नवी दिल्ली : “फक्त ५० खोके… खोके कसले… मिठाईचे… गंमतीचा भाग जाऊ द्या. हे आमदार लाखो लोकातून निवडून आलेले आहेत. साधा ग्रामपंचायत सदस्य पक्ष बदलत नाही. इकडे आमदार एवढ्या प्रमाणात आले”, असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या आरोपाना उत्तर दिले.
यावेळी मुख्यमंत्री शिंदे म्हणाले कि, लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न गेल्या काही दिवसांपासून होत आहे. जनता सुजाण आहे. कोणी काहीही बोललं तरी आम्ही आमचं काम करत राहू. शिवसेना भाजप युतीचे सरकार अडीच वर्षांपूर्वी व्हायला हवं होतं ते आम्ही केलं आहे. कसले पन्नास खोके, मिठाईचे की कसले? नगरसेवकही इकडे तिकडे जायला घाबरतात. मात्र आमदारांना त्यांचं कर्तव्य पार पाडू शकत नाही, अशी स्थिती झाली होती. सावरकरांवर आम्ही बोलू शकत नव्हतो.
अन्यायला वाचा फोडण्यासाठी पेटून उठायला बाळासाहेबांनी सांगितलं होतं. हे बंड नाही. ही क्रांती आहे. हे स्वेच्छेने आले आहेत. त्यांना आरोप करायला आता काही नाही, म्हणून काहीही बोलत बसतात. आम्ही अडीच वर्षे पूर्ण करू एवढी कामं करू, आम्ही लोकांसारखं पंचवीस वर्षे सांगणार नाही. पण पुढची निवडणूक तर नक्की जिंकू. कामासाठी लोक माझ्याकडे येतात. बाकी कुणी माझ्याकडे आलं नाही. कुठलाही खासदार माझ्या संपर्कात नाही. मी मुख्यमंत्री झालोय त्यामुळे ते माझ्या सदिच्छा भेटाला येतातच. मला कुठलीही बैठक माहिती नाही. ओबीसी समाजाला न्याय देण्याची हीच आमची भूमिका होती. ओबीसी आरक्षणाचा निर्णय झाल्यानंतर निवडणुका व्हाव्यात हीच आमची इच्छा होती.
पाऊस येत आहे, पूर आला आहे, निवडणुकांची तयारी करायला मॅन पॉवर लागते. मात्र अनेक लोकांनी सांगितलं आहे की निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय होऊ नये. त्यामुळे आमचीही तीच भूमिका आहे. युतीचे सरकार असताना केंद्र सरकारने मदत केली आहे. पंतप्रधानांनी आत्ताच्या सरकारलाही तेच सांगितलं आहे.