Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 6 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Karanja: दुष्काळी परिस्थितीसाठी प्रशासनाने सज्ज रहावे; आमदार सई डहाके यांचे अधिकाऱ्यांना निर्देश

Karanja Sai Dahake on Drinking Water Shortage: कारंजा आणि मानोरा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आमदार सई डहाके यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. पाणीटंचाई आणि जनावरांच्या चारा टंचाईवर तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिले.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Nov 06, 2026 | 07:24 PM
Sai Dahake on Drinking Water Shortage

Sai Dahake on Drinking Water Shortage

Follow Us
Follow Us:
  • कारंजा-मानोऱ्यात पाणीटंचाईची चिंता
  • सई डहाकेंनी घेतला अधिकाऱ्यांचा क्लास
  • प्रशासनाला दिले महत्त्वाचे निर्देश
कारंजा: कारंजा व मानोरा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याच्या अनुषंगाने सज्ज रहावे, असे निर्देश कारंजा मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आ. सई डहाके यांनी दोन्ही तालुक्यातील अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत दिले.

कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात सोमवारी कारंजा व मानोरा तालुक्यातील सद्यस्थितीतील दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पाणीपुरवठा, पाणीटंचाई व जनावरांच्या चारा टंचाईबाबत अधिकाऱ्यांची आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती.

BDD Chawl Redevelopment : बीडीडी चाळ पुनर्विकासाला गती; घरांचा दर्जा आणि सुविधांशी तडजोड नाही – एकनाथ शिंदे

या आढावा बैठकीला आ. सई डहाके, देवव्रत डहाके, उपविभागीय अधिकारी कैलास देवरे, कारंजा तहसीलदार रवी महाले, मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील, गटविकास अधिकारी पूनम राणे, कृषी अधिकारी अश्विनी भोसले, पशुधन विकास उपायुक्त डॉ. रवी ठाकरे तथा विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. संकटाच्या काळात नागरिक आणि शेतकरी बांधवांना दिलासा मिळावा, कोणत्याही गावात पाणी व चाऱ्याची टंचाई भासू नये, यासाठी प्रशासनाने तत्परतेने कार्यवाही करावी. यामध्ये कुणीही कुचराई करता कामा नये, जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी आणि संकटसमयी त्यांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याच्या सूचना त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना दिल्या.

जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धतेवर विस्तृत चर्चा

आढावा बैठकीत आ. डहाके यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्याकडून दुष्काळ संदर्भातील परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपाययोजनांचा आढावा घेतला. यावेळी गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता, यावर चर्चा करून आवश्यक उपाययोजनांचे नियोजन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

आमदार श्वेता महालेंची अधिकाऱ्यांवर नाराजी

बुलढाण्यातही संभाव्य दुष्काळी परिस्थिती आणि पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांनी केलेल्या तयारीचा आढावा घेण्यासाठी बुधवारी धाड येथे आमदार श्वेता महाले यांच्या अध्यक्षतेखाली विशेष समन्वय बैठक पार पडली. मात्र, या आढाव्यादरम्यान विविध विभागांच्या नियोजनात त्रुटी आणि समन्वयाचा अभाव असल्याचे निदर्शनास आल्याने आमदार महाले यांनी अधिकाऱ्यांवर तीव्र नाराजी व्यक्त केली. बैठकीत पिण्याच्या पाण्याचे नियोजन, ग्रामीण पाणीपुरवठा, जलस्रोतांची उपलब्धता, जनावरांसाठी चारा व पाणी तसेच संभाव्य दुष्काळी परिस्थितीत शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना द्यावयाच्या मदतीसंदर्भात चर्चा करण्यात आली.

Mumbai Housing Project: मूळ मुंबईकरांना मुंबईतच हक्काची घरे मिळणार! बीडीडी चाळ पुनर्विकासातील ५५७ रहिवाशांना सदनिकांचे वाटप

💡

Frequently Asked Questions

  • Que: कारंजा आणि मानोरा तालुक्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा कोणी घेतला?

    Ans: कारंजा-मानोरा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सई डहाके यांनी अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेऊन परिस्थितीचा आढावा घेतला.

  • Que: आमदार सई डहाके यांनी अधिकाऱ्यांना कोणते निर्देश दिले?

    Ans: दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सज्ज राहावे. तसेच, पाणी आणि चारा टंचाईवर तातडीने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.

  • Que: आढावा बैठकीत कोणत्या प्रमुख विषयांवर चर्चा झाली?

    Ans: गावनिहाय पाणीटंचाई, टँकरद्वारे पाणीपुरवठा, उपलब्ध पाणीसाठा आणि जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता यावर चर्चा झाली.

Web Title: Karanja manora drought situation sai dahake review meeting pm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 06, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Karanja City
  • Washim news
  • Water Shortage

संबंधित बातम्या

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता
1

Washim: नाकाबंदीत पोलिसांच्या जाळ्यात चोर अडकला! चोरीची दुचाकी जप्त; आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार
2

Buldhana: महागाईचा आणखी एक झटका! बुलढाण्यात आरओ पाण्याचे दर वाढले; पिण्याच्या पाण्यासाठीही जादा पैसे मोजावे लागणार

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च
3

Washim: तुरीच्या फुलांवर काळ्या अळीचा वाढता प्रादुर्भाव; शेतकऱ्यांसमोर कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर
4

Amravati News: अमरावतीत जलसंवर्धनाचा ‘मास्टर प्लॅन’! पुनर्भरणासाठी अडीच कोटींचा आराखडा; अमृत योजनेतून ५० लाख निधी मंजूर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.