
photo- social media
Pune Water News: पुण्याचा पाणीप्रश्न CM फडणवीसांच्या कोर्टात; स्वतंत्रपणे 13 टीएमसी…, काय आहे मागणी?
यंदा खरीप हंगामात सोयाबीन पिकांना पावसाच्या अनियमिततेचा मोठा फटका बसला. अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीनची वाढ खुंटली, तर हळद पीक देखील पाण्याअभावी अर्धवट स्थितीत आहे. तर तूर हे पीक चांगले उत्पादन देईल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना होती. काही भागांत तुरीची झाडे हिरवीगार असून, त्यांना मोठ्याप्रमाणात पिवळ्या फुलांचा बहर आला. मात्र, वातावरणाने या बहरावरच तुरीच्या पिकात फुलोरा आणि शेंगा धरण्याच्या अवस्थेत विविध किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. शेंगांना नुकसान पोहोचवत असल्याने फूलगळती आणि शेंगगळतीची समस्या निर्माण होण्याची भीती आहे.
तूर पिकाला मोठ्या प्रमाणात फुले लागण्याचा काळ हा उत्पादनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो. याच अवस्थेत किडीचा प्रादुर्भाव वाढल्यास फुलांचे नुकसान होऊन शेंगा धरण्याचे प्रमाण कमी होऊ शकते. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांसमोर आता कीड नियंत्रणाचा अतिरिक्त खर्च उभा राहिला आहे. महागडी कीटकनाशके फवारूनही अपेक्षित परिणाम मिळेल की नाही, अशी चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे.
तूर पिकावरील अळीचा प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आणण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना किडीची अचूक ओळख, प्रादुभांवाची पातळी आणि योग्य कीड व्यवस्थापनाबाबत मार्गदर्शन करावे. अनावश्यक आणि वारंवार कीटकनाशक फवारणी करण्याऐवजी कृषी तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपाययोजना करण्याची गरज आहे.
Wai Nagar Parishad : वाई नगरपरिषदेच्या सभेत वादळी चर्चा; विकासकामे, पाणीपुरवठ्यावरून सदस्य आक्रमक