Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वाशिम जिल्ह्याचा पालकमंत्री कोण? संजय राठोड, इंद्रनील नाईक यांच्यासह ‘ही’ नावं चर्चेत

विदर्भातील चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येईल.

  • By कृपादान आवळे
Updated On: Dec 20, 2024 | 08:41 AM
पालकमंत्रिपदाकडे लागले लक्ष

पालकमंत्रिपदाकडे लागले लक्ष

Follow Us
Follow Us:

वाशीम : गेल्या रविवारी (दि.15) मंत्रिमंडळाचा विस्तार झाला. त्यात विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येणार आहे. आतापर्यंत गिरविण्यात आलेला कित्ता आताही वाशीममध्ये गिरविला जाणार आहे. असे असले तरी पालकमंत्री कोण होणार, याबाबत चर्चांना उधाण आले आहे.

हेदेखील वाचा : तुम्ही पण एक दिवस मुख्यमंत्री होणार’; खुद्द CM देवेंद्र फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा

वाशीम जिल्ह्यात रिसोड, वाशीम आणि कारंजा असे विधानसभेचे तीन मतदारसंघ आहेत. अमित झनक (काँग्रेस) हे रिसोडमधून, श्याम खोडे (भाजप) हे वाशीममधून तर सई डहाके (भाजप) यांनी कारंजामधून विजय मिळविला. महायुतीचा विचार केल्यास तीनपैकी दोन आमदार महायुतीच्या भाजपचेच आहे. मात्र, त्यांना कॅबिनेट वा राज्यमंत्रिपदाची गवसणी घालता आली नाही. असे असताना आता पालकमंत्री कोण होणार, यावर चर्चा रंगताना दिसत आहे.

पालकमंत्री की झेंडा मंत्री?

महाविकास आघाडीच्या अडीच वर्षांच्या कार्यकाळात शिवसेनेचे शंभुराज देसाई हे पालकमंत्री म्हणून लाभले होते. सत्ता परिवर्तनानंतर जिल्ह्याला शिंदेसेनेचे संजय राठोड पालकमंत्री म्हणून लाभले होते. या दोघांचाही कार्यकाळ झेंडा-टु-झेंडाच असा राहिला. आताही पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याच्या मंत्र्याकडे पालकमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात येणार असल्याने ‘झेंडा मंत्री’ म्हणूनच पुन्हा एकदा ठपका लागणार आहे.

यवतमाळ जिल्ह्याचे दोन मंत्री स्पर्धेत

जिल्ह्यासाठी पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांच्या नावावर शिक्कामोर्तब होणार असल्याची चर्चा आता सर्वत्र सुरू आहे. दुसरीकडे गतवेळचे संजय राठोड हेसुद्धा वाशीमसाठी आग्रही असल्याचे बोलले जात आहे. त्यातच ऐनवेळी दुसऱ्याच कुणाचे नाव पालकमंत्रिपदासाठी समोर येऊन आश्चर्याचा धक्का बसू शकतो. मात्र, पाकलमंत्रिपद आपल्याच पक्षाच्या मंत्र्याला मिळायला हवे, यासाठी महायुतीतील भाजपसह शिंदेसेना, राष्ट्रवादी अजित पवार गट यांनी जोर लावणे सुरू आहे. शेजारच्या जिल्ह्यातील आकाश फुंडकर यांच्याकडेही पालकमंत्रिपदाची धुरा सोपविण्यात येऊ शकते.

विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ

विदर्भातील केवळ चारच जिल्ह्यांतील आमदारांना मंत्रिपदाची शपथ देण्यात आली. उर्वरित 7 जिल्हे मंत्र्यांविना आहे. तर दुसरीकडे त्या 7 जिल्ह्यात पुन्हा एकदा दुसऱ्या जिल्ह्याचे रहिवासी असलेल्या मंत्र्यांकडे पालकमंत्रिपद देण्यात येणार आहे. आतापर्यंत गिरविण्यात आलेला कित्ता आताही वाशीममध्ये गिरविला जाणार आहे.

हेदेखील वाचा : Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांचं थेट PM नरेंद्र मोदी आणि CM फडणवीसांना पत्र; पत्रात नक्की काय? वाचा सविस्तर

Web Title: Sanjay rathod and indranil naik interested for guardian minister of washim nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 20, 2024 | 08:41 AM

Topics:  

  • sanjay rathod
  • Washim news

संबंधित बातम्या

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक
1

वाशिममध्ये मनसेचा आक्रोश मोर्चा, दुष्काळ घोषित न केल्यास शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा
2

वाशिममध्ये कोरडा दुष्काळ जाहीर करा, जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन; शिवसेना ठाकरे गटाचा आक्रोश मोर्चा

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद
3

Buldhana News: शेवगा फाट्यावर कारवाई, ४ लाखांचा मुद्देमाल केला जप्त; नकली नोटांसह चारजण जेरबंद

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई
4

Washim News: पैसे कमावण्याचा उद्देश, अश्लील क्यूआर; तिघांना अटक, एलसीबी अन् वाशिम पोलिसांची कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.