Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Washim News : कारच्या भीषण अपघातात तरुणाचा मृत्यू; सात जण गंभीर जखमी

वाशिमहून अनसिंगकडे जात असताना बाभुळगाव फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात अनसिंग येथील अभय शिवाजी सातव (२६) याचा मृत्यू झाला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 04, 2026 | 08:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

वाशिमहून अनसिंगच्या दिशेने जात असताना झालेल्या भीषण कार अपघातात अनसिंग येथील एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर त्याच्यासोबत असलेले सात जण गंभीर जखमी झाले. ही दुर्घटना वाशिम–अनसिंग मार्गावरील बाभुळगाव फाट्याजवळ शनिवारी (दि. ३) पहाटे घडली. या अपघातात अभय शिवाजी सातव (वय २६, रा. अनसिंग) याचा मृत्यू झाला असून, तरुणाच्या अकाली निधनामुळे अनसिंगसह संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अनसिंग येथील काही तरुण एमएच ४६ / बीव्ही-०३७४ क्रमांकाच्या टाटा कंपनीच्या कारने वाशिम येथे गेले होते. वाशिम येथील काम आटोपून हे सर्वजण पहाटे गावी परतत असताना बाभुळगाव फाट्यानजीक कारचालकाचे नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्याच्या कडेला जाऊन जोरात आदळल्याने हा भीषण अपघात झाला.

Ratnagiri News : चिपळूण बसस्थानकाचा तिढा सुटणार ! प्रताप सरनाईकांनी घेतली अधिकारी व संबंधित ठेकेदारांबरोबर बैठक

अपघात इतका गंभीर होता की कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या दुर्घटनेत अभय सातव याचा गंभीर जखमी अवस्थेत मृत्यू झाला. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना बाहेर काढून उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या अपघातात ओम चंद्रवंशी, पवन नाळे, विकास गोरे, गणेश राऊत, सागर गव्हाणे, अक्षय कदम आणि गणेश गाडे हे सात जण गंभीर जखमी झाले आहेत. सध्या सर्व जखमींवर वाशिम येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू असून, डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले आहे.

धाराशिवच्या विकासाला पालकमंत्र्यांकडून बुस्टर डोस; ३१९ कोटींच्या विकास आराखड्यावर शिक्कामोर्तब

घटनेची माहिती मिळताच पोलीस व इतर यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, अधिक तपास सुरू आहे. प्राथमिक अंदाजानुसार भरधाव वेग आणि चालकाचे नियंत्रण सुटणे हे अपघाताचे कारण असावे, अशी शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान, मृत अभय सातव यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन महिन्यांची चिमुकली मुलगी आणि बहीण असा मोठा आप्त परिवार आहे. अवघ्या २६व्या वर्षी झालेल्या या अकाली मृत्यूमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, अनसिंग गावात शोककळा पसरली आहे. तरुणाच्या निधनाने मित्रपरिवार, नातेवाईक आणि गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. या घटनेमुळे पुन्हा एकदा रात्रीच्या वेळेस वाहन चालवताना वेगावर नियंत्रण ठेवणे आणि सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे महत्त्व अधोरेखित झाले आहे. पोलीस प्रशासनाकडून वाहनचालकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

Web Title: Washim news a young man died in a horrific car accident

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 04, 2026 | 08:56 PM

Topics:  

  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला
1

Washim News: गावठाण हद्दीत अतिक्रमित विहिरीचा मुद्दा ऐरणीवर; ‘पोकरा’ योजनेतील गैरप्रकाराबाबत अहवाल मागविला

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच
2

Washim News: जिल्ह्यात MIDC चे फक्त फलक! उदासीनतेमुळे एमआयडीसी केवळ नावापुरतीच

Washim News: झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘कब-बुलबुल’ कार्यक्रमाचे आयोजन
3

Washim News: झील इंटरनॅशनल स्कूलच्या वतीने ‘कब-बुलबुल’ कार्यक्रमाचे आयोजन

Washim News: विद्यार्थिनींनो अबला नाही, सबल बना! नारीशक्तीचा जनजागर, ‘या’ शाळेच्या उपक्रमाची राज्य घेतंय दखल
4

Washim News: विद्यार्थिनींनो अबला नाही, सबल बना! नारीशक्तीचा जनजागर, ‘या’ शाळेच्या उपक्रमाची राज्य घेतंय दखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.