वाई नगरपालिकेच्या शाळा क्र. १० मध्ये नियमबाह्य समिती (Photo Credit- X)
नगरसेवक चव्हाण यांनी दिलेल्या निवेदनानुसार, सिद्धनाथवाडी प्रभागातील शाळा क्र. १० ही त्यांच्या कार्यक्षेत्रात येत असतानाही शाळेच्या मुख्याध्यापक व शिक्षकांनी त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता संपूर्ण प्रक्रिया पार पाडली. विशेष म्हणजे, पालकांची सभा न घेता आणि कोणतीही पारदर्शक प्रक्रिया न राबवता समिती गठीत करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
शासकीय नियमानुसार शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी विद्यार्थ्यांच्या पालकाचीच नियुक्ती होणे आवश्यक असताना, या नियमाची सरळसरळ पायमल्ली झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, समितीची रचना ही राजकीय दबावाशिवाय व लोकशाही पद्धतीने व्हावी हा उद्देश असताना प्रत्यक्षात मात्र एकतर्फी निर्णय घेतल्याचे निदर्शनास आले आहे.
या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित नियमबाह्य समिती तात्काळ बरखास्त करावी, तसेच मुख्याध्यापकांवर शिस्तभंगाची कारवाई करून नव्याने पारदर्शक पद्धतीने समिती गठीत करावी, अशी ठाम मागणी नगरसेवक गुरुप्रसाद चव्हाण यांनी केली आहे.
दरम्यान, या प्रकरणामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, प्रशासन याकडे कशी दखल घेते याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
लोकनियुक्त नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी नगरपालिका निवडणूकीत वाई शहराच्या शैक्षणिक प्रगतीसाठी विशेष परिश्रम घेणार असल्याचे अभिवचन दिले आहे.नगराध्यक्षपदाच्या खुर्चीत बसल्यापासून सावंत भाऊसाहेबांनी नगरपालिका प्रशासनाची झाडाखडती घेतली.आता त्यांनी शिक्षण विभागाच्या प्रगतीसाठी ऍक्शन मोडवर येण्याची अपेक्षा शिक्षणप्रेणी नागरिक करीत आहेत.
Satara News : गुढीपाडवा पट वाढवा या जिल्हा परिषदेच्या उपक्रमाची उत्साहात सुरुवात!






