Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Bigg Boss 19 |
  • Navratri |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक राहणार तीन महिने बंद

मुंबईमध्ये मान्सून बरसायला सुरुवात झाली आहे. याचसंदर्भात मुंबई गेटवे ते मांडवा जहवाहतूक मार्ग तीन महिन्यांसाठी बंद असणार आहे.

  • By शुभांगी मेरे
Updated On: May 17, 2024 | 02:46 PM
मुंबई गेटवे ते मांडवा जलवाहतूक राहणार तीन महिने बंद
Follow Us
Close
Follow Us:

अलिबाग : वेळेची बचत करणारा प्रवास म्हणून मुंबई गेटवे ते मांडवा या प्रवासाला मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळतो. मात्र पावसाळा सुरु होणार असल्यानं या जलमार्गावरची प्रवासी वाहतूक सेवा तीन महिने बंद ठेवण्यात येणार आहे. 26 मे ते 31 ऑगस्टदरम्यान प्रवासी जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यामुळे आता मांडवाहून मुंबईला येणाऱ्यांना रस्ते मार्गानेच मुंबई गाठावी लागणार आहे. परिणामी लाटांवर हेलकावे खात मांडवा गाठण्यासाठी काही दिवस ब्रेक घ्यावा लागेल. महाराष्ट्र सागरी मंडळ विभागाने प्रवासी जलवाहतूक कंपन्यांना ही वाहतूक बंद ठेवण्याबाबत पत्र दिलं आहे. खबरदारी म्हणून पावसाळ्यात जलवाहतूक बंद ठेवली जाते. त्यानुसार 26 मे पासून 31 ऑगस्टपर्यंत ही वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

[read_also content=”शिवसेनेचे नेते किरण सामंत करणार लोकसभा निवडणुकीनंतर पहिलाच दौरा https://www.navarashtra.com/maharashtra/shiv-sena-leader-kiran-samant-will-make-his-first-tour-after-the-lok-sabha-elections-534364.html”]

मांडवा ते गेट वे ऑफ इंडिया या जलवाहतुकीला अनेकांची प्रसंती पाहायला मिळाली आहे. रायगड किंवा अलिबागमध्ये जाणाऱ्यांना स्वस्त दरात आणि कमी वेळेत मुंबई गाठणं या जलवाहतुकीमुळे शक्य होतं. त्याचप्रमाणे असंख्य पर्य़टकही या जलवाहतुकीचा आनंद घेण्यासाठी येत असतात. पीएनपी, मालदार, अजंठा, अपोले या कंपन्यांच्या बोटी मांडवा ते गेट वे जलवाहतूक मार्गावर प्रवासी सेवा देतात. पावसाळ्याचे चार महिने ही सेवा बंद केली होते. पुढच्या आठ दिवसांनी ही जलवाहतूक खबरदारीच्या कारणास्तव बंद करण्यात येणार आहे.

[read_also content=”राजस्थानच्या सामन्याआधी केशव महाराज पोहोचला मंदिरात, सोशल मीडियावर फोटो व्हायरल https://www.navarashtra.com/sports/before-the-rajasthan-match-keshav-maharaj-reached-the-temple-the-photo-went-viral-on-social-media-534387.html”]

पावसाळ्यात बंद राहणाऱ्या या जलवाहतुकीचा परिणाम अलिबाग आणि रायगडमधील पर्यटनावरही होतो. मुंबईकरांची मांडवा किनाऱ्याला पर्यटनासाठी पसंती असते. मांडवा इथं पर्यटनाच्या दृष्टीनं अनेक गोष्टींचा विकास झाला आहे. वेगवेगळ्या समुद्री खेळांसह निवांत आणि शांत वातावरणासाठी हाकेच्या अंतरावर असलेल्या मांडवाला पर्यटकांची पसंती असते.

आठ ते नऊ महिन्यांत जवळपास दर दिवशी हजार ते दीड हजार प्रवाशी पर्यटनासाठी जलवाहतुकीद्वारे इथं मुंबईहून येत असतात. मात्र जलवाहतूक बंद असल्यानंतर अलिबागसह मांडवा इथल्या पर्यटनावरही परिणाम जाणवतो. दरम्यान जिल्ह्यातील सर्वच मार्गावरील जलवाहतूक या दरम्यान बंद राहणार असली तरी मांडवा ते भाऊचा धक्का या मार्गावर सुरू असणारी रो रो सेवा तसेच दिघी ते आगरदांडा मार्गावरील जंगल जेटी वाहतूक मात्र सुरूच राहणार आहे.

Web Title: Water traffic from mumbai gateway to mandwa alibaug will remain closed for three months

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2024 | 02:46 PM

Topics:  

  • maharashtra
  • Mumbai Gateway

संबंधित बातम्या

Chandrapur: जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण, चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे
1

Chandrapur: जिल्हा खनिज प्रतिष्ठानच्या वतीने कॉफी टेबल बुकचे अनावरण, चंद्रपूर आणि गडचिरोली हे इंडस्ट्रियल मॅग्नेट जिल्हे

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल
2

चाकण परिसरात पावसाने जनजीवन विस्कळीत, शेतकऱ्यांचं मोठं नुकसान; व्यापारीही हवालदिल

GATE 2026 परीक्षेची अधिकृत अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा
3

GATE 2026 परीक्षेची अधिकृत अधिसूचना जाहीर! ‘या’ तारखेला होणार परीक्षा

Devendra Fadnavis : “वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने मिळेल चालना – देवेंद्र फडणवीस
4

Devendra Fadnavis : “वन-आधारित उपजीविकेला कृषी व पणन क्षेत्रात ‘नाबार्ड’च्या सहभागाने मिळेल चालना – देवेंद्र फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.