Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 11 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

वर्धा जिल्ह्यातील ५१ हजार वीज ग्राहकांकडे महावितरणची ₹१२.३२ कोटींची थकबाकी आहे. विशेष वसुली मोहिमेंतर्गत जुलै महिन्यात ६०० हून अधिक ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला असून वेळेत बिल भरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

  • By विवेक
Updated On: Jul 26, 2026 | 09:54 PM
६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

६०० ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित, ५१ हजार ग्राहकांकडे १२.३२ कोटींची महावितरणची थकबाकी

Follow Us
Follow Us:

वर्धा, ब्युरो : जिल्ह्यात महावितरणचे ३.५५ लाख ग्राहक आहेत. त्यापैकी ५१ हजार ग्राहकांकडे विद्युत देयकापोटी महावितरणची १२.३२ कोटींची थकबाकी आहे. थकबाकीची वेळीच वसुली व्हावी म्हणून महावितरणच्यावतीने विशेष मोहीम राबविली जात आहे. तर सूचना देऊनही थकीत देयक अदा न करणाऱ्या ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित केला जात आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत ६०० हून अधिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित केल्याचे सांगण्यात आले.

महावितरणने जिल्ह्यातील ३ लाख २८ हजार नागरिकांना घरगुती वापरासाठी वीज जोडणी दिली आहे. तर २२ हजार १८९ नागरिकांना व्यावसायिक वापरासाठी वीज जोडणी महावितरणने दिली. याशिवाय औद्योगिक वापरासाठी ४ हजार ८५८ संस्थांना वीज जोडणी महावितरणने दिली आहे. मात्र, ५१ हजार ग्राहकांकडे विद्युत देयकापोटी चक्क १२ कोटी ३२ लाख थकल्याने थकबाकी वसुली मोहीम महावितरणच्यावतीने हाती घेण्यात आली आहे. तसेच जे ग्राहक महावितरणच्या सूचनांकडे दुर्लक्ष करीत आहेत त्यांचा विद्युत पुरवठा खंडित केला जात आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ६०० हून अधिक ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आल्याची माहितीही पुढे आली आहे.

Wardha : २.४९ लाख पशुधनाला लस; घटसर्प, एकटांग्या, आंत्रविकारावर उपचार

ग्राहकांकडे अससेली थकबाकी

  • घरगुती १०.२५ कोटी
  • व्यावसायिक १.५७ कोटी
  • औद्योगिक ५० लाख
यावेळी वर्धाच्या महावितरण अधीक्षक अभियंता स्मिता पारखी म्हणाल्या, “विद्युत देयकापोटी ५१ हजार ग्राहकांकडे तब्बल १२.३२ कोटींची थकबाकी असल्याने विशेष थकबाकी वसुली मोहीम महावितरणने हाती घेतली आहे. नागरिकांनीही वेळीच विद्युत देयक अदा करून महावितरणला सहकार्य करावे.”

४.५० कोटींचा वर्धा मर्चेंट नागरी सहकारी पतसंस्थेचा घोटाळा उघड; पुरावे जमा …

रिकनेक्शन चार्जेस घेत केली जातेय जोडणी

थकबाकीदार व वेळीच देयक अदा न करणाऱ्या वीज ग्राहकांचा वीजपुरवठा महावितरणव्यावतीने खंडित केला जात आहे, ज्या थकबाकीदार ग्राहकाचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला. त्या ग्राहकाने वीज देयक अदा केल्यावर ३३० रुपये रिकनेक्शन चार्जेस घेत महावितरण वीज जोडणी करून देत आहे. थकबाकीदारास महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून थकबाकी वेळीच अदा करण्याच्या सूचनाही दिल्या जात आहे.

Web Title: Wardha mahavitaran electricity bill dues power disconnection

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 26, 2026 | 09:52 PM

Topics:  

  • mahavitaran
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी
1

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे महागात; १९ वीजचोरांवर गुन्हे, नऊ प्रकरणांत १२.४१ लाखांची दंडात्मक आकारणी

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव
2

Table Tennis: वर्ध्यात पुण्याच्या शरण्याचा जलवा! कियारा लेलेला नमवत कोरले विजेतेपदावर नाव

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित
3

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…
4

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.