Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 18 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्या दिवशी नेमकं काय घडलं?, MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा अखेरचा दिवस कसा होता? , काय घटनाक्रम?, घ्या जाणून

राजगड किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार हिचा खून झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दर्शनाचा मित्र पसार झाला असून त्याने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 20, 2023 | 11:29 AM
त्या दिवशी नेमकं काय घडलं?, MPSC उत्तीर्ण दर्शना पवारचा अखेरचा दिवस कसा होता? , काय घटनाक्रम?, घ्या जाणून
Follow Us
Follow Us:

पुणे : राजगड (Rajgad) किल्ल्याच्या पायथ्याला मृतावस्थेत सापडलेल्या दर्शना पवार (Darshana Pawar) हिचा खून (Crime) झाल्याची धक्कादायक माहिती शवविच्छेदन अहवालातून उघड झाली आहे. दर्शना आणि तिचा मित्र राजगड किल्ल्यावर फिरायला गेले होते. दर्शनाचा मित्र पसार झाला असून त्याने तिचा खून केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. पसार झालेल्या मित्राचा माग काढण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली आहेत.

दर्शना दत्ता पवार (वय २६, रा. कोपरगाव, जि. नगर) असे खून झालेल्या तरुणीचे नाव आहे. दर्शना राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेत राज्यात तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली होती. वनपरिक्षेत्र अधिकारी म्हणून तिची निवडही झाली होती.

नेमकं काय घडलं?

पुण्यातील एका संस्थेकडून तिचा सत्कार आयोजित करण्यात आला होता. नऊ जून रोजी ती पुण्यात आली होती. नऱ्हे परिसरात एका मैत्रिणीकडे ती राहत होती. १२ जून रोजी सिंहगडावर जायचे आहे, असं मैत्रिणीला सांगून ती घराबाहेर पडली. दर्शनाने कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली होती. तिच्यासोबत राहुल दत्तात्रय हंडोरे हा मित्र होता. १२ जूनला तिच्या कुटुंबीयांनी संपर्क साधल्यावर मोबाइल बंद असल्याचे लक्षात आले. त्यानंतर कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र, तिचा ठावठिकाणा न लागल्याने कुटुंबीयांनी दर्शना बेपत्ता असल्याची तक्रार सिंहगड रस्ता पोलिसांत दिली.

दर्शनाचा मित्र बेपत्ता

दर्शनाचा मित्र राहुल हंडोरे बेपत्ता झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्याच्या कुटुंबीयांनीही तो बेपत्ता झाल्याची तक्रार वारजे पोलिस ठाण्यात दिली. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी सतीचा माळ परिसरात रविवारी दर्शनाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत सापडला.

राहुल गडावरून एकटाच खाली आला

दर्शना आणि तिचा मित्र राहुल १२ जून रोजी दुचाकीवरून वेल्हे तालुक्यातील राजगड किल्ला परिसरात गेले. सकाळी सव्वासहाच्या सुमारास दोघे जण गडाच्या पायथ्याशी पोहोचले. दोघांनी गड चढायला सुरुवात केली. सकाळी दहाच्या सुमारस राहुल गडावरून एकटाच खाली आला. राजगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या हॉटेलच्या परिसरातील सीसीटीव्ही चित्रीकरणातून ही माहिती उपलब्ध झाली आहे. राहुल फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

Web Title: What exactly happened on that day how was the last day of mpsc pass darshana pawar whats happening get to know nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2023 | 11:29 AM

Topics:  

  • maharashtra
  • Rajgad

संबंधित बातम्या

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह
1

Vasai-Virar News: ‘रस्ते सुधारा नाहीतर आंदोलन तीव्र करू’; वसई-विरारमध्ये विवेक तिवारींचा सडक सत्याग्रह

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ
2

Karjat News: बाबो! पाषाणेतील गृहसंकुलात तब्बल ११ फुटांचा अजगर, रहिवाशांमध्ये उडाली खळबळ

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल
3

Purandar Airport : अतिरिक्त जमिनीचा अट्टाहास का? विमानतळ जागेच्या भूसंपादनाबाबत उदाचीवाडी ग्रामस्थांचा सवाल

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…
4

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.