Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 29 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News: दीड लाख शेतकऱ्यांच्या पिकांना विमाकवच; कापूस, सोयाबीन, तुरीसह भुईमूग, ज्वारीचा समावेश

नैसर्गिक संकटांपासून पिकांना आर्थिक संरक्षण मिळावे यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पीक विमा काढला आहे. शेतकऱ्यांनी विमा हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपये भरले आहेत.

  • By विवेक
Updated On: Aug 12, 2026 | 06:16 PM
वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

वर्ध्यात ३२ हजार शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ; पालकमंत्री पंकज भोयर यांची माहिती

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला.
  • कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग आणि ज्वारीचा विमा योजनेत समावेश.
  • हिंगणघाटमध्ये सर्वाधिक ३४ हजार १९७, तर आष्टीत सर्वात कमी ७ हजार ८६७ शेतकरी सहभागी.
 

वर्धा : हवामानातील बदल, अतिवृष्टी, पावसातील खंड, वादळी वारे आणि अन्य नैसर्गिक आपत्तींचा शेतीपिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी वर्धा जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी खरीप पिकांचा विमा काढला आहे. यामध्ये कापूस, सोयाबीन, तूर, भुईमूग आणि ज्वारी या प्रमुख पिकांचा समावेश आहे.

संबंधित शेतकऱ्यांनी पीकविम्याच्या हप्त्यापोटी सुमारे १ कोटी रुपयांची रक्कम भरली आहे. त्यामुळे प्रतिकूल हवामानामुळे पिकांचे नुकसान झाल्यास योजनेच्या निकषांनुसार नुकसानभरपाई मिळण्याचा मार्ग उपलब्ध झाला आहे.

खरीप हंगामात कापूस, सोयाबीन आणि तुरीचे क्षेत्र मोठे

वर्धा जिल्ह्यात खरीप हंगामात प्रामुख्याने कापूस, सोयाबीन आणि तुरीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. कृषी विभागाच्या अंदाजानुसार यंदा जिल्ह्यात ४ लाख ६ हजार ५५४ हेक्टर क्षेत्रावर विविध पिकांची लागवड अपेक्षित होती. प्रत्यक्षात ४ लाख १ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पेरणी झाल्याचे सांगण्यात येत आहे. पेरणीचा अंतिम अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर जिल्ह्यात कोणत्या पिकाखाली किती क्षेत्र आहे, याचे स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

Wardha News : वर्ध्यात अंगणवाडी सेविका-मदतनिसांचा जेलभरो; 30 हजार वेतनासह विविध मागण्यांसाठी सरकारविरोधात एल्गार

१० ऑगस्टपर्यंत १.५७ लाख शेतकऱ्यांचा सहभाग

खरीप पीकविमा योजनेत सहभागी होण्यासाठी १० ऑगस्ट ही अंतिम मुदत होती. या मुदतीपर्यंत जिल्ह्यातील १ लाख ५७ हजार २४२ शेतकऱ्यांनी विमा काढल्याची नोंद कृषी विभागाकडे झाली आहे. पिकांचे नुकसान झाल्यानंतर योजनेच्या नियमांनुसार भरपाई मिळत असल्याने संभाव्य आर्थिक जोखीम कमी करण्यासाठी शेतकऱ्यांकडून पीकविम्याला पसंती दिली जात आहे.

हिंगणघाटमध्ये सर्वाधिक शेतकरी

तालुकानिहाय आकडेवारीनुसार हिंगणघाटमध्ये ३४ हजार १९७ शेतकऱ्यांनी पीकविमा काढला असून हा जिल्ह्यातील सर्वाधिक आकडा आहे. त्याखालोखाल समुद्रपूरमध्ये ३० हजार ३१, देवळीमध्ये २२ हजार ३७६ आणि सेलूमध्ये १८ हजार ४२० शेतकरी विमा योजनेत सहभागी झाले.

तालुका  विमा काढलेले शेतकरी
आर्वी १३,९२४
आष्टी ७,८६७
देवळी २२,३७६
हिंगणघाट ३४,१९७
कारंजा १२,४९१
समुद्रपूर ३०,०३१
सेलू १८,४२०
वर्धा १७,९३६

नैसर्गिक आपत्तींचे वाढते प्रमाण आणि हवामानातील अनिश्चितता पाहता खरीप हंगामातील पिकांना विमाकवच मिळाल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा आधार मिळण्याची अपेक्षा आहे.

Wardha News : सोयाबीनचे पंचनामे रखडल्याने शेतकरी संतप्त; कृषी अधिकाऱ्यांच्या खुर्चीला हार अर्पण करून निषेध

Web Title: Wardha pik vima 1 57 lakh farmers kharif crops

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • Farmer Loan Waiver
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Wardha News : अवैध खनिज उत्खननावर मोठी कारवाई; ५२ प्रकरणे उघड, १७.९९ कोटींचा दंड, ४९ वाहने जप्त
1

Wardha News : अवैध खनिज उत्खननावर मोठी कारवाई; ५२ प्रकरणे उघड, १७.९९ कोटींचा दंड, ४९ वाहने जप्त

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य
2

धक्कादायक ! गतिमंद तरुणीवर सामूहिक अत्याचार; एकाच परिसरात दोनवेळा घडलं भयानक कृत्य

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.