Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Wardha News : न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच! पुलगाव, आष्टीत आंदोलनाचा भडका, समान काम समान वेतनासाठी ३४ हजार कर्मचारी संपावर

Wardha News : समान काम समान वेतन आणि सुधारित वेतनश्रेणीच्या मागणीसाठी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच आहे. पुलगाव न्यायालयातील कर्मचारीही संपात उतरले असून आष्टी येथे कर्मचाऱ्यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

  • By विवेक
Updated On: Nov 19, 2026 | 02:57 PM
Wardha Court

Wardha Court

Follow Us
Follow Us:
  • वर्ध्यात न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप सुरूच
  • समान काम समान वेतनासाठी कर्मचाऱ्यांचा लढा
  • आष्टी न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे बेमुदत उपोषण
 

पुलगाव : दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी मिळावी. समान काम समान वेतन ही मुख्य मागणी घेवून दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. यामध्ये सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचाही सक्रिय सहभाग आहे. या आंदोलनात मंगळवारपासून पुलगाव न्यायालयाचे कर्मचारी देखील सहभागी झाले. दुसऱ्या दिवशी देखील कर्मचाऱ्यांचा संप सुरूच होता. (Wardha News)

आंदोलनाचा पहिला टप्पा म्हणून १६ सप्टेंबर रोजी राज्यभरातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी काळया फिती लावून कामकाज केले. त्यानंतर १६ व १७ ऑक्टोबर रोजी देखील काळया फिती लावून कामकाज केले. १७ ऑक्टोबर रोजी सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले. ५ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रातील दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी सामुदायिक रजा आंदोलन पुकारले होते.

उच्च न्यायालयाने काढलेल्या परिपत्रकाच्या अनुषंगाने तांत्रिक अडचण येऊ नये म्हणून ते रजा आंदोलन मागे घेण्यात आले. याच आंदोलनाचा पुढचा टप्पा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातील ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी हे मंगळवारपासून संपावर गेले.

Wardha News : वर्धेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढला! तापमानाचा पारा घसरला

मागण्यांकडे २१ महिन्यांपासून दुर्लक्ष

न्यायप्रणालीचा अविभाज्य घटक असलेले दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यावर स्वतःच्या न्यायहक्कांसाठी आंदोलनाची वेळ आली. न्यायालयात न्याय मागण्यासाठी येणाऱ्या प्रत्येक घटकाला लवकरात लवकर व योग्य तो न्याय मिळवून देण्यासाठी न्यायिक अधिकाऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणारे कर्मचारी अन्यायग्रस्त आहेत. न्यायालयीन कर्मचान्यांच्याच न्याय हक्कांच्या मागणीकडे शासन गेली २१ महिने डोळेझाक करीत आहे. यामुळे न्यायालयीन कर्मचारी आंदोलन करीत आहे.

आष्टी येथील कर्मचारी बसले उपोषणावर

आष्टी (शहीद) येथील स्थानिक दिवानी न्यायालयातील कर्मचा-यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी मंगळवारपासून न्यायालय परिसरात बेमुदत उपोषण आंदोलन सुरू केले. तालुका दिवानी न्यायालयातील सर्वच संवर्गातील कार्यरत तसेच सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना समान कामासाठी समान वेतन मिळावे, या प्रमुख मागणीसाठी कर्मचारी उपोषणाला बसले आहेत.

सर्व संवर्गातील कार्यरत कर्मचाऱ्यांसह सेवानिवृत्त कर्मचा-यांनाही समान वेतनाचा न्याय मिळावा, अशी आदोलनकर्त्यांची मागणी आहे. मागण्यांची पूर्तता होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार कर्मचाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Wardha News : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची आता खैर नाही! वर्धा पोलिसांचा ११ बीटचा मास्टर प्लॅन, ६१ किमीवर पोलिसांचा पहारा!

💡

Frequently Asked Questions

  • Que: न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा संप कशासाठी सुरू आहे?

    Ans: दुय्यम न्यायालयातील कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनश्रेणी मिळावी आणि समान कामासाठी समान वेतन लागू करावे, या प्रमुख मागण्यांसाठी संप सुरू आहे.

  • Que: महाराष्ट्रातील किती न्यायालयीन कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत?

    Ans: महाराष्ट्रातील सुमारे ३४ हजार दुय्यम न्यायालयीन कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

  • Que: वर्धा जिल्ह्यातील कोणत्या न्यायालयांमध्ये आंदोलन सुरू आहे?

    Ans: पुलगाव न्यायालयातील कर्मचारी संपात सहभागी झाले आहेत. तर आष्टी (शहीद) येथील दिवाणी न्यायालयातील कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

Web Title: Wardha news court employees strike vg

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • Court News
  • Protest
  • wardha
  • wardha News

संबंधित बातम्या

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा
1

Indapur News : तहसीलदारांच्या कारभाराविरोधात सर्वपक्षीय एल्गार; २५ नोव्हेंबरला इंदापुरात भव्य मोर्चा

Khandala Court Strike : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, खंडाळा न्यायालयातील कामकाजावर परिणाम
2

Khandala Court Strike : वेतनश्रेणीच्या मागणीसाठी न्यायालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप, खंडाळा न्यायालयातील कामकाजावर परिणाम

Wardha News : वर्धेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढला! तापमानाचा पारा घसरला
3

Wardha News : वर्धेकरांनो, स्वेटर बाहेर काढा! दिवाळीनंतर थंडीचा जोर वाढला! तापमानाचा पारा घसरला

Wardha News : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची आता खैर नाही! वर्धा पोलिसांचा ११ बीटचा मास्टर प्लॅन, ६१ किमीवर पोलिसांचा पहारा!
4

Wardha News : समृद्धी महामार्गावर दरोडेखोरांची आता खैर नाही! वर्धा पोलिसांचा ११ बीटचा मास्टर प्लॅन, ६१ किमीवर पोलिसांचा पहारा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.