Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभा सभागृहात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न चांगलाच गाजला. आ. नमिता मुंदडा यांनी राज्यातील हुंडा प्रथेच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकला.

  • By Priti Hingane
Updated On: Mar 11, 2026 | 05:55 PM
Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल

Beed Politics News: हुंडा प्रथा थांबवण्यासाठी कडक कधी होणार? आ. नमिता मुंदडा यांचा सरकारला सवाल

Follow Us
Close
Follow Us:
  • विधानसभेत मांडला हुंडाबळीचा मुद्दा
  • आ. नमिता मुंदडा यांच्याकडून आकडेवारी सादर
  • ६ हजारांहून अधिक महिलांना हुंड्यासाठी जीव गमवाला
Beed Politics News: जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र विधानसभा सभागृहात हुंडाबळी आणि महिलांवरील अत्याचाराचा प्रश्न चांगलाच गाजला. केज विधानसभेच्या आ. नमिता मुंदडा यांनी लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान राज्यातील हुंडा प्रथेच्या भीषण वास्तवावर प्रकाश टाकत या प्रकरणांवर कठोर कारवाईची मागणी केली. आ. नमिता मुंदडा यांनी लग्नासारख्या पवित्र नात्याला हुंड्यामुळे आर्थिक व्यवहाराचे स्वरूप प्राप्त झाले असून ही अत्यंत चिंताजनक बाब आहे.

हे देखील वाचा: Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या २०२३ च्या आकडेवारीनुसार देशात हुंडा प्रतिबंधक कायद्यांतर्गत १५ हजारांहून अधिक गुन्हे नोंदवले गेले असून ६ हजारांहून अधिक महिलांना हुंड्यासाठी जीव गमवावा लागला आहे. ही आकडेवारी समाजासाठी गंभीर इशारा असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईसारख्या शहरात २०२४ मध्ये हुंडा छळाची ४३० प्रकरणे नोंदवली गेली असून २०२५ च्या सुरुवातीच्या काही महिन्यांतच ही संख्या १६० च्या पुढे गेल्याचे त्यांनी सांगितले.

हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कडक करणार

बीड जिल्ह्यातील परिस्थिती तसेच पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाचा उल्लेख करत हुंडा घेणाऱ्या कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार आणि कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. गेल्या पाच वर्षांतील गुन्ह्यांची संख्या, दोषींना झालेली शिक्षा, एफआयआर नोंदणीसाठी लागणारा वेळ आणि जनजागृतीसाठी राबवलेल्या उपक्रमांबाबत सरकारला प्रश्न विचारले.

हे देखील वाचा:  Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश

सरकारच्या वतीने उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी गेल्या पाच वर्षांतील कारवाईची माहिती सभागृहात दिली. २०२१ मध्ये १७२ गुन्हे नोंदवून ५३४ जणांना अटक करण्यात आली होती, तर २०२४ मध्ये ही संख्या १३९ गुन्ह्यांपर्यंत कमी झाली आहे. २०२५ मध्ये आतापर्यंत १३८ गुन्हे नोंदवून २१३ आरोपींना अटक करण्यात आली आहे. हुंडा प्रतिबंधक कायदा अधिक कडक करण्याबाबत शासन सकारात्मक असून महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी लाडकी बहीण योजना, मोफत उच्च शिक्षण आणि बचत गटांच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Web Title: When will strict action be taken to stop the dowry system mla namita mundada questions the government

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 11, 2026 | 05:55 PM

Topics:  

  • Beed
  • Beed Crime
  • Sambhuraje desai

संबंधित बातम्या

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला
1

धक्कादायक ! बीडमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; अश्लील व्हिडिओ बनवले अन् नंतर धर्मांतरासाठी दबाव टाकला

Beed Crime: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद; मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, होमगार्डही हत्याकांडात सामील
2

Beed Crime: पत्नीच्या आक्षेपार्ह फोटोवरून वाद; मित्रांकडून 19 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या, होमगार्डही हत्याकांडात सामील

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…
3

Beed Crime: पत्नीला फोन केल्याचा राग; बीडमध्ये पतीवर लोखंडी रॉड-दगडांनी जीवघेणा हल्ला; ‘ती’ आता माझी आहे…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.