Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल…

स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी नऊ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Sep 07, 2026 | 05:28 PM
स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल...

स्मार्ट मीटरला ‘चकवा’ देणे पडले महागात, वीजचोरीची १९ प्रकरणे उघडकीस; तब्बल...

Follow Us
Follow Us:

पुणे :  स्मार्ट मीटरमध्ये छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या ग्राहकांवर महावितरणने कारवाईचा बडगा उगारला आहे. भोसरी विभागातील भोसरी, आकुर्डी आणि प्राधिकरण (देयके व महसूल) उपविभागात स्मार्ट मीटरची सील तोडून ‘सीटी बायपास’च्या माध्यमातून मीटरची गती कमी करून वीजचोरी केल्याची १९ प्रकरणे उघडकीस आली आहेत. यापैकी नऊ प्रकरणांत गुन्हे दाखल करण्यात आले असून, संबंधितांकडून एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे. उर्वरित दहा प्रकरणांत दंडाची आकारणी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

मीटरमध्ये केलेली छेडछाड महावितरणच्या तपासणीदरम्यान उघडकीस आली आहे. मीटरचे सील तोडणे, कव्हर उघडणे तसेच सीटी प्रणालीला बगल देऊन प्रत्यक्ष वीजवापरापेक्षा कमी वापर नोंदविण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे आढळले. त्यामुळे स्मार्ट मीटरला चकवा देऊन वीजचोरी करणाऱ्यांवर आता थेट फौजदारी कारवाई केली जात आहे.

रिमोट उपकरणाद्वारे छेडछाड

चाऱ्होली येथील ‘शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट’ या व्यावसायिक वीज ग्राहकाच्या ठिकाणीही मीटरमध्ये गंभीर स्वरूपाची छेडछाड आढळली आहे. वीजचोरीसाठी स्मार्ट मीटरच्या कार्यप्रणालीत हस्तक्षेप करण्याच्या उद्देशाने रिमोट उपकरण बसविल्याचे तपासणीमध्ये समोर आले. या प्रकरणात २ लाख ६६ हजार ८०० रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.

छेडछाड केल्यास फौजदारी कारवाई

वीजचोरी करण्याच्या उद्देशाने मीटरमध्ये छेडछाड करणे, सील तोडणे किंवा सीटी बायपास करण्याचा प्रयत्न करणे हा गंभीर प्रकार आहे. भारतीय विद्युत अधिनियम, २००३ मधील संबंधित तरतुदींनुसार अशा प्रकरणांत दंडात्मक आकारणीसोबत फौजदारी गुन्हा दाखल केला जात आहे, अशी माहिती महावितरणने दिली.

हे सुद्धा वाचा : श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

महावितरणकडून नागरिकांना इशारा

स्मार्ट मीटरमध्ये कोणत्याही प्रकारची छेडछाड करून वीजचोरी करण्याचा प्रयत्न केल्यास दंडात्मक आकारणीसह फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागेल. दिघी, कासारवाडी आणि रावेत पोलिस ठाण्यांत नऊ ग्राहकांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले असून, त्यांच्यावर एकूण १२ लाख ४१ हजार रुपयांची दंडात्मक आकारणी करण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : नागरिकांची गैरसोय करणारा विकास नको; निगडीतील हरित सेतूवरून खासदार बारणेंनी प्रशासनाला सुनावले

नऊ वीजचोरी प्रकरणांत कारवाई

ग्राहक.   दंडाची रक्कम
शेतकरी फॅमिली रेस्टॉरंट, चाऱ्होली. २,६६,८००
सचिन भास्करराव तायडे.  १,१८,३६०
सुरज संजीवकुमार सूर्यवंशी. १,५३,७७०
दयानंद श्रीमंत रसाळ. १,४६,०७०
संदीप लक्ष्मण गवळी. १,५६,५९०
विष्णू सखाराम चोपडे. १,४०,४१०
भगवत नारायण इंगळे. १,४६,६५०
आनंद जी. ६८,८६३
ब्रिजेशदादा बाळासो बुतुगडे ४३,६२२
एकूण. १२,४१,१४५

Web Title: Cases have been registered against the person attempting to steal electricity

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 05:26 PM

Topics:  

  • crime news
  • mahavitaran
  • pune news

संबंधित बातम्या

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’
1

Pune MPSC Student Protest : विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला जयंत पाटलांचा पाठिंबा; ‘विद्यार्थ्यांच्या भविष्याशी तडजोड नाही’

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

श्वानाला फेरफटका मारण्यासाठी गेला, अंधारात टोळक्याला हटकलं अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…
3

चिंचवडच्या महापारेषण उपकेंद्रात स्फोटानंतर आग, मेट्रोसह उद्योगांनाही बसला फटका; तब्बल…

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा
4

DSP Cricket : मान्सून लीगमध्ये साई सत्यम आणि मायटी स्टार्सचा डंका; प्रतिस्पर्ध्यांचा उडवला धुव्वा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.