Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विदर्भ तापला; वर्ध्यात तापमानाचा पारा पोहोचला 47.1 अंशांवर, पुढील 7 दिवस…

पश्चिम हिमालयीन क्षेत्रापासून सुरू होऊन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट पसरली आहे. सामान्यतः डोंगराळ भागांत उष्णता कमी असते.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 21, 2026 | 08:13 AM
पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

पुण्यात पावसाची विश्रांती; उकाड्याने नागरिक पुन्हा हैराण, तापमानाचा पारा 31 अंशांवर

Follow Us
Follow Us:

वर्धा : गेल्या काही दिवसांपासून वातावरणात कमालीचा बदल जाणवत आहे. त्यात विदर्भात सूर्य आग ओकत असून, उष्णतेच्या तीव्र लाटेने संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे. बुधवारी वर्ध्यात पारा ४७.१ अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने नागरिक अक्षरशः होरपळून निघाले. यावर्षी उन्हाळ्यात तीनदा वर्धा जिल्ह्याचे तापमान ४६.५ अंशावर गेले होते. बुधवारी सर्व विक्रम मोडीत काढत तापमानाने उच्चाक गाठला. तर नागपूर येथे ४६.६ अंश तापमानाची नोंद करण्यात आली.

पुढील ७ दिवसांत तापमानात वाढ होणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. भारतीय हवामान विभागाचे तज्ज्ञ नरेश कुमार यांनी इशारा दिला की, संपूर्ण उत्तर-पश्चिम भारत, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात उष्णतेची लाट येईल. ही परिस्थिती पुढील ७ दिवस अशीच राहण्याची शक्यता आहे. पश्चिम हिमालयीन क्षेत्रापासून सुरू होऊन जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्येही उष्णतेची लाट पसरली आहे. सामान्यतः डोंगराळ भागांत उष्णता कमी असते. मात्र, यावेळी तिथेही तापमान असामान्यपणे वाढले आहे. सध्या उत्तर-पश्चिम वारे राजस्थानच्या थार वाळवंटातून उष्ण आणि कोरडी हवा घेऊन येत आहेत.

पुण्याच्या तापमानात मोठी वाढ; तापमानाचा पारा 38 अंशांवर, ढगांची चाहूल तरीही उकडा कायम

वर्ध्यात फारसे औद्योगिकीकरण झालेले नाही. मात्र, सिमेंटीकरणाच्या अतिरेकामुळे उष्णतेच्या झळा शहरांसह ग्रामीण भागातही अधिक तीव्रतेने जाणवत असल्याचे निरीक्षण सध्या नोंदविले जात आहे.

अनेक राज्यांना रेड अलर्ट

हवामान खात्याने दक्षिण उत्तर प्रदेश, उत्तर मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रातील विदर्भासाठी पुढील तीन दिवसांचा ‘रेड अलर्ट’ जारी केला आहे. या भागांमध्ये तापमान ४७ अंश सेल्सिअसच्याही पुढे जाऊ शकते.

अकोल्यातही वाढले होते तापमान

एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोल्याचे तापमान 47 अंशाच्यावर गेले होते. पण, अवकाळी पावसाचे आगमन झाल्याने मे महिन्यात हा पारा ४० ते ४२ अंशाच्या आसपास राहत होते. आता त्यात पुन्हा वाढ होताना दिसत आहे. सोमवारी अकोल्याच्या तापमानाची ४५.०१ सेल्सिअस इतकी नोंद झाली. ही वाढ राज्यात सर्वाधिक म्हणून नोंद करण्यात आली आहे. कायम राखत मंगळवारी तापमान ४५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले असून, ते राज्यात सर्वाधिक आहे. जिल्ह्यात दिवसभर जिल्हावासियांना उन्हाच्या झळांचा सामना करावा लागला.

Web Title: Temperature increased in vidarbha mercury in wardha has reached 47 degrees

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 21, 2026 | 08:11 AM

Topics:  

  • Climate Change
  • Increase in Temperature

संबंधित बातम्या

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…
1

अकोल्यात सप्टेंबरमध्येच ‘ऑक्टोबर हीट’ची झळ; तापमान 33 अंशांच्या आसपास, पातूरमध्ये तर…

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट
2

Weather Update : देशातील 9 राज्यांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाचा अंदाज; तापमानातही झाली घट

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण
3

Sahara Snowfall : तापमानाचा पारा -3 अंशांपर्यंत घसरल्याने सोनेरी वाळूवर पसरली पांढरी चादर; जाणून घ्या यामागील वैज्ञानिक कारण

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत
4

देशातील अनेक राज्यांत पुन्हा पावसाचा अलर्ट; मुसळधार पावसामुळे उत्तर प्रदेश, छत्तीसगडमध्ये जनजीवन विस्कळीत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.