Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

डिजीटल शेती शाळा अभियानात सहभागी व्हा! सिंदखेडराजा कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांचे शेतकऱ्यांना आवाहन

बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर ‘डिजीटल शेती शाळा’ अभियानाची सुरुवात झाली असून ही मोहीम २२ एप्रिलपर्यंत चालणार आहे. या अभियानातून शेतकऱ्यांना पिकनिहाय आधुनिक तंत्रज्ञान आणि शास्त्रोक्त मार्गदर्शन दिले जाणार आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 03, 2026 | 06:16 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

बदलत्या हवामानाचा शेतीवर होणारा परिणाम कमी करून शेती अधिक किफायतशीर व शाश्वत करण्यासाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प आणि पाणी फाऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने ‘डिजीटल शेती शाळा’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. ही मोहीम बुधवारपासून सुरू झाली असून २२ एप्रिलपर्यंत सुरू राहणार आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून त्यांना सक्षम करण्याचा या उपक्रमामागील मुख्य उद्देश आहे.

Pune Rain Alert: गाड्या सोडा अन् बोट विकत घ्या! ‘स्मार्ट सिटी’चा चेहरा उघड; पुण्यात हाहाकार

सिंदखेडराजा तालुका कृषी अधिकारी रामेश्वर भुते यांनी या अभियानात जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, असे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की, बदलत्या हवामानाच्या पार्श्वभूमीवर शेतीचे नियोजन बदलणे काळाची गरज बनली आहे. अशा परिस्थितीत डिजिटल माध्यमातून तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो.

एप्रिल महिन्यात विशेषतः आयोजित करण्यात आलेल्या या डिजीटल शेती शाळेमध्ये सिंदखेडराजा तालुक्यातील प्रत्येक गावातील महिला बचत गट, कृषी मंडळे, बीजोत्पादक शेतकरी, शेतकरी उत्पादक कंपन्या तसेच बियाणे उत्पादक यांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा, असेही भुते यांनी नमूद केले. या उपक्रमाद्वारे शेतीचा खर्च कमी करणे, उत्पादन वाढविणे आणि प्रतिकूल परिस्थितीतही शेतकऱ्यांना उत्पन्नाची हमी मिळवून देणे हे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. या अभियानात कृषी विभागासोबत कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, उमेद, पशुसंवर्धन विभाग आदी विविध यंत्रणा सहभागी होणार आहेत. तज्ज्ञांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पिकनिहाय शास्त्रोक्त पद्धतींचे सविस्तर मार्गदर्शन दिले जाणार आहे. यामुळे पिकांचे नियोजन, रोगनियंत्रण, खत व्यवस्थापन आणि उत्पादनवाढ यासंबंधीची महत्त्वाची माहिती शेतकऱ्यांना थेट मिळणार आहे.

Pune News : अवकाळी पावसाचा पुणे जिल्ह्याला तडाखा; १२ तालुक्यांतील १०५ गावे बाधित, दोघांचा मृत्यू

डिजीटल शेती शाळेचे सत्र नियोजित दिवशी सायंकाळी ७.३० वाजता आयोजित केले जाणार असून त्याचे थेट प्रसारण कृषी विभाग, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, पाणी फाऊंडेशन आणि उमेद वाहिनीवर केले जाणार आहे. गावपातळीवरही कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी या अभियानाची माहिती पोहोचविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. या उपक्रमामुळे शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घेता येणार असून पीक व्यवस्थापन अधिक परिणामकारक करण्यास मदत होणार आहे. त्यामुळे या संधीचा लाभ घेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी डिजीटल शेती शाळेत सहभागी व्हावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Web Title: Participate in the digital farming school campaign

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 03, 2026 | 06:16 PM

Topics:  

  • buldhana news
  • Washim news

संबंधित बातम्या

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी
1

Washim: महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी शेतकऱ्यांच्या जाणल्या समस्या, रणथम शिवारात अंधारात टॉर्चच्या उजेडात केली पीक पाहणी

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे
2

Buldhana: परतीच्या पावसाची शेतकऱ्यांना प्रतीक्षा, रखरखत्या उन्हात सोयाबीन काढणीला वेग; रब्बी पिकांसाठी महत्त्वाचे

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?
3

Buldhana PM Awas Yojana: ८४ हजार घरकुलांचे स्वप्न अधुरे! ३२४ कोटींचे अनुदान रखडले; हक्काच्या घराची प्रतीक्षा कधी संपणार?

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान
4

Washim: मतदार नोंदणीसाठी सहकार्य करा, तहसीलदार राजेंद्र पाटील यांचे आवाहन, विशेष मतदार सेवा अभियान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.