Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

सांस्कृतिक, शिवकालीन अस्मितेचा जागर व्हावा! आ. श्वेता महाले यांचे प्रतिपादन; करवंड महोत्सव आढावा बैठक

करवंड महोत्सव हा शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वाभिमानाचा जागर करणारा उपक्रम असल्याचे आ. श्वेता महाले यांनी सांगितले. चिखली येथे झालेल्या बैठकीत महोत्सवाच्या तयारीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 06:34 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:

करवंडची भूमी ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ऐतिहासिक भूमी असून, या भूमीतील प्रत्येक कणात शिवकालीन परंपरा, शौर्य आणि स्वाभिमान दडलेला आहे. या समृद्ध वारशाला उजाळा देण्यासाठी आयोजित करण्यात येणारा करवंड महोत्सव हा केवळ उत्सव नसून शिवरायांच्या विचारांचा जागर आहे, असे प्रतिपादन आमदार श्वेता महाले पाटील यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती ‘विचारांचा उत्सव’ म्हणून साजरी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रशासनाला निर्देश

चिखली विधानसभा मतदारसंघात त्यांच्या पुढाकाराने ऐतिहासिक करवंड महोत्सवाच्या तयारीला वेग आला आहे. बुधवारी चिखली येथील तहसील कार्यालयात आयोजित आढावा बैठकीत महोत्सवाच्या नियोजनाचा सविस्तर आढावा घेण्यात आला. यावेळी महोत्सव समितीचे अध्यक्ष अरविंद देशमुख, नगराध्यक्ष पंडितराव देशमुख, उपविभागीय अधिकारी शरद पाटील, तहसीलदार विजय सवडे, नायब तहसीलदार मुरलीधर गायकवाड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

आ. महाले यांनी सांगितले की, या महोत्सवाच्या माध्यमातून स्थानिक कलावंत, शाहीर आणि मावळे यांच्या सहभागातून शिवकालीन इतिहास जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात शोभायात्रा हे मुख्य आकर्षण असणार आहे. यात घोडे, रथ, पालखी, शिवकालीन वेशभूषा केलेले मावळे, लेझीम, ढोल-ताशे, आतषबाजी, चित्ररथ, तसेच शस्त्र व नाणे प्रदर्शन यांचा समावेश असेल. याशिवाय शाहीरांचे कार्यक्रम आणि विविध सांस्कृतिक उपक्रमांमुळे महोत्सव अधिक रंगतदार होणार आहे.

“ही शिवभक्तीची आणि संस्कृतीची पर्वणी असून, करवंडच्या पावन भूमीतून शिवकालीन इतिहास अनुभवण्याची ही सुवर्णसंधी आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे,” असे आवाहनही त्यांनी केले.

Satara News : साखर कारखान्यांनी दोन मल्ल दत्तक घेतले पाहिजेत; खासदार शरद पवार यांनी व्यक्त केली अपेक्षा

दरम्यान, शेलसूर येथील श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ व बहुउद्देशीय मंडळाने महोत्सवासाठी येणाऱ्या पाहुण्यांच्या भोजन व्यवस्थेची जबाबदारी स्वीकारली आहे. यापूर्वीही मंडळाकडून एक लाख रुपयांची मदत देण्यात आली असून, महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची तयारी दर्शविण्यात आली. बैठकीस गटविकास अधिकारी समाधान वाघ, ठाणेदार जयसिंग राजपूत, प्राचार्य अण्णासाहेब म्हळासने, प्रा. विजय घ्याळ, तसेच विविध राजकीय व सामाजिक पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी मंडप, सत्कार, सांस्कृतिक, भोजन, सुरक्षा, स्वयंसेवक, प्रसिद्धी व स्वच्छता अशा विविध समित्यांची स्थापना करून महोत्सव यशस्वी करण्याचा संकल्प करण्यात आला.

Web Title: Let there be an awakening of cultural and shiv era identity asserts mla shweta mahale

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:33 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim News : ‘आवडेल तिथे प्रवास ‘ला प्रवाशांचा प्रतिसाद! २ हजार प्रवाशांनी घेतला लाभ; महामंडळाला ३.४९ लाखाचे उत्पन्न
1

Washim News : ‘आवडेल तिथे प्रवास ‘ला प्रवाशांचा प्रतिसाद! २ हजार प्रवाशांनी घेतला लाभ; महामंडळाला ३.४९ लाखाचे उत्पन्न

Mohol News : मोहोळ हादरले! उजनी कॅनॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू; दोन सख्ख्या-चुलत भावांचा जीव गेला
2

Mohol News : मोहोळ हादरले! उजनी कॅनॉलमध्ये दोन तरुणांचा बुडून मृत्यू; दोन सख्ख्या-चुलत भावांचा जीव गेला

कोर्ट फी स्टॅम्पची जादा किंमतीने विक्री! नागरिकांची चालली आर्थिक लूट; १०० रुपयांचा मुद्रांक १५० ला
3

कोर्ट फी स्टॅम्पची जादा किंमतीने विक्री! नागरिकांची चालली आर्थिक लूट; १०० रुपयांचा मुद्रांक १५० ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.