Ashti Nagar Panchayat: नगरपंचायतींमध्ये पावसाळ्यापूर्वी पाणीपुरवठा कामे पूर्ण करा; आ. सुरेश धस यांचे आदेश
Ashti Nagar Panchayat: आष्टी नगरपंचायत, पाटोदा आणि नगरपंचायत शिरूर कासार या तीन नगरपंचायतींमध्ये राज्याच्या नगरविकास विभागाच्या नगरोत्थान असलेल्या योजनेंतर्गत सुरू पाणीपुरवठा योजना व नळजोडणी कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. बैठकीत आ. सुरेश धस यांनी पावसाळ्यापूर्वी सर्व कामे गुणवत्तापूर्ण आणि वेळेत पूर्ण करण्याचे महत्त्व सांगितले. बैठकीत तीनही नग्रपंचायतींमधील सध्या सुरू असलेल्या कामांची सद्यस्थिती तपासली. यामध्ये पाणीपुरवठा, नळजोडणी, पाणी टाक्या, फिल्टर युनिट, उपलब्ध पाणीसाठा आणि शहरांमध्ये सध्या मिळणारा पाणीपुरवठा यांचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
हे देखील वाचा: Kej Nagar panchayat: केज नगरपंचायतीत PM आवास योजनेत ३.६२ कोटींचा घोटाळा? राज्यमंत्री मिसाळ यांनी दिले चौकशीचे आदेश
नागरिकांना स्वच्छ आणि फिल्टर केलेले पाणी मिळावे, या उद्देशाने सर्व कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्यास विशेष महत्व देण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी बाळदत्त मोरे, मुख्याधिकारी अभय जोशी, मुख्याधिकारी गणेश दहिफळे, नगराध्यक्ष रोहिदास पाटील-गाडेकर, नगराध्यक्ष झिया बेग, नगराध्यक्ष राजेंद्र जाधव, नगरसेवक रंगनाथ धोंडे, तसेच अभियंते बेग, शिरसाट, कदम उपस्थित होते. नागरिकांना लवकरात लवकर पाण्याची सोय व्हावी हा महत्वाचा उद्देश असल्याचे आमदारांनी सांगितले.
कोणतीही अडचण नागरिकांना निर्माण होऊ नये यासाठी आ. सुरेश धस यांनी ठेकेदारांना आवश्यक सूचना दिल्या आहेत. तसेच, पाणीपुरवठ्याशी संबंधित कोणतीही अडचण नागरिकांना निर्माण होऊ नये, याकडे लक्ष देण्याचे आवाहन केले. कामे दर्जेदार आणि वेळेत करण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी केल्या. यावेळी तीनही नगरपंचायतींमधील पाणीपुरवठा योजनेचे ठेकेदार आणि विविध अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
हे देखील वाचा: Beed News: बीडकरांना मिळाला दिलासा! विकासकामांना गती देणार; नगराध्यक्षा प्रेमलता पारवे यांची हमी
पावसाळ्यापूर्वी सर्व प्रलंबित कामे पूर्ण करा असे आ. सुरेश धस यांनी कर्मचाऱ्यांना सांगितले आहेत. बैठकीत कामांच्या प्रगतीबाबत चर्चा करत गुणवत्ता, वेळापत्रक आणि शहरातील पाणीपुरवठ्याची अखंडता सुनिश्चित करण्यासाठी पुढील उपाययोजना ठरवण्यात आल्या. पावसाळ्यापूर्वी नळजोडणी, पाणी टाक्या व फिल्टर युनिटची कामे पूर्ण करण्यावर विशेष भर देण्यात आला असून नागरिकांना प्रत्येक घरपोच स्वच्छ पाणी उपलब्ध होईल, असे नियोजन केले असून, याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. आ. सुरेश धस यांच्या सूचनेमुळे कामे लवकर मार्गी लागणार आहेत.






