Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wai News : वाई शहरात दारुड्यांची हुल्लडबाजी! यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरला बनवले दारुचा अड्डा

Wai News : वाई शहरात यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरच्या परिसरात रात्रीच्या वेळी मद्यपींचा धुमाकूळ वाढला आहे. यामुळे व्यापारी त्रस्त झाले आहे. यावर व्यापारी आणि नागरिकांनी पोलिसांकडे कारवाईची मागणी केली आहे.

  • By स्वराली शहा
Updated On: Mar 28, 2026 | 12:56 PM
Wai illegal Drinking Shopping Centre Issue

Wai illegal Drinking Shopping Centre Issue

Follow Us
Follow Us:
  • वाईत यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरची बदनामी
  • मद्यपींमुळे व्यापारी त्रस्त
  • वाईतील व्यापाऱ्यांची पोलिसांकडे धाव
वाई : शहरातील गजबजलेल्या परिसरात असलेले महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री व यशवंतराव चव्हाण यांच्या नावाने ओळखले जाणारे शॉपिंग सेंटर सध्या वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आले आहे. हे ठिकाण खरंच शॉपिंग सेंटर आहे की दारुड्यांचा अड्डा, असा संतप्त सवाल येथील दुकानदारांकडून उपस्थित केला जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या शॉपिंग सेंटरमध्ये अनेक दुकानांच्या समोर दररोज रात्री तळीरामांचा अक्षरशः मेळा भरतो. दुकानदार दुकान बंद करून गेल्यानंतर काही सराईत मद्यपी दुकानांसमोरच बसून उघडपणे दारू पितात. त्यांच्या या बेकायदेशीर वर्तनामुळे परिसरातील शिस्त आणि सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे.

हे देखील वाचा : वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती, नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांचा गंभीर आरोप

विशेष म्हणजे, हे मद्यपी केवळ दारू पिऊन निघून जात नाहीत, तर रिकाम्या बाटल्या आणि कचरा तसाच दुकानांसमोर टाकून जातात. दुसऱ्या दिवशी दुकानदारांना आपल्या दुकानासमोर घाण आणि अस्वच्छतेचा सामना करावा लागत आहे. यामुळे व्यापाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी पसरली असून संतापाची लाट उसळली आहे.

या प्रकारामुळे ग्राहकांमध्येही नकारात्मक प्रतिमा तयार होत असून व्यवसायावर परिणाम होत असल्याची तक्रार व्यापाऱ्यांनी केली आहे. “ही परिस्थिती कायम राहिली तर शॉपिंग सेंटरची ओळखच बदनाम होईल,” अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली. दुकानदारांनी पोलिस प्रशासनाकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी केली आहे. रात्रीच्या वेळी गस्त वाढवून संबंधित मद्यपींवर कठोर कारवाई करावी आणि या प्रकाराला आळा घालावा, अशी मागणी जोर धरत आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी घडणाऱ्या या प्रकारामुळे प्रशासनाची भूमिका काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

वाई (Wai) शहरांमध्ये अपुरा पोलीस फौजफाटा असल्याने वाई शहरांमध्ये मोठ्या प्रमाणावर हुल्लडबाजी वाढली आहे मोठ्या आवाजाचे सायलेसर बसून मोठ मोठाले गाड्यांच्या सायलेन्सर मधून आवाज करणे ट्रिपल सीट मोटरसायकल चालवणे अल्पवयीन मुले मोठ्या प्रमाणात मोटरसायकल चालवतात शालेय मुलं यांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे यामुळे जिल्हा पोलीस प्रमुख यांनी वाई शहराला मोठा पोलीस फौज फाटा पाठवावा अशी मागणी वाईकर नागरिकांच्याकडून होत आहे.

यशवंतराव चव्हाण शॉपिंग सेंटरची स्थापना स्व. यशवंतराव चव्हाण साहेबांच्या विचारांचा वारसा व त्यांचे कार्य पुढे नेण्यासाठी “विश्वासार्ह सर्वोत्तम सेवा” हे ब्रीदवाक्य घेऊन “आधुनिक आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीकरिता सर्व घटकांना समान संधी निर्माण करून देणे” हा दृष्टिकोन डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली होती. परंतु मद्यपींमुळे याचे नाव खराब होत आहे.

हे देखील वाचा : Satara News : रस्ते कामातील दिरंगाईवर वाईत नागरिकांचा संताप; नगरपरिषद सभेत प्रशासनाला जाब

Web Title: Wai news illegal drinking shopping centre issue

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 28, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara
  • Wai

संबंधित बातम्या

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी
1

उत्पादनच्या धाडीनंतर बीट अंमलदारांवर कारवाई होणार का? विलासबाबा जवळ यांची मागणी

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी
2

Satara News: मुंबईच्या २५ सुपरकार्स साताऱ्यात दाखल! जलमंदिर पॅलेसबाहेर कारप्रेमींची तुफान गर्दी

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…
3

Maharashtra Drought: कृषिमंत्री थेट बांधावर; सोयाबीन नुकसानीची केली पाहणी, लवकरच…

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन
4

जास्तीत जास्त ऊस प्रतापगडला देऊन हंगाम यशस्वी करा; सौरभबाबा शिंदेंचं ऊस उत्पादकांना आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.