Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भर पावसात शिकायचं कुठं…? मोखाडातील आदिवासी विद्यार्थ्यांचा आर्त सवाल

मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील शाळेचे छत वादळात उडाल्याने विद्यार्थी भर पावसात शिकायला मजबूर आहेत. संस्थेच्या उदासीनतेमुळे शाळेची दुरुस्ती रखडली असून पालक व ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jun 29, 2025 | 04:21 PM
भर पावसात शिकायचं कुठं…? मोखाडातील आदिवासी विद्यार्थ्यांचा आर्त सवाल
Follow Us
Close
Follow Us:

दीपक गायकवाड, मोखाडा: मोखाडा तालुक्यातील खोडाळा येथील पद्मश्री अण्णासाहेब जाधव समाज उन्नती मंडळाच्या माध्यमिक विद्यालयाची अवस्था दिवसेंदिवस बिकट बनत चालली आहे. मे महिन्यात आलेल्या वादळात या शाळेच्या छताचे मोठे नुकसान झाले असून, १६ मेपासून वर्गखोल्या बिनछपराच्या अवस्थेत आहेत. सध्या पावसाळा सुरू असूनही विद्यार्थ्यांना उघड्या वर्गांमध्येच शिक्षण घ्यावे लागत आहे. त्यामुळे “आमच्या लेकरांनी भर पावसात शिकायचं कुठं…?” असा आर्त सवाल आदिवासी पालक करत आहेत. या शाळेचे व्यवस्थापन मातृसत्ताक असून विद्यार्थ्यांना सुरक्षित आणि सुसज्ज शिक्षणाची सोय करून देणे ही संस्थेची नैतिक जबाबदारी आहे. मात्र शाळेच्या छताच्या दुरुस्तीबाबत संस्था आणि संचालक मंडळ कमालीचे उदासीन असल्याचे चित्र उघड झाले आहे. यामुळे पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

फवारणीच्या विषबाधेने शेतमजुराचा मृत्यू; 2017 च्या ‘त्या’ आठवणी पुन्हा ताज्या

सदर इमारत यापूर्वीही पडकी होती, परंतु एका सामाजिक संस्थेच्या मदतीने दोन वर्षांपूर्वी तिची रंगरंगोटी व दुरुस्ती करण्यात आली होती. मे महिन्यात आलेल्या वादळात या इमारतीचे छप्पर उडाले. गावात ८७ घरांचे आणि काही शासकीय मालमत्तांचेही मोठे नुकसान झाले, त्याच वेळी ही दुर्घटना घडली. पण दीड महिना उलटूनही शाळेचे छत दुरुस्त करण्यात आलेले नाही. खोडाळा हायस्कूलमध्ये इयत्ता १०वी पर्यंतचे वर्ग आहेत व येथेच शालांत परीक्षा केंद्र सुद्धा आहे. गेल्या ५० वर्षांपासून ग्रामस्थांनी आपल्या पदरमोड करून शाळेचा विकास केला आहे. स्थानिक स्कूल कमिटीने वेळोवेळी प्रयत्न करून इमारतीत वाढ केली असून, खासदार सचिन तेंडुलकर यांच्या निधीतून सुद्धा एक प्रशस्त हॉल उभारण्यात आला आहे.

तथापि, संस्थेचे कार्यकारी मंडळ या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष करत आहे, असा आरोप ग्रामस्थ व स्थानिक स्कूल कमिटीने केला आहे. या दुरुस्तीसाठी ५० हजार रुपयेच संस्थेच्या वतीने देऊ करण्यात येत आहेत, उर्वरित खर्च ग्रामस्थांनी करावा, अशी भूमिकाही संस्थेने घेतल्याचा आरोप स्कूल कमिटीचे चेअरमन प्रल्हाद कदम यांनी केला आहे.

Ajit Pawar News: ‘मोर्चा काढण्याची वेळच येऊ नये, यासाठी आम्ही…’;  मनसे-ठाकरेंच्या मोर्च्याबाबत अजित पवारांचे सूचक विधान

आजही मुलं भर पावसात ओल्या भिंतीखाली अभ्यास करत आहेत. शासनाने आणि संस्थेने तत्काळ लक्ष देऊन या विद्यार्थ्यांना सुरक्षित शिक्षण देण्याची जबाबदारी पार पाडणे अत्यावश्यक आहे.

Web Title: Where to study in heavy rain a burning question of tribal students in mokhad

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 29, 2025 | 04:21 PM

Topics:  

  • Monsoon Alert
  • palghar

संबंधित बातम्या

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?
1

Maharashtra Rain Live Update: महाराष्ट्रात पावसाचे तांडव सुरूच राहणार; नेमकं काय आहे या आस्मानी संकटाचे कारण?

Solapur  Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या
2

Solapur  Rain Update : महाराष्ट्रात ओल्या दुष्काळाचा कहर! बार्शीत एकाच दिवशी दोन शेतकऱ्यांच्या आत्महत्या

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा
3

IMD Weather Update: बंगालमध्ये पावसाचा कहर, शाळा-कॉलेज बंद; IMD चा भितीदायक इशारा

गैरहजेरी लपवून हजेरीपटावर खोट्या सह्या! न्यायालयाने शिक्षकावर ठोठावला दंड
4

गैरहजेरी लपवून हजेरीपटावर खोट्या सह्या! न्यायालयाने शिक्षकावर ठोठावला दंड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.