Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं, रस्त्यांना नद्यांचे स्वरुप

Jalgaon News: गेल्या दोन दिवसांपासून जळगाव शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील रस्त्यांची दुरवस्था पुन्हा एकदा समोर आली आहे. मुख्य रस्त्यांसह अनेक भागांमध्ये खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहतुकीला अडथळा निर्माण झाला असून रस्त्यांवर तलावासारखी परिस्थिती निर्माण झाली आहे.

  • By Riddhi Vanne
Updated On: Aug 01, 2026 | 12:06 PM
Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Jalgaon News: जळगावाला पावसाने झोडपलं (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  • मुसळधार पावसामुळे जळगावातील रस्त्यांवर पाणी साचून खड्ड्यांची समस्या गंभीर 
  • पाण्याचा निचरा न झाल्याने अनेक ठिकाणी तलावासारखी परिस्थिती निर्माण 
  • महापालिकेच्या कामकाजावर नागरिकांनी नाराजी व्यक्त केली
  • पालकमंत्र्यांनी शहराच्या समस्यांकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी 
Jalgaon Rain News: गेल्या दोन दिवसापासून जळगावात कोसळू लागला आहे. परंतु दुसरीकडे शहरातील रस्त्याची भयानक अवस्थाह आता उघडी पडू लागली आहे. मुख्य रस्त्यासह अनेक भागात खड्डे पाण्याच भरले आहेत. पाण्याचा निचरा होत नसल्याचे रस्त्यावर तलाव स्वरुप निर्माण झाले. त्यामुळे जळगावकर त्रस्त झाले असून यासर्व परिस्थितीला महापालिका जबाबदार असल्याचे म्हटले जात आहे. पालकमंत्री पाटीलांनी सुद्धा याकडे लक्ष देण्याची गरज आहे ते केवळ ‘ग्रामीण’ भागाचे पालकमंत्री आहेत की ‘शहरा’चे असा प्रश्न सध्या स्थानिक नागरिकांच्या मनात निर्माण होतोय. सध्या पडणाऱ्या पावसामुळे नागरिक खुश आहेत, मात्र शहराची स्थिती पाहता स्थानिकांच्या मनात तीव्र नाराजी निर्माण होत आहे.

मुख्य रस्त्यावर खड्डे

शहरातील टॉवर चौक, महापालिका सतरा मजली इमारत, गोविंदा रिक्षा स्टॉप, चित्रा चौक, न जुने बसस्थानक, घाणेकर चौक, आदी भागातील रस्त्यावर मोठ मोठे खड्डे पडले आहेत. गेले दोन दिवस चांगला पाऊस झाल्याने रस्त्यांवर खड्याचे साम्राज्य उभ राहिलं असून काही भागात तर खड्यामुळे अपघात होतात.

रस्त्यावर पाण्याचे तलाव

एकीकडे रस्त्यात साचलेल्या खड्यात पाणी तर दुसरीकडेन सिमेंट काँक्रीटचे रस्ते तयार केलेले रस्ते. पण सांडपाण्याची विल्हेवाट लावण्याची सोय न केल्यामुळे रस्त्यांवर गुडघाभर पाणी सांचले आहे. स्त्याचा एक भाग वाहतूकीसाठी बंद करावा लागला. दरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा करण्यासाठी कोणत्याही उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत, याबाबतही आता लक्ष देण्याची गरज आहे. या ठिकाणी सांडपाणी निचरा करण्याचे उपाययोजना करण्याची गरज आहे.

Jalgaon News: ‘या’ प्रकरणाने उडवली संस्थाचालक, माजी … – Navarashtra

रेल्वे स्टेशनभागातही पाणी

रेल्वे स्टेशनभागातही पाणीच पाणी साचलेले आहे. बाहेरगावावाहून येणाऱ्या लोकांना तसेच बाहेरगावी लोकांना रेल्वे स्टेशनमध्ये प्रवेश करण्यासाठी गुडघाभर पाण्यातून जावे लागत आहे. नेहरू चौकापासून पावसाचे पाणी स्टेशनपर्यंत येते परंतु त्यांच्या निचरा कुठेही होत नाही.

महापालिका निष्क्रीय

महापालिका शहरातील नागरीकांची समस्या सोडविण्यासाठी निष्क्रीय ठरत आहे. नागरीकांनी अनेकवेळा तक्रारी करूनही पदाधिकारी व अधिकारी त्याकडे लक्ष देत नसल्याने नागरिकांमध्ये नाराजी वातारण तयार होत आहे.

नटवर चौकातही तलावासारखी स्थिती

शहरातील मुख्य भागात नटवर टाकीज समोरील जयप्रकाश नारायण चौकातही पाण्याचा तलाव साचला आहे. त्यामुळे वाहन काढणेही कठीण झाले. महापालिकेने अनेकवेळा या ठिकाणी साचलेले पाणी काढण्यासाठी उपाययोजना केल्या आहेत, परंतु आतापर्यंत त्या निष्फळ ठरल्या आहेत. प्रत्येक पावसाळ्यात या ठिकाणी पाणी साचत असते. त्यावर गेल्या अनेक वर्षांत ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही.

Jalgaon News: भरधाव कारने हिरावला संसाराचा आधार; पत्नी-मुलाचा …

पालकमंत्र्याचीही जळगावबाबत अनास्था

पालकमंत्री गुलाबराव पाटील यांची जळगाव शहरातील नागरिकांच्या सुविधाबाबत अनास्था दिसून येत आहे. शहरातील नागरीकांच्या समस्याबाबत ते एकदाही महापालिकेच्या अधिकाऱ्यांची बैठक घेत नाहीत. त्याना सूचनाही करीत नाही तसेच जळगाव शहरात कामे करण्यासाठी नधीची काय अडचण आहे? याची माहितीही घेत नाहित. त्यामुळे आज जळगाव शहर वाऱ्यावर असल्याचे दिसत आहे. पालकमंत्री शहराचे नव्हे तर केवळ ग्रामीणचेच आहेत काय असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांनी आता तरी जळगाव शहरातील या प्रश्नाकडे लक्ष देवून तातडीने सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी मागणीही नागरीकांकडून होत आहे.

Web Title: Waterlogged roads and potholes leave jalgaon citizens frustrated

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 12:06 PM

Topics:  

  • Jalgaon News
  • Maharshtra news
  • rain news marathi

संबंधित बातम्या

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त
1

Jalgaon News: जळगाव पोलिसांचा धडाका! एकाच दिवशी ९ ठिकाणी छापे, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले
2

Jalgaon ITI Garbage Depot Protest: कचऱ्याच्या प्रश्नावर अभाविपचे आंदोलन; ITI परिसर स्वच्छ करण्यासाठी पालिका प्रशासन सरसावले

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?
3

Jalgaon News: मालमत्ता सहा वर्ष कराचा मुद्दा ऐरणीवर; अमळनेरमध्ये नेमकं काय सुरू आहे?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.