Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News: बजाज चेतक खरेदीचा आनंद ठरला मनस्ताप! साडेतीन महिने उलटले, तरी पासिंग नाही; ग्राहक महिलेची फरफट

Bajaj Chetak EV Customer Complaint Wai: वाई येथील स्वामी मोटार्सकडून २९ मे २०२६ रोजी इलेक्ट्रिक बजाज चेतक खरेदी केल्यानंतरही साडेतीन महिने वाहनाचे पासिंग झाले नसल्याची तक्रार ग्राहक सौ. प्रमिला चव्हाण यांनी केली आहे.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Sep 27, 2026 | 06:21 PM
Bajaj Chetak EV Customer Complain

Bajaj Chetak EV Customer Complain

Follow Us
Follow Us:
  • डीलरचं आश्वासन अन् ग्राहकाची फरफट
  • बजाज चेतकचं पासिंग साडेतीन महिन्यांपासून रखडलं
  • ग्राहक महिलेचा संताप
वाई: वाई येथील बजाज कंपनीच्या अधिकृत डीलर स्वामी मोटार्स येथून २९ मे २०२६ रोजी इलेक्ट्रिक बजाज चेतक दुचाकी खरेदी केलेल्या सौ. प्रमिला चव्हाण यांना साडेतीन महिने उलटूनही वाहनाचे पासिंग करून मिळाले नसल्याची तक्रार समोर आली आहे. डीलरकडून वारंवार आश्वासने मिळूनही वाहनाची नोंदणी पूर्ण न झाल्याने ग्राहक महिलेची मोठी गैरसोय होत आहे. वाहन पासिंग करून देण्यास टाळाटाळ होत असल्याचा आरोप सौ. चव्हाण यांनी केला आहे.

वडनगर ते वाराणसी ‘सेवा संकल्प यात्रा’ अमरावतीत; राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यभूमीत यात्रेचे स्वागत

डीलरच्या आश्वासनावर घेतली गाडी ताब्यात

सौ. प्रमिला चव्हाण यांनी २९ मे २०२६ रोजी वाई येथील स्वामी मोटार्स या बजाज कंपनीच्या डीलरकडून इलेक्ट्रिक बजाज चेतक खरेदी केली. वाहनाची डिलिव्हरी घेताना सलग सुट्ट्या असल्याचे सांगून संबंधित डीलरने, “तुम्ही गाडी घेऊन जा, मी पासिंग करून घेतो,” असे आश्वासन दिल्याचे सौ. चव्हाण यांनी सांगितले. डीलरच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून त्यांनी वाहन ताब्यात घेतले. मात्र, त्यानंतर वाहनाचे पासिंग करून मिळवण्यासाठी वारंवार संपर्क साधूनही त्यांना समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचे त्यांनी तक्रारीत म्हटले आहे.

कधी आजारपणाचे, तर कधी कौटुंबिक कारणांचे कारण

वाहन पासिंगबाबत डीलरकडे वारंवार फोन केला असता, “मी आजारी आहे, दवाखान्यात आहे,” तसेच “माझ्या बायकोची डिलिव्हरी झाली आहे,” अशी विविध कारणे सांगण्यात आल्याचे सौ. चव्हाण यांनी नमूद केले. त्यानंतर “तुमच्या पासिंगसाठी सातारला आलो आहे,” असेही सांगण्यात आले. दरम्यान, डीलरने दोन वेळा फोन करून वाहनाच्या पासिंगसाठी ओटीपी मागितला. सौ. चव्हाण यांनी ओटीपी दिल्यानंतर दोन दिवसांनी नंबरप्लेट बसवून जा, असे सांगण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, त्यानंतरही वाहनाचे पासिंग पूर्ण झाले नसल्याचा आरोप आहे.

साडेतीन महिन्यांपासून तगादा; तरीही पासिंग नाही

२९ मे रोजी वाहन खरेदी केल्यानंतर साडेतीन महिन्यांपासून पासिंग करून मिळावे, यासाठी डीलरकडे वारंवार पाठपुरावा करत असल्याचे सौ. चव्हाण यांनी सांगितले. मात्र, आजतागायत वाहनाचे पासिंग करून देण्यात आले नसल्याने ग्राहक म्हणून आपली मोठी अडचण होत असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. वाहन खरेदी केल्यानंतर त्याची नोंदणी, आवश्यक कागदपत्रे आणि नंबरप्लेट याबाबत ग्राहकाला स्पष्ट माहिती देणे आवश्यक असताना आपल्याला वारंवार आश्वासने देऊनही काम पूर्ण झाले नसल्याचे सौ. चव्हाण यांनी म्हटले आहे.

पासिंग न करता वाहन ग्राहकाच्या ताब्यात कसे दिले?

सरकारी नियमांनुसार वाहनाची नोंदणी व आवश्यक प्रक्रिया पूर्ण करूनच ग्राहकाला वाहन ताब्यात देणे अपेक्षित असताना, पासिंग न झालेली गाडी ग्राहकाच्या ताब्यात कशी देण्यात आली, असा सवाल सौ. चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.
वाहनाची नोंदणी प्रलंबित असताना ग्राहकाला वाहन वापरण्यास देणे योग्य आहे का, याची संबंधित विभागाने चौकशी करावी. तसेच वाहन पासिंगची जबाबदारी असलेल्या डीलरकडून ग्राहकाची गैरसोय का झाली, याचे स्पष्टीकरण कंपनीकडून मिळणे आवश्यक आहे.

अपघात अथवा जीवितहानी झाल्यास जबाबदारी कोणाची?

वाहनाचे पासिंग प्रलंबित असताना रस्त्यावर वाहन चालविताना अपघात झाल्यास किंवा काही अनुचित घटना घडल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा गंभीर प्रश्न सौ. चव्हाण यांनी उपस्थित केला आहे.“बजाज कंपनीच्या अधिकृत डीलरकडून वाहन खरेदी करूनही साडेतीन महिन्यांपासून पासिंगसाठी पाठपुरावा करावा लागत आहे. डीलरने दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून वाहन घेतले. मात्र, अद्याप पासिंग झालेले नाही. अशा परिस्थितीत ग्राहकांच्या सुरक्षिततेची जबाबदारी कोणाची?” असा सवाल त्यांनी केला आहे.

संबंधित विभागाने चौकशी करण्याची मागणी

या प्रकरणाची संबंधित परिवहन विभागाने चौकशी करून वाहनाचे पासिंग तातडीने करून द्यावे. तसेच ग्राहकांना वाहन खरेदीच्या वेळी आवश्यक कागदपत्रे, नोंदणीची स्थिती आणि वाहन वापराबाबत स्पष्ट माहिती देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी सौ. प्रमिला चव्हाण यांनी केली आहे.

सांगली शिक्षक बँकेत सभेदरम्यान गोंधळ, तरीही ४ मोठे निर्णय; मासिक वर्गणी १३०० वरून १ हजारावर

Web Title: Wai news bajaj chetak ev customer complaint passing delay

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 27, 2026 | 06:21 PM

Topics:  

  • Bajaj
  • Wai
  • Wai News

संबंधित बातम्या

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच
1

बजाज पल्सर NS200, N250 आणि NS400Z मध्ये मोठे अपडेट; लवकरच होऊ शकते लाँच

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.