मशीन बंद पडल्या बाबत अधिकाऱ्यांना जाब विचारला आहे.

१० नगर परिषदांसाठी मतदान

सोलापूरमधील 10 नगर परिषदांसाठी मतदान घेण्यात आले. यामध्ये  अक्कलकोट, दुधनी, मैंदर्गी, बार्शी, पंढरपूर, सांगोला, करमाळा, मोहोळ, कुर्डुवाडी, अकलूज या नगरपरिषदेसाठी मतदान घेण्यात आले . मतदारांतून १० थेट नगराध्यक्ष व २४५ नगरसेवक निवडले जाणार आहेत. जवळपास ४ लाखांवर मतदार मतदानाचा हक्क बजाविला आहे. दुपारी ३ वाजे पर्यंत मिळालेल्या माहिती नुसार शांततेत मतदान सुरू असून टक्केवारी जवळपास ४० पुढे आहे. मोहोळ, अक्कलकोट, अकलूज येथे कांही ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्यामुळे मतदान खोळंबल्याच्या तक्रारी होत्या.

सत्ताधारी आमदारांचा वाढला रुबाब? संतोष बांगर यांनी थेट मतदान केंद्राचे नियम बसवले धाब्यावर

जिल्ह्यात सर्वच ठिकाणी चुरशीच्या निवडणूका आहेत. मोहोळ, अक्कलकोट, सांगोला, करमाळा, दुधनी येथे भाजपा व शिंदे सेनेत सामना होतोय. तर बार्शी, कुर्डुवाडीत भाजपाचा सामना उबाठा व शिंदे सेने बरोबर आहे. अकलूजच्या लढतीकडे जिल्ह्याच लक्ष असून येथे मोहिते पाटलांना भाजपाचं कडव आव्हान आहे. पंढरपूरात भाजपासमोर तीर्थक्षेत्र आघाडीने आव्हान निर्माण केल आहे बार्शीत राऊत-सोपलांमध्ये झुंज आहे. पक्षीय आघाड्या असल्या तरी स्थानिक नेतृत्वा भोवतीच निवडणूका फिरत असल्याने त्या ठिकाणच्या स्थानिक नेत्यांचा कस या निवडणूकीत लागतोय. उद्या होणारी मतमोजणी प्रक्रिया न्यायालयीन आदेशामुळे पुढे गेल्याने कार्यकर्त्यांत मात्र निराशा पसरली आहे. आता निकालासाठी २१ डिसेंबर म्हणजेच तब्बल १९ दिवस थांबाव लागणार आहे.

Web Title: Voting process for 10 municipal councils completed in solapur local body elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 06:00 PM

Topics:  

  • Maharashtra Local Body Election
  • political news
  • Solapur News

संबंधित बातम्या

‘काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या’; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान
1

‘काँग्रेस फक्त प्रियांका गांधीच चालवू शकतात, त्या इंदिरा गांधींसारख्या’; बिहारच्या माजी मंत्र्याचं मोठं विधान

West Bengal Election 2026 : बंगालमध्ये राजकीय वाद शिगेला! आरोप-प्रत्यारोप अन् ED च्या कारवाईंला जोर
2

West Bengal Election 2026 : बंगालमध्ये राजकीय वाद शिगेला! आरोप-प्रत्यारोप अन् ED च्या कारवाईंला जोर

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना
3

Satara News : महादरे–हत्ती तलावाचा होणार कायापालट; ६ कोटींच्या योजनेतून पर्यटनाला चालना

Nanded Politics : जयंतीचा मेळा की राजकीय खेला? आगामी निवडणुकांसाठी ‘साखरपेरणी’ चा प्रयोग 
4

Nanded Politics : जयंतीचा मेळा की राजकीय खेला? आगामी निवडणुकांसाठी ‘साखरपेरणी’ चा प्रयोग 

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.