Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 8 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई, ५९ आस्थापनांची केली तपासणी तर ४ परवाने केले निलंबित

Wardha News : सणासुदीच्या काळात वर्धा जिल्ह्यातविविध खादय पदार्थ व मिठाईची भेसळ रोखण्यासाठी अन्न औषधी प्रशासन विभागाने देखील कंबर कसली आहे. वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. ३५ जणांना नोटीस बजावण्यात आली.

  • By विवेक
Updated On: Sep 08, 2026 | 02:44 PM
सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई

सणासुदीच्या काळात एफडीएची मोठी कारवाई

Follow Us
Follow Us:
  • सणासुदीच्या काळात वर्धा जिल्ह्यात एफडीएची मोठी कारवाई
  • गणेशोत्सवासोबतच नवरात्रोत्सवातही महाप्रसादाची धूम, मंडळांना महाप्रसादासाठी घ्यावी लागणार परवानगी
  • मंडळांनी परवानगी न घेताच महाप्रसाद केला तर अध्यक्षांसह कार्यकत्यांवर कारवाई होण्याची शक्यता
 

Wardha News : लवकरच गणेशोत्सव, नवरात्र ते थेट दिवाळीपर्यंत सण उत्सवांची रेलचेल राहणार आहे. या काळात विविध खादय पदार्थ व मिठाईची भेसळ रोखण्यासाठी अन्न औषधी प्रशासन विभागाने देखील कंबर कसली आहे. वर्धा जिल्ह्यात ऑगस्ट महिन्यात ५९ आस्थापनांची तपासणी करण्यात आली आहे. ३५ जणांना नोटीस बजावण्यात आली. ५ दुकानदारांना २७ हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. ४ दुकानांचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.

सण-उत्सवाच्या काळात बाजारात मिठाईला सर्वाधिक मागणी असते. सणाचा आनंद द्विगुणित करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने गोडधोड खरेदी करतात. मात्र, याच वाढत्या मागणीचा गैरफायदा घेत नफ्याच्या लालसेपोटी शहरात अनेक ठिकाणी शिळ्या आणि आरोग्यास घातक असलेल्या मिठाईची राजरोस विक्री सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या एफएसएसआयच्या आणि स्पष्ट मार्गदर्शक तत्त्वानुसार बेस्ट बिफोर युज लिहिणे आवश्यक आहे. अनेक दुकानात उघड्यावर मिठाई बनवून डब्ब्यात सील केल्या जाते. त्यावर बेस्ट बिफोर युज तारीख लिहिण्यात येत नाही.

मिठाईच्या दुकानांमध्ये नियमांचे उल्लंघन करीत ग्राहकांच्या जीवाशी खेळ करण्यात येतो. गणेशोत्सव अवघ्या ३ आठवड्यांवर आला असून तयारीसाठी कार्यकर्त्यांची धावपळ सुरू आहे. मूर्ती, सजावट, मंडपासह, मिरवणुकांची जोरदार तयारी सुरू आहे. या धांदलीत महाप्रसादासाठी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घ्यावी लागणार आहे. मंडळांनी परवानगी न घेताच महाप्रसाद केला आणि भक्तांना वाटला तर अध्यक्षांसह कार्यकत्यांवर अन्न व औषध प्रशासनाकडून कारवाई होण्याची शक्यता आहे.

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

गणेशोत्सवासोबतच नवरात्रोत्सवातही महाप्रसादाची धूम जोरात असते. गणेश आगमनाच्या पहिल्याच दिवसापासून महाप्रसादांना सुरुवात होते. ११ दिवस सर्वत्र महाप्रसाद सुरू असतात. हजारो भक्तांच्या पंगती उठतात. पण, पंगती उठवण्यापूर्वी महाप्रसादाची परवानगी घ्यावी लागते, हे कार्यकत्यांच्या गावीही देखील नसते. यंदा याची खबरदारी आधीच घ्यावी लागेल. गणेशोत्सवातही हा धडाका कायम राहणार आहे. शहरासह ग्रामीण भागातही दरवर्षी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. ग्रामीण भागातही १० दिवस धार्मिक उपक्रमांसह महाप्रसादाचे आयोजन केले जाते. उत्सव साजरा करताना गणेश मंडळांना भाविकांच्या सुरक्षेलाही प्राधान्य द्यावे लागणार आहे. यासाठी या मंडळांनादेखील महाप्रसादासाठी परवानगी घ्यावी लागणार आहे.

शिळी मिठाई आकर्षक बॉक्समध्ये पॅक

सणाच्या काळात खवा, मावा, पेढे, काजू कतली आणि बंगाली मिठाईला मोठी मागणी असते. मागणी वाढणार याचा अंदाज घेऊन अनेक व्यावसायिक आठवडा-पंधरवडा आधीच मिठाई तयार करून ठेवतात. योग्य तापमानात साठवणूक न केल्याने दुधापासून बनवलेले पदार्थ लवकर खराब होतात, त्याला बुरशी येते. नफ्याच्या लालसेपोटी हीच शिळी मिठाई आकर्षक बॉक्समध्ये पॅक करून ग्राहकांच्या माथी मारली जाते.

जुन्या नियमांची नव्याने अंमलबजावणी

गणेशोत्सवात महाप्रसाद करून भक्तांना वाटण्यापूर्वी अन्न व औषध प्रशासनाची परवानगी घेणे हा नियम जुनाच आहे. सर्वच सार्वजनिक उत्सवातील महाप्रसादासाठी परवानगी आवश्यक आहे. पण, त्याची काटेकोर अंमलबजावणी होत नव्हती. मंडळांची मोठी संख्या, राजकीय हस्तक्षेप, धार्मिक बाब आणि प्रशासनाकडे मनुष्यबळाचा अभाव, आदी कारणांनी परवानगीची प्रक्रिया गांभीर्याने आणि जोरदारपणे राबवली जात नव्हती. यंदा मात्र मुंढे यांच्यामुळे ही मोहीम काटेकोरपणे राबवली जाण्याची शक्यता आहे.

Wardha News : आश्रमशाळेत क्षमतेपेक्षा कमी विद्यार्थी, ६० टक्केच हजेरी; अधिकाऱ्यांच्या नियमित भेटी नसल्याची ओरड

यावर वर्ध्याचे अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त प्रफुल्ल टोपले म्हणाले, “आगामी काळात मोठ्या प्रमाणात सण उत्सवाला सुरुवात मिठायामध्ये भेसळ केली जाते. हे नागरिकांच्या आरोग्यास हानीकारक आहे. यावर नियंत्रण आणण्यासाठी आगामी काळात कारवाई मोहीम गतिमान करण्यात येणार आहे. गणेशोत्सव व दुर्गा उत्सव दरम्यान सार्वजनिक ठिकाणी अन्न शिजवणे, वाटप अथवा विक्री करणे यासाठी नोंदणी आणि परवानगी सक्तीची आहे. धार्मिक कार्यास महाप्रसाद शिवणण्यासाठी वाटप करण्यासाठीही परवानगी आवश्यक आहे. अन्यथा एफडीए कारवाई करू शकते. त्यासाठी प्रशासनाशी संपर्क साधून अर्ज करावा आणि नियमांचे पालन करावे.”

Web Title: Wardha news fda action on festive season in wardha

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 08, 2026 | 02:44 PM

Topics:  

  • FDA
  • FDA Action
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही
1

Wardha News : ‘वर्धेसह लगतच्या ग्रामपंचायतींचा विकास करणार,’ पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांची ग्वाही

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद
2

Table Tennis: विदर्भाच्या भूमीवर पुणेकरांचा डंका! महाराष्ट्र मानांकन टेबल टेनिस स्पर्धेत प्रतिस्पर्धी गारद

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे
3

IAS Tukaram Mundhe सोशल मीडियावरही ‘सिंघम’, Instagram वर मुंढेंची क्रेझ! फॉलोअर्समध्ये फडणवीस-शिंदेंनाही टाकले मागे

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील
4

FDA Action : रुग्णांच्या ताटात झुरळ; एफडीएची धडक कारवाई, राम कॅटरर्सचे उपाहारगृह सील

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.